शाहीर शंतनू..…
तुझा आवाज ,
अजून पोहचत आहे …..सर्वदूर,
जिथे हतबल जीव,
अन्यायाने भयभीत झालेत,
त्यांना नव्याने देत जाईल,
तुझ ते शाहिरी गीत…!,
तू आवाज होऊन,
लढत राहिलास,
शोषित-पीडितांच,
दुःख जगासमोर ,
मांडत राहिलास…!
तुझा विद्रोह …
अनादी काळाच्या व्यवस्थेला ,
हादरून गेला…!
अन तूला कडीकुलुपात ,
बंद केला -इथल्या,
माजोर मानसिकतेने..!
तो तुझा आवाज,
दाबला त्यांनी ….
पण त्यांना कुठे माहीत ?
तू पेरलेले हे विद्राहाचे…..!
बीज…….!
शोषितांच्या मनात रुजू लागलेय..!
तू गायचास ना-
“तू यावं तू यावं बंधन तोडीत यावं”
अगदी तसाच ,तो विद्रोह उफाळून येईल ,
कोठी कोठी……पीडित वंचित मनातून..!
-आपणास विनम्र अभिवादन…!
-प्रमोद रामचंद्र जाधव
-www.ambedkaree.com
त्यांच्या मृत्यूनंतर www.ambedkaree.com
ने प्रकाशित केलेली बातमी….