वर्तमान सामाजिक परिस्थिती -ऍड प्रवीण पंडित

वर्तमान सामाजिक परिस्थिती
*******************************
ऍड प्रवीण पंडित www.ambedkaree.com
*******************************

आपल्यावर अन्याय होत आहेत आणि त्या मध्ये संपूर्ण समाज होरपळून निघत आहे. मांग, भटके व बौद्ध यांच्यावर होणारे हल्ले हे सामाजिक द्वेषातून होत आहेत. हा द्वेष आपली झालेली प्रगिती पाहून व आपल्या समाजात वाढत असलेली स्वाभिमानाची भावना या मुळे होत आहे . हे समजवून घेणे आवश्यक आहे .

माझ्या समोर दोन अनुभव आहेत.

पहिल्या मध्ये एक मुलीने ब्राह्मण मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा त्या मुलाची आई त्याला म्हणाली की तू चांभाराची किंवा अन्य कोणत्याही जातीची मुलगी केली असती तरी चालेल असते मात्र महारांची कशाला केली.

दुसरा अनुभव एक मुलगा मराठा आहे सर्व कसोटीवर फेल आहे त्याचे लग्न जमत नाही तरी त्याचे घरचे त्याला सांगतात की तु महारांची व मुसलमान सोडून कोणतीही मुलगी घरी घेऊन आला तरी चालेल .

दोन दिवसापूर्वी गावातील मुलीवर प्रेम होते म्हणून विराज जगताप या 20 वर्षाच्या मुलाची हत्या, त्या मुलीच्या घरातील लोकांनीं केली ही प्रकरणे अधिक वाढली आहेत.

अशा अनेक घटना घडत आहेत यावर सामाजिक संघटना ह्या काही काळ तीव्र विरोध करतात मात्र त्यावर पुढे सामाजिक भूमिका घेत नाहीत नंतर तो विषय फक्त भाषणात बोलला जातो.
आपल्या समाजावर होत असलेले अन्याय हे सामाजिक द्वेषातून होत आहेत.त्यांवर सामाजिक निर्णय घेणे व सामाजिक आंदोलन चालविणे गरजेचे आहे.

ते आंदोलन काही काळासाठी नसावे त्याचा पाठपुरावा करणे देखील गरजेचे आहे.कारण हा द्वेष, मागील हजारो वर्षे पासूनचा आहे.हा कमी करण्यासाठी राजकीय व सामाजिक पातळीवर सूत्रबद्ध कार्यक्रमाचे नियोजित केले पाहिजे व तो कार्यक्रम काही वर्षे चालविला पाहिजे. तेव्हांच यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे.

ऍड. प्रविण पंडित,
धम्मकाया फौंडेशन ,अंबरनाथ

Next Post

तपास अधिकारी काय बदलता? आधी एसीपीची उचलबांगडी करा!

गुरू जून 11 , 2020
अरविंद बन्सोड मारहाण- मृत्यू ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ तपास अधिकारी काय बदलता? आधी एसीपीची उचलबांगडी करा! ■ नितीन राऊत, वर्षा गायकवाड, संजय बनसोडे यांची प्रतिष्ठा पणाला ■ ======================== ◆ दिवाकर शेजवळ ◆ ======================== =========================== महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बरेच लांबणीवर गेले आहे. 22 जून […]

YOU MAY LIKE ..