आज 19 जून, मिलिंद महाविद्यालयाचा वर्धापन दिन…!!!
19 जून 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे पीपल्स एजुकेशन सोसाइटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालय हे मराठवाडा प्रदेशातील पहिल महाविद्यालय, त्यावेळी शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास असलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी हैद्राबाद च्या उस्मानिया विद्यापीठात जाव लागायच.
औरंगाबाद मधे पीपल्स एजुकेशन सोसाइटी ची सर्वाधिक दीडशे एकर पेक्षा अधिक जागा आहे, ही जागा बाबासाहेबांनी स्वतः विकत घेतलेली आहे. या पीपल्स एजुकेशन सोसाइटी चा औरंगाबाद शहर व जिल्ह्याच्या आणि मुख्यतः येथील दलितांच्या सामाजिक आर्थिक उन्नतित सर्वाधिक मोलाचा वाटा आहे.
औरंगाबाद तालुक्यातील एका लहनश्या गावी माझे आजी- आजोबा महारकीचे कामं करायचे, 1952 साली बाबासाहेबांच भाषण ऐकायला माझे आजोबा औरंगाबाद शहरात आले, बाबासाहेबांनी भाषणात महारकीचे काम सोडण्याचे व शहराकडे येण्याचे आव्हान केले, आपल्या मुक्तिदात्याच्या त्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक दलितांनी आपल्या गावातील बलुतेदारीला,
महारकीच्या कामांना नाकारत औरंगाबाद गाठले, माझे आजी-आजोबा सुद्धा त्यातलेच एक. औरंगाबादला आल्यानंतर त्यांना मिलिंद महाविद्यालयाच्या बांधकामात कामगार म्हणून त्यांना रोजगार उपलब्ध झाला, जातिव्यवस्थेने ठरवून दिलेलेच कामं करायच्या सक्ती पासून मुक्त झाले, पुढे मिलिंद महाविद्यालयाच्या अजिंठा हॉस्टेलची मेस ते चालवायला लागले, त्यातून त्यांची आर्थिक उन्नती होत गेली, पुढे माझे वडील व त्यांचे भावंड याच परिसरात शिकुन मोठे झाले, त्यानंतर आम्ही भावंडही याच मिलिंद महाविद्यालयात शिकलो. या परिसराच आमच्या आयुष्यात फार महत्त्वाच स्थान आहे. आणि असच औरंगाबाद शहरात राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो दलित कुटुंबांच आहे.
We_are, because he_was…!!!
ThanksBabasaheb
ThanksAmbedkar
बाबासाहेबांचे आमच्या आयुष्यावर अनंत उपकार आहेत त्या पैकीच एक म्हणजे हे मिलिंद महाविद्यालय व पीपल्स एजुकेशन सोसायटी पण याच PES ची आजची अवस्था पाहुन, यातील भांडणं पाहून मन उद्विग्न होते. बाबासाहेबांची पीपल्स एजुकेशन सोसाइटी वाचवण्यासाठी बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने जबाबदारी स्विकारण्याची गरज आहे. बाबासाहेबांच नाव घेऊन दुकानदारी करणाऱ्या आणि बाबासाहेबांच्या संस्थेला हे दिवस आणणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, त्यांना संस्थेतून हद्दपार केले पाहिजे आणि पीपल्स एजुकेशन सोसाइटी ज्या उद्देशाने बाबासाहेबांनी स्थापन केली होती तो उद्देश पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिति निर्माण करण्याचे प्रयत्न केले पाहिजे.
-मुकुल निकाळजे
उत्कृष्ट लेख ..विचार करायला लावणारा..
मिलिंद कॉलेज ची आजची अवस्था पाहून खरच मन उद्विग्न होते.
😢