वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न
अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
मुंबई ( प्रतिनिधी ) :- महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात आणि सर्व समाज घटकांचा प्रतिसाद पाहता आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संलग्न सामाजिक संस्था, संघटना, मंडळे, तालुका शाखा, समन्वय समिती यांची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते जनार्दन पोइपकर यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर भवन येथे शनिवार दि. ३१ अॉगस्ट २०१९ रोजी संपन्न झाली. बैठकीला जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता यावेळी सर्व संघटनांनी आपली एकसंघ निर्णायक शक्ती निर्माण करुन, बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे असा निर्धार सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात केला त्याला सर्व उपस्थितांनीही पाठिंबा दर्शविला. तसेच ७ सप्टेंबर २०१९ रोजी बाळासाहेब आंबेडकर अथवा आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने सत्ता संपादन मेळावा आयोजीत करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.
आम्ही ज्यांना मोठ केलं त्यांनी आमच्यासाठी काय केले असा प्रश्न उपस्थित करुन, निवडणूका झाल्यावर आपल्याला कोणीचं जवळ करत नाहीत याची जाणीव करुन देत, आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र आलेचं पाहिजे, त्यासाठी आपली भूमिका काय असली पाहिजे हे निश्चित करुन, वंचित बहुजन आघाडीचा विचार करता बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे आपली निर्णायक ताकद कशी उभी राहिल याचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे असे आवाहनात्मक मनोगत बैठकीचे प्रमुख निमंत्रक बाळकृष्ण जाधव यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात व्यक्त केले. तर सिंपनचे जिल्हाध्यक्ष अनिल तांबे यांनी आंबेडकरी चळवळीच्या पडझडीबद्दल नाराजी व्यक्त करुन, यापुढे आपले सर्वांचे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकरचं असले पाहिजे असे ठामपणे वक्तव्य करुन, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एक पत्रक काढून बाळासाहेब आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका प्रत्येक गावात पोहोचवली पाहिजे तसेच वंचित बहुजन आघाडीशिवाय इतर कोणालाही मतदान होता कामा नये असे आदेश काढले पाहिजेत असे मत व्यक्त केले. तसेच भारतीय बौद्धमहासभा सिंधुदुर्ग माजी जिल्हाध्यक्ष भिकाजी वर्देकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिवर्तन करायचे असेल तर सर्व संघटनांनी एकत्र आलेच पाहिजे, कोणतीही गोष्ट संघटीत झाल्याशिवाय शक्य नाही असे मत व्यक्त करुन, बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणार नाही याची उपस्थितांना जाणीव करुन दिली.
सदर बैठकीचे सुत्रसंचालन आणि उपस्थित मान्यवरांचे आभार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवा नेतृत्व प्रमोद नाईक यांनी केले. यावेळी अध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील जनार्दन पोइपकर, नाट्यकर्मी दत्ता पवार, डॉ. आनंद कासले, सुरेश पगारे, सत्यविजय तांबे, रुपेश पुरळकर, विलास कोळपेकर, अशोक कोठलेकर, दिपक कोर्लेकर, सुशील बेळणेकर, अनिल पळसंबकर, मंडणगड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रवि जाधव, अशोक कदम, भगवान खांबाळेकर, एस. एस. मुंबरकर, अशोक शेर्पेकर, विजय नाईक इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. बौद्धाचार्य, भीमशाहिर विजय कदम, गौतम साळिस्तेकर, राजेश किर्लोसकर, किशोर डामरेकर, विजय कुरंगवणेकर, अरुण जाधव, प्रकाश करुळकर, चंदन सांगुळवाडकर, पराग शेर्पेकर, अशोक जवळेथकर, लक्ष्मण चौकेकर, दिपक कुणकवणकर, धनाजी कुसुरकर, धर्मेंद्र पवार, आनंद तांबे, सोनू कुसुरकर, राजेंद्र असलदेकर, दिलीप तरंदळेकर, आनंद उंबर्डेकर, महेंद्र हरकुळकर, सत्यविजय तांबे, सुरेश साळिस्तेकर, विजय जाधव, जनार्दन जाधव, आर. एस. मिठबावकर, राजू कदम, लवेश बेळणेकर, यशवंत चौकेकर, विजय कदम, अशोक शशिकांत कदम, रत्नदिप म्हापणकर, नारायण जाधव, बबन शिंगे, जितेंद्र साळुंके, सुभाष कदम, मिलिंद चिंचवलकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.