कसं…लिहु आणि कसे…बोलू..शब्द अपुरे आणि भावना आवेगान भरून येतात…!!

हा श्वास,हे आयुष्य आमचं ,तुझीच देणं…हो बाबासाहेब..!!
तुम्ही आमच्या साठी लढला नसता तर आज आम्ही या जगावर राज्य करु शकलो नसतो नव्हे तो तर अधिकारच नव्हता….!! तुम्ही तो मिळवून दिलात..!!
या देशात जनावरांना पाणी पिण्याचा अधिकार होता पण आम्हाला नव्हता त्यासाठी तुम्ही लढलात…!!.आणि जिंकलात ही..म्हणालात हा संगर केवळ पाण्यासाठी नसुन आमच्या मुलभूत अधिकारासाठी आहे….!!महाडचे चवदार तळे आज ही साक्ष देत आहे..तीथलं तुमचं शिल्प मनाला प्रेरणा देते अखंडीत…!!मानसाला मानुस म्हणून नाकारणाऱ्या धर्मांध शक्तींना तुम्ही अफाट ज्ञानाच्या जोरावर धुळ चारुन अखंड भारताला न्याय, बंधुता आणि समता दिलीत…तेथेच बुद्ध हसला बाबा…!!

महात्मा फुले,संत कबीर आणि बुद्ध….!! .हे तुमचे गुरू…!!
बाबा..!!आज तुम्हाला १३५ वर्ष झालित… तुम्ही असेच चिरकाल जीवंत रहा…. कोट्यवधी लेकरांच्या श्वासात,मनात आणि भारतीय संविधानाच्या पानापानावर…!! या देशातील कमजोर…गरीब आणि शेवटच्या मानसाला न्याय देण्यासाठी तुम्ही जीवंत रहा …!!!
आज जयंती नाहीच …तो वाढदिवस तुमचा …कारण प्रत्येक मांनसांसाठी लढणाऱ्या बापाचा जन्म सोहळा…!!तुम्ही होता म्हणून आज आम्ही आहोत…कसं विसरावं पांग….!!
हपी बर्थ डे बाबासाहेब…!!.❤️– प्रमोद रामचंद्र जाधव


