पुस्तक अवलोकन
“आंधळ्या शतकातील दोन डोळे”
विसाव्या आणि एकविसाव्या शतकाच्या पूर्वेला भारतीय समाजव्यवस्थात मागासलेपण होता जगाला विज्ञानाचे ,धर्माचे ज्ञान देणारा भारत मात्र कमालीचा जातीव्यवस्था ,धर्मव्यवस्थेत अडकला होता ,सामाजिक असमानता मोठया प्रमाणात होती त्यावेळी विषमता माणसाचे माणूसपण नाकारत होती.त्याचे मुळ स्वरूप हे हिंदू धर्म परंपरेत अडकले होते .धर्म आणि जातीच्या विळख्यात संपूर्ण भारताची समाजव्यवस्था गुरफटली होती.
विविध प्रकारच्या सामाजिक क्रांत्या घडत होत्या,राजकीय चळवळीची ही सुरवात होत होती,ब्रिटिशांनी या देशात पूर्णपणे आपले पाय पसरले होते . अशावेळी सामाजिक विषमतेची दरी खूप मोठ्या प्रमाणात होती त्यातून माणसाचे जीवन कवडीमोल झाले होत लहान लहान जाती समूह ,त्यांच्या वर उच्च वर्णीय लोक अमानुषपणे अमानवी अत्याचार करत असत नेमक्या याच वेळी सार्वजनिक ठिकठिकाणी अस्पृश्य वर्गाला पाण्यावाचून,स्पर्शवाचून दूर ठेवले ठेवले जात होते.
नेमके याच वेळेची महात्मा ज्योतिबा फुल्यांनी समाजक्रांतीची सुरवात केली आपल्या घरातील हौद अस्पृश्य बांधवांना खुला केला त्यांना ज्ञानाची कवाडे ही खुली केली आणि समाजाला डोळस बनवायला घेतले हा बदल खूप क्रांतिकारक होता स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकवून सर्व स्त्रियांना त्यांनी शिक्षणाची कवाडे उघडली आज ज्या स्त्रिया प्रगतीवर आहेत त्याचै सारे श्रेय जाते ते राष्ट्रपिता महात्मा फुले याना .म्हणून ते या आंधळ्या शतकातील एक डोळा आहेत .
दुसरे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या समाजक्रांतीला पुढे नेत त्यांनी महात्मा फुले याना आपल्या गुरू स्थानी मानून त्यांचेच कार्यमोठ्या हिमतीने आपल्या अथांग ज्ञानभांडराने अन्याय अत्याचारा विरोधात लढे उभारून त्यांना हक्क मिळून दिले व विषमता कायद्याच्या माध्यमातुन कायमची हद्दपार केली . भारत देशातील जो सामाजिक ,धार्मिक आणि सांस्कृतिक असमान जगणारा वर्ग होता त्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य बहाल केले इथल्या स्त्रियांना,पीडित शोषित वर्गाला समान दर्जा देत एक व्यक्ती एक मत ही माणसांची केलेली किंमत खऱ्या अर्थाने माणसाला उत्कर्षाचा मार्ग ठरला .
पूर्वी राजा हा पोटातून जन्म घेत असे अत्ता इथला समान्य व्यक्ती आपला राजा निवडते.
ज्यांची काहीच किमंत नव्हती त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणारे खऱ्या अर्थाने भारतदेशातील समाजक्रांतीची एक दुसरा डोळा .
या दोन डोळ्या ना समोर ठेऊन प्रस्तुत लेखकाने आपले विचार मांडले आहेत .
भारतातील ज्या काही चळवळी केल्या जातील किंवा झाल्या आहेत त्याच्या केंद्रास्थानी या महामंवांचे विचार आहेत म्हणून ते या भारतवर्षातील दोन डोळेच आहेत हे लेखकाने सुचविले आहे .
पुस्तकाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रस्तावना आंबेडकरी चळवळीतील एक प्रेरक साहित्यपर्व असलेले मा ज वि पवार सरांची मनाला भिडणारी प्रस्तावना…!
सहज सुंदर मांडणी ,बोलके मुखपृष्ठ ……!
प्रस्तुत लेखकांनी आपल्या वृत्तपत्रात जे विविध लेख आणि विचार मांडले आहेत त्या सर्व लेखाचे संकलन या पुस्तकात केले आहे .
लेखक परिचय
लेखक प्रबुद्ध नेता या साप्ताहिकाचे संपादक आहेत . काही काळ त्यांनी भरीपचे कार्यालय सचिव म्हणून काम केले .चळवळीतील एक क्रियाशील कार्यकर्ते ही म्हणून ते ऐरोली आणि नवी मुंबई,ठाणे आणि मुंबईत सर्वपरिचित आहेत .
-प्रमोद रा जाधव
www.ambedkaree.com