सावधान प्रतिक्रांतीला सुरुवात..लॉर्ड बुद्धा TV करतेय हिंदुत्वाचा प्रचार …..!
आज सम्राट अशोक यांची जयंती ……!
बौद्ध धम्म जगभर पोहचवून त्याने तथागत बुद्धांच्या धम्म हजारो वर्षे जिवंत ठेवला …..!
कुठे तो महान राजा आणि आज नेमक्या त्याच्या च जयंती दिनी तथागत बुद्धांच्या नावावर व्यापार करणाऱ्या व त्यांचे नाव लावून भारतातील तमाम बौध्द धर्मियांच्या भावनेशी खेळणाऱ्या लॉर्ड बुद्धा TV या तथाकथीत tv चॅनेल्स ने हिंदु धर्माच्या भागवन श्रीकृष्ण यावर चक्क सिनेमा प्रदर्शित करून धम्म क्रांतीला प्रतिक्रांती केली आहे .हे धम्माच्या विरोधी कृत्य लॉर्ड बुद्धा TV वाले करत असून त्याचा महाराष्ट्र भारतातील सर्वच लोक निषेध व्यक्त करीत आहेत.
हा गलिच्छ प्रकार प्रसिद्ध समाजसेवक मा राजेश सावंत यांनी www.ambedkaree.com च्या लक्षात आणून दिला ….!
आंबेडकरी समाजात भावनिक आवाहन करून विविध समाज प्रसारमाध्यमे उभी राहिली आहेत समाजाच्या दानशूरपणाचा फायदा घेऊन नंतर ती प्रसार माध्यमे इतरांना विकून मोठा नफा कमावणारे हे लोक समाज व चळवळीशी गद्दारी करत आहेत .
याविषयी मा राजेश सावत यांनी त्यांच्या फेसबुकवर लिहिलेला हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत.
#लॉर्ड बुद्धा चॅनलवर ”
श्री कृष्णा” हा पौराणिक काल्पनिक चित्रपट चालू आहे..
लॉर्ड बुद्धा टिव्हीचे मालक सचिन मुन व भैयाजी खैरकर सारख्या लोकांनी समाजाकडे भावनिक हात पसरून भाषणे करून करोडो रुपये उकळून लॉर्ड बुद्धा चॅनल उभारून सुरू केले.खरंतर डॉ.आंबेडकर आणि बुद्धांच्या अर्थात महामानवांच्या नावानेच करोडो रुपये जमा केले आणि अाज वैज्ञानिक डोळस विचारांच्या लॉर्ड बुद्धा नावाच्या चॅनलवर #श्री कृष्णाचा चित्रपट दाखवला जातो. विविध काल्पनिक जाहिरात दाखविल्या जातात…हे नक्कीच क्लेशदायक आहे..अरे मूर्खानो, हे चॅनल तुम्ही विकलं असेल,विकताना तरी लॉर्ड बुद्धा हे नाव तरी बदला असा क्लॉज टाकने गरजेचं असताना लॉर्ड बुद्धा चॅनलवरचं धर्मा विरोधी काल्पनिक कृत्य चित्रपट दाखविण्याच धाडस कुणी केलं नसते..हे तर षडयंत्र आहे.असं आम्ही समजतो. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर,
बुद्धांच्या विचाराला फाटा देत देऊन समाजद्रोही भूमिका घेणाऱ्या मूर्ख मानसिक व्यक्ती अर्थात भैयाजी खैरकर व सचिन मुन यांचा जाहिर निषेध करतो.
राजेश सावंत
सोबत लिंक ही देत आहोत
https://www.facebook.com/100001736957011/posts/2952671998134003/