जातीय, धार्मिक भावनेतून संविधानाची पायमल्ली नको.

जातीय, धार्मिक भावनेतून संविधानाची पायमल्ली नको.

आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या भारत देशाला संविधान अर्पण केले अन् २६ जानेवारी १९५० पासून, पुर्वीची सर्व व्यवस्था संपुष्टात येऊन भारतात संविधानिक लोकसत्ताक कार्यप्रणाली अस्तित्त्वात आली. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या संविधानिक तत्वांवर देशाची एकता, अखंडता अन् राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान, अनमोल कार्य केले, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सन्मानपूर्वक मुलभूत अधिकार दिला. संविधानामुळे आपला भारत देश अखंड, सार्वभौमत्व आहे याचा भारतीय म्हणून आपल्याला सार्थ अभिमान असायलाचं पाहिजे. बाबासाहेबांनी ‘मी प्रथम भारतीय आहे, अन् अंततःही भारतीय आहे’ अशी व्यापक राष्ट्रवादाची अन् प्रेमाची भूमिका मांडली. घटनेत सर्वचं समाजातील घटकांसाठी ठोस तरतुद करुन ठेवली. या महापुरुषांने अस्पृश्यांनाचं नव्हे तर, स्पृश्यांनाही पुनीत केले. त्याचं संविधानिक लोकशाहीव्दारे आपण गेली ७१ वर्षे अनेक क्षेत्रात दमदार वाटचाल करीत आहोत, जागतिक स्पर्धेत आहोत. पाकिस्तान १४ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला असून, त्याची आज काय अवस्था आहे हे लक्षात असू द्या. संविधानाच्या माध्यमातून भारतीयांवर केलेल्या अनंत उपकारांमुळेचं, भारतीय संविधानाला जगात वेगळाचं आयाम मिळाला आहे. तरी सुध्दा काही जातीवादी बेगडी देशभक्त, बिनडोक बांडगुळे संविधान विरोधात सातत्याने गरळ ओकतात, त्याचे अवमुल्यन करतात हा घटनाद्रोह नाही का ?

संविधानामुळे आपला भारत देश अखंड, सार्वभौमत्व आहे याचा भारतीय म्हणून आपल्याला सार्थ अभिमान असायलाचं पाहिजे. बाबासाहेबांनी ‘मी प्रथम भारतीय आहे, अन् अंततःही भारतीय आहे’ अशी व्यापक राष्ट्रवादाची अन् प्रेमाची भूमिका मांडली. घटनेत सर्वचं समाजातील घटकांसाठी ठोस तरतुद करुन ठेवली. या महापुरुषांने अस्पृश्यांनाचं नव्हे तर, स्पृश्यांनाही पुनीत केले. त्याचं संविधानिक लोकशाहीव्दारे आपण गेली ७१ वर्षे अनेक क्षेत्रात दमदार वाटचाल करीत आहोत, जागतिक स्पर्धेत आहोत. पाकिस्तान १४ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला असून, त्याची आज काय अवस्था आहे हे लक्षात असू द्या.

भारतात अनेक जाती, धर्म, रुढी, परंपरा, पंथ, वर्ण व्यवस्था अशी विभिन्न परिस्थिती असतांना संविधानांने भारताचे अखंडत्व राखले असतांना जातीय धर्मांध मानसिकतेतून देशांतर्गत सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी उचापती घडतांना दिसून येतात. म्हणजे संविधानाची मुलभूत तत्वे तुम्हांला मान्य नाहित का ? पण, संविधानाला धक्का लागला तर बाबासाहेबांनी महत् प्रयासाने उभारलेला लोकशाहीचा हा डोलारा उध्वस्त होऊन देशात विषमता, हुकूमशाही, धर्मसत्ताक प्रणाली निर्माण होऊन अराजकता माजेल, राष्ट्रिय एकात्मता धोक्यात येईल. राष्ट्रभक्तीपोटी जातीय मानसिकतेतून संविधान नाकारण्याची देश विरोधी कृती हि अक्षम्य गुन्हा असून, जाती धर्माच्या नावाखाली जी विचारधारा निर्माण होत आहे ती देशाला घातक आहे. संविधान नाकारण्यामागे चातुर्वण्य, मनुवादी व्यवस्थाचं तुम्हाला अभिप्रेत, अपेक्षित आहे ना ? तुम्हाला समतावादी, मानवतावादी, जाती निर्मुंलन हे उद्दिष्टे मानणारी घटना मान्य नाही ना ? विषमता, जातीयता, निर्दयता, उचनिचता, अन्याय अशा अनेक भ्रामक गोष्टींचे प्रतिक असलेल्या मनुस्मृती ग्रंथाच्या आधारावर भारतीय राज्य घटना निर्माण झाली तर, अनेक जाती, धर्म, रुढी, परंपरा, पंथ, वर्ण व्यवस्था असलेल्या भारत देशाची अवस्था अफगानिस्तान, पाकिस्तानपेक्षाही भयानक अन् भयावह होईल. कारण, संविधान असतांना जातीय धर्मांध मानसिकतेतून आज ज्या काही घटना घडत आहेत त्यात, संविधान नसेल तर किती वाढ होईल ? मग, तुम्हाला रानचं मोकळ होईल ना.? अरे, संविधान निर्मिती करतांना संविधान सभेत प्रत्येक मुद्द्यांवर सखोल, अभ्यासपुर्ण चर्चा करुन, एकेक मुद्दा तपासूनचं संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे हे सुध्दा लक्षात असू घ्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उभ्या आयुष्यात अनेकदा जातीयतेचे चटके, विरोधाभास सहन करावा लागला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर, ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत डॉ. आंबेडकर घटना समितीत येणार नाहीत याची पुर्ण काळजी घेतली आहे’ असे जाहिर वक्तव्ये केले होते. पण, बाबासाहेबांनी घटना निर्मिती करतांना त्याचा कुठे लवलेशही जाणवू दिला नाही. महिलांसाठी हिंदू कोड बिल संसदेत मंजूर झाले नाही म्हणून आपल्या मंत्री पदाचाही राजीनामा दिला होता. ‘लिंगायत, मुसलमान, मराठे व अस्पृश्य हे सर्वचं मागासलेले आहेत. या समदुःखी माणसांनी सहकार्य करुन एकजूटीने वागण्यास काय हरकत आहे’ असे वक्तव्य त्यांनी २५ डिसेंबर १९३९ रोजी बेळगांव येथे जाहिर सभेत केले होते. देशाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांच अनमोल योगदान आहे. या देशाचा सर्वांगीण विकास आराखडा बाबासाहेबांच्या नावांवर आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही एवढे त्यांचे उपकार आहेत. देशहितासाठी बाबासाहेबांनी सर्व काही केलं असतांनाही संविधान अन् बाबासाहेबांबद्दल तुम्हाला एवढा पराकोटीचा पोटशुळ का ? कायदे, संविधानाला दोष देण्यापेक्षा त्यांच्या अंमलबजावणीसाठी आग्रह का धरला जातं नाही ? तुमच्या घरातील उंदिर मारण्यासाठी तुम्ही घरालाचं आग लावणार आहात का ? कपड्यात, राहणीमानात बदल झाला असला तरी तुमच्या जातीय धर्मांध मानसिकतेत बदल, परिवर्तन कधी होणार ?

संविधानाच्या प्रास्ताविकेत न्याय, व्यक्ती, स्वातंत्र्य, समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, बंधुता या मानवी मुल्यांचा घटनाकारांनी उल्लेख, पुरस्कार केला आहे. ही घटना आम्ही स्विकारली, ही किती अभिमानास्पद बाब आहे. म्हणून, फक्त गरजेपुरते अन् सोयीच्या राजकारणासाठी संविधानावर स्तुतीसुमने न उधळता, नतमस्तक होण्याचा दिखाऊपणा न करता, संविधानाचा प्रामाणिक अन् सन्मानपूर्वक गौरव करुन, संविधानाची काटेकोरपणे कशी अंमलबजावणी होईल यासाठी प्रयत्नशील अन् जागृत राहून त्याला लोकाभिमुख केल पाहिजे. कारण जाती, धर्म, प्रांतापेक्षा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय तसेच देशाची एकात्मता, अखंडता, धर्मनिरपेक्षता व आम्ही भारतीय, आम्ही भारताचे लोक हिच आपली ओळख अन् राष्ट्रीयत्व निर्माण झाले पाहिजे. देशातील सामाजिक सलोखा, देशाची एकता एकात्मता जोपासली जाऊन, धर्मनिरपेक्ष हि जागतिक ओळख जपली पाहिजे.

- मिलिंद कांबळे चिंचवलकर ९८९२४८५३५९      

Next Post

धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ ऑक्टोबर कि अशोका विजया दशमी?

बुध ऑक्टोबर 14 , 2020
   १४ ऑक्टोबर कि अशोका विजया दशमी.  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वच चळवळ क्रांतिकारी विचारावर आधारित होती.पण आजच्या सर्वच सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक आणि राजकीय चळवळीला वाळवी लागली.जो तो आपल्या परीने त्याची जाणीव पूर्वक वेगळी मांडणी करतो.ज्या प्रमाणे एक आंधळा हत्तीचे वर्णन करतो.जे […]

YOU MAY LIKE ..