रत्नागिरीतील कुणबी नेतृत्व आणि माजी पोलीस अधिकारी मा.श्री मारुती जोशी काका यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघातून ‘वंचित बहुजन आघाडी’ कडून उमेदवारी जाहीर…!
कोकणात कुणबी समाजाचे नेते आणि प्रबोधनकार तथा कोकणातील गाडगेबाबा म्हणून प्रसिद्ध असणारे जोशी काकांच्या नावाची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवार
म्हणून अड प्रकाश आंबेडकर यांनी करतातच कोकणातील सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता उत्साहित झाली .
विविध सामाजिक संस्था आणि लोकप्रियता असलेले जोशी काका म्हणचे एक वेगळेच प्रबोधन आहे .
ते नेहमीच फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा सांगत नाही तर ते स्वतः त्याचे पालन करतात असे आम्ही पाहिले आणि अनुभवले आहे .
जोशी काकांच्या उमेदवारी ने कोकणातील एक सर्वसामान्यातील असामान्य व्यक्तिमत्वाला न्याय मिळाला असे येथील जनतेला वाटत आहे .
www.ambedkaree.com परिवाराच्या वतिने शुभेच्छासह अभिनंदन सर !
-किरण तांबे
बदलापूर