मी भिक्षु का झालो -डॉ. भदंत आनंद कौसल्यायन

मराठी भाषांतर आणि लेख प्रा. संदीप मधुकर सपकाळे



आज डॉ. भदंत आनंद कौसल्यायन ह्यांच्या जयंती निमित्त हिंदी-भाषा-वाङमयाचे अनन्य लेखक आणि बौद्ध साहित्य तसेच पाली भाषेचे विद्वान भिक्षु डॉ. भदंत आनंद कौसल्यायन ह्यांच्या समृद्ध आणि विपुल हिंदी लेखनात संस्मरणे फार महत्वाची आहे. ह्या संस्मरणात्मक लेखना मधे ‘तथागत का शास्वत संदेश’ पुस्तकातून ‘मैं भिक्षु क्यों हुआ’ ह्या संस्मरणाचे मराठी भाषांतर आणि लेख प्रस्तुत करीत आहे प्रा. संदीप मधुकर सपकाळे.

जवळपास बत्तीस वर्षा पूर्वी मी ‘भिक्षु का पत्र’ लिहले होते.
त्या मधे मी असे लिहिले होते कि “मनुष्य कोणते ही कार्य एका पेक्षा अधिक कारणांमुळे करीत असतो. तसेच कोणते ही एक पाऊल तो खूप वेळ विचार करूनच उचलत असतो”
मला आठवण येते आहे की माझ्या विद्यार्थी जीवनात प्रसिद्ध देशभक्त लाला हरदयाल एम.ए. लिखित एक पुस्तक वाचले होते त्या मधे त्यांनी शिक्षणा संबंधी आपले विचार मांडले होते. त्या मधे एक परिच्छेद होता ‘पेशो का चुनाव’ म्हणजे ‘कामाची निवड’ माणसाला आपले काम निवडता वेळी ज्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्या मधे लाला हरदयाळ यांनी निर्णय केला कि आपण तेच कार्य निवडले पाहिजे ज्यामुळे समाजाची सेवा अधिकाधिक करता येईल. पण असे करीत असतांना मात्र आपल्या जेवण्या खाण्या आणि कापडाचा भार कमीत कमी समाजावर येईल. त्यांनी कोणत्याही कामा संबंधी असलेले चांगले किंवा वाईट मानदंड असेच स्वीकार केले होते.


माझे शिक्षण संपवून मी कामाच्या शोधत निघालो मला आठवत की मी माझ्या जवळपास असणाऱ्या कॉलेजात शिकणाऱ्या हजारों युवकांच्या बद्दल विचार करीत होतो. मला वाटत होते की आम्ही लोक शिकून झाल्यावर कोणत्यातरी ऑफिसात कारकुनाची नौकरी करणार आणि ह्या मधे दिवस रात्र असे बांधल्या जाऊ जसे ‘कोल्हू मधे बैल’ बांधला जातो. लग्न होणार, मूल होतील, मीठ तेल आणि लाकडाचे हिशोब असणार आणि शेवटी वैकुंठवारी. हेच असणार आमच्या सारख्या हजारों युवकांचा इतिहास. मी ‘अश्याच लकिरचा फकीर’ मात्र बनून राहणार नाही मला जीवनात काहीतरी साहसिक कार्य करायचे आहे.


मला आठवत की आर्य समाजाचा वेदांना अपौरुषेय आणि सर्व विद्येचे भांडार मानण्याच्या सिद्धांताने माझ्या मनात विचित्र खळबळ उठवली होती. मी विचारात होतो की वेदांमधे सर्व ज्ञान आहे मग सर्व कामे सोडून मला वैदिक संस्कृत शिकली पाहिजे. मी आर्य समाजाच्या पंडितांना प्रश्न विचारात होतो. महाराज वेद शब्दाचा अर्थ नेमका काय ? कारण मी बघत होतो की कधी कधी ते वेदाचा अर्थ चार पुस्तके अर्थात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आणि ज्ञान असे सांगायचे. मला आठवण आहे आणि आज सुद्धा माझ्या सार्वजनिक जीवनाच्या पहिल्या एक दोन वर्षाचे अनुभव मला अजून लक्षात आहेत ते विसरू शकत नाही. मला वाटले की देशसेवेच्या क्षेत्रात तीच धांदली आहे जी अन्य क्षेत्रांत होऊन बसलेली आहे. ज्यांनी जन्मभर जगाचे ऐश आणि आराम लुटलेले आहेत आणि लोकांच्या घामाची कमाई लुटून आप आपली घरे भरली आहेत त्यांनी आपले पाय कबरीत असतांना आपल्या जमवलेल्या अश्या दौलतीतून काही तरी देऊन शेवटच्या क्षणी स्वतःला त्यागमूर्ती म्हणून घेतात. अश्या त्यागमूर्ती लोकांन समोर आपल्या मिळकतीतुन निरंतर दान देणारे आणि सतत देशसेवा करणारे खरे देशभक्त नाममात्र होऊन राहतात.


ह्या धांदलीची आणखी एक बाजू आहे. ज्यांच्या घरी खाण्यापिण्याची व्यवस्था आहे जे सार्वजनिक पैशयातून गळेलट्ठ वेतन घेत असतात ते जर मोटारीतून प्रवास करून वर्गणी मागत निघाले तर त्यांना भरघोस रक्कम मिळते. त्यांनी जर सार्वजनिक पैशांचा जरी अपव्यय केला तरी त्यांच्या बद्दल डोळे झाकून व्यवहार केला जातो. मात्र जो गरीब घरात जन्मलेला आहे त्यांनी जर सार्वजनिक पैशयातून आपली कामभराची रक्कम जारी घेऊन पुनीत कार्यासाठी जरी वर्गणी मागायला निघाले तरी ते काहीही एक करू शकत नाही आणि त्यांच्या हातून जर सार्वजनिक पैशयातून एक रुपया सुद्धा इकडे तिकडे झाला तर ते कुठेच तोंड दाखवायच्या लायकीचे राहत नाही.


ह्या बाबतीची धांदल बद्दल माझ्या मनावर काहीसा असा प्रभाव पडला की देशसेवेच्या क्षेत्रात धनिक लोकांनाच स्थान आहे किंवा मोठ मोठे पगार मिळवणाऱ्या लोकांना.
त्याचा परिणाम असा झाला की माझ्या सार्वजनिक जीवनाच्या प्रथम वर्षी मी मौन दृढ संकल्प केले की कोणत्याही संस्थेपासून जीवन यापान करण्यासाठी वेतन घेऊन देशभक्त नाही बनणार.


ज्या वेळ मी माझ्या जीवनाचे कोणतेही एक काम स्थिर केले नव्हते. ज्या वेळी आपल्या साहसिक जीवनाच्या प्रेमाठाई पैसा नसतांना सुद्धा संबंध भारताची चारिका केली होती त्या वेळी माझ्या हृदयात वेद किंवा कोणत्याही ग्रंथाला प्रमाण माणुन स्वीकार करावा की नाही ह्याचे द्वन्द्व चालत होते. त्या वेळी मी राहुलजीच्या प्रेरणेने आणि निमंत्रणाच्या बळावर सिंहल देशात पोहोचलो. तिथे जाऊन मला माहिती झाले की बौद्ध मात्र प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणाच्या आधारला माणतो. त्या मधे शब्द प्रमाणाला मुळीच जागा नाही. हे ऐकून आणि बघून माझ्या हृदयाची कळी उमळली.


शब्द प्रमाणाची तर अशी अवस्था झाली आणि आत्मा परमात्म्याचे काय ? राहुलजींनी ही गोष्ट माझ्या गळ्यात उतरवली की जर तुम्ही शब्द प्रमाण नाही माणत असणार तर तुमच्या साठी आत्मा आणि परमात्मा साठी कोणतेही स्थान राहून जात नाही. शास्त्रांची प्रमाणिकते सोबत आत्मा आणि परमात्मा सुद्धा निघून गेले.


अविवाहित राहून देश सेवेचे संकल्प होतेच पण जीवन निर्वाहासाठी कोणत्या निश्चित व्यक्ति किंवा संस्थेपासून काही न घेण्याचा निश्चय सुद्धा होता. आदर्श आणि व्यवहार ह्या दोन्ही गोष्टींना निभवू शकण्याची समस्या होतीच. पण मला वाटले ‘भिक्षु जीवन’ माझ्या प्रश्नाचे एकमात्र उत्तर आहे.
दहा फेब्रुवारी 1928 ला पूज्य गुरुवर्य लु. धम्मानंद ह्यांच्या हस्ते मला दीक्षा मिळाली. त्यानंतर एका वर्षाने भिक्षु-संघाने नियमपूर्वक उपसंपदा दिली. संपूर्ण जीवनात ह्या पेक्षा अफाट संपत्ति आज पर्यंत मला कुठेच मिळाली नाही.


जर त्यावेळ मी ज्या प्रकारचे भिक्षु जीवन ज्याची मी कल्पना केली होती त्या अनुरूपच व्यतीत झाले असे म्हणणे ही सत्य होणार नाही. माझ्या साधनेचा मार्ग कधीही समतल नव्हता. मला सुद्धा फार बारे वाईट बघावे लागले. मला संतोष मात्र हेच आहे की माझी आज सुद्धा माझ्या साधनेत अटळ श्रद्धा आहे.

आज फेब्रुवारी 1928 ला जवळपास पंचेचाळीस वर्षे झाली आहे. माणल्या जाते की जानेवारी महिन्यात माझा जन्म झाला आणि उपसंपदा फेब्रुवारीत. जातींच्या आणि राष्ट्रांच्या जीवनात पंचेचाळीस वर्षाची गणतीच नाही. पण माणसाच्या जीवनात मात्र पंचेचाळीस वर्ष नगण्य नाहीत. माझ्या मागील पंचेचाळीस वर्षाच्या जीवनाकडे बघितले तर मला कोणतीच असंतुष्टी वाटत नाही. ज्ञानर्जनासाठी आणि अनुभव गोळा करण्या साठी मी देश विदेशात फिरलो. आणि समाजाच्या ऋणातुन, उऋण होण्यासाठी पर्याप्त लेखणी घासली. पण काय मी समाजाच्या ऋणातुन मुक्त झालो ? माणूस आपल्या जिवंतपणी जर समाजाच्या ऋणातुन मुक्त होत असेल तर त्याच्या जीवनाला मग कोणता अर्थ राहत नाही. व्यक्ति हा समाजाची देणगी आहे. व्यक्तीला मात्र त्याची सभ्यताच नाही तर त्याची संस्कृति एक सामाजिक प्राणी असल्या नात्याने त्याला उत्तराधिकारात मिळाली आहे. व्यक्ति हा सर्वांशाने समाजापासून उऋण होऊच कसा शकतो ? सम्यक समबुद्धाने अर्हंत भिक्षुना सुद्धा बहुजन हिताय बहुजन सुखाय करीता विचरण करण्याचा आदेश केला आहे. ज्याचे मुळ आधार हेच आहे.


भाषांतर – प्रा.संदीप मधुकर सपकाळे,मराठी विभाग, साहित्य विद्यापीठ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा

Next Post

"भारतीय कामगार चळवळीचे जनक : नारायण मेघाजी लोखंडे" चरित्र ग्रंथाचे लोकार्पण.

शनी जानेवारी 23 , 2021
मनोहर कदम यांनी अनेक वर्षे संशोधन व अभ्यास करून भारतीय कामगारांचे आद्य पुढारी, भारतातील पहिल्या कामगार वृत्तपत्राचे संपादक व समाज क्रांतीकारक नारायण मेघाजी लोखंडे यांचे चरित्र १९९५ साली प्रकाशित केल्यानंतर जाणिवपुर्वक दुर्लक्षित केलेल्या आद्य कामगार चळवळीचा क्रांतिकारी इतिहास जीवंत झाला भारतातील […]

YOU MAY LIKE ..