जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेच्या अनोख्या उपक्रमातून कोरोनाच्या काळात इंटरनेट व स्मार्ट फोनच्या माध्यमातून राबविले अनोखे उपक्रम.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेच्या अनोख्या उपक्रमातून कोरोनाच्या काळात इंटरनेट व स्मार्ट फोनच्या माध्यमातून राबविले अनोखे उपक्रम.

अंबरनाथ ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मा अनघा आनंद सोनकांबळे यांनी शाळेतील विध्यार्थी वर्गाला मार्च ,एप्रिल ,मे ,जून या महिन्यात घरच्या घरी राहून व्हाट्सएपच्या,झूम आप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतर्गत शिक्षणाच्या अत्यंत महत्त्वाचा वापर करून अमर्याद टाळेबंदीत सरकारी शाळेत अनोखा उपक्रम राबविण्याचे कार्य केले आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती देताना सौ सोनकांबळे मॅडम म्हणाल्या की

मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत मुलांनी विविध कलाकृती,आवड ,छंद जोपासून त्या व्हाट्सएप ग्रुपवर पाठविल्या हे सगळे सुप्तगुण,छंद,कलाकुसरता पाहून मला खूप आंनद झाला.

१६ मार्चपासून संपूणच देशात लाॕ कडाऊन सुरु झाले. लाॕकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधीसाठी सौ.अनघा आनंद सोनकांबळे,(जि.प.शाळा-ढोके
दापिवली,ता.अंबरनाथ,केंद्र -मूळगाव,जि.ठाणे)यांनी या आपात्कालीन लाॕ कडाऊन सुट्टीचा अभ्यास सर्व
विद्यार्थ्यांना दिला. १ एप्रिल पासून शाळा सुरु झाली की ,विध्यार्थ्यांना द्वितीय सत्राच्या परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु करणार होतो.पण ताळेबंदी पुन्हा वाढजवले गेले. या दरम्यान कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोगाबाबत गावांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी,घोषवाक्ये फलक व घोषणा ,पथनाट्य व जनजागरनीत ,संपूर्ण
ग्रामस्थना याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. लाॕकडाऊन वाढविल्यामुळे सदर परिस्थिती लक्षात घेऊन मी दि .२ एप्रिल २०२० पासून इ.१ ली ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्हाट्सएप ग्रुप गृप तयार केला आणि परीक्षेचा अभ्यास म्हणून पोस्ट करत गेली या उपक्रमाला विध्यार्थीवर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत गेला.शासनामार्फत सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे व्हाट्सएप ग्रुपवर टाकलेल्या माहिती,अभ्यास व प्रथम सत्र यांचे एकत्रित मुल्यांकन करून निकालपत्र बनविण्यात आले.

मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत मुलांनी विविध कलाकृती,आवड,छंद जोपासून त्या व्हाट्सएप ग्रुपवर पाठविल्या हे सगळे सुप्तगुण,छंद,कलाकुसरता पाहून मला खूप आंनद झाला.

मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत शाळेत शिल्लक असणारा शालेय पोषण आहार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सदस्य ,पालक यांच्या हस्ते फिजिकल डिस्टन्स ठेऊन वाटप केले

कोरोनावर निबंध,चित्रें,स्वानुभव कथन इत्यादी उपक्रम विद्यार्थ्यांनी व्हाट्सएपवर सादर केले.

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५जून २०२० पासून झाली परंतु ताळेबंदी कायम असल्याने प्रत्येक शिक्षकाना मिळालेल्या आदेशानुसार १५जून ला शाळा सुरू केल्या त्या दिवशी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक झाली त्यात ठरल्याप्रमाणे शाळा बंद ठेवण्याचे सरकार ने ठरविले मात्र विध्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके फिजिकल डिस्टन्स ठेऊन वितरण पालकामार्फत करण्यात आले.

पुढे नाविन शैक्षणिक वर्षाची प्रक्रियेची सुरुवात ऑनलाईन च्या माध्यमातून सुरू झाली..खालील प्रमाणे पत्रकाद्वारे त्यांनी www.ambedkaree.com कडे प्रकाशित करण्यासाठी पाठविले .

 

शब्दांकन : किरण तांबे ,बदलापूर

Next Post

मुलींना आत्मनिर्भर बनवा, घेऊ द्या आकाशात उंच भरारी.

सोम ऑगस्ट 3 , 2020
मुलींना आत्मनिर्भर बनवा, घेऊ द्या आकाशात उंच भरारी. जस्टीस फॉर वैष्णवी…. अशा आशयाची बातमी वाचताच अंगात कापरं भरलं.. विचार आला की, आता कोणत्या वैष्णवीचा गळा घोटला गेला… कोणत्या वैष्णवीच्या स्वप्नाचा भंग केला.. कोणत्या वैष्णवीला हे सुंदर जग सोडून जावं लागलं.. काल्पनिक […]

YOU MAY LIKE ..