यापुढे अपयशाचे खापर ‘ वंचित’ वर
फोडून नामानिराळे होता येणार नाही
विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी राजकीय वर्तुळात प्रचंड घालमेल होत असल्याचे दिसून येते. तर्कवितर्क मांडून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्याचा प्रयत्न होताना दिसतो. परंतु हा उत्साह ओढून ताणून आणलेला असल्याचे दिसून येते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत नाही. भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर देशभरात भाजपाच्या गोटात सामील होण्यासाठी रांगा लागल्या. त्यामुळे काँग्रेस -राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्ता राहतो की नाही याची जोरदार चर्चा झाली. या दोन्ही पक्षांचे नेते चिंताग्रस्त दिसत असतानाच त्याचे काही कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश कर्ते झाले. लोकसभेच्या निवडणुकीत वंचित आघाडीची स्थिती काँग्रेस -राष्ट्रवादी पेक्षा कितीतरी पटीने चांगली असल्याचे प्रस्थापित नेते मान्य करत असल्याने भविष्यात अर्थात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीसोबत काँग्रेसची युती होण्याची शक्यता वाटणे साहजिकच आहे. याचे कारण राजकीय नेत्यांमध्ये असलेला दांभिक अहंकार होय, जो चुकीच्या निर्णयामुळे, अपयशाच्या खडकावर आदळून राजकारणातून कायमचा नामशेष होणार आहे. गंमत अशी की, सत्ताधारी पक्ष या सर्वांना नंबर एकचा शत्रू वाटतो. असा शत्रू जो सर्वच आघाड्यांवर सध्यातरी प्रबळ आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी म्हणून मोर्चेबांधणी करण्याचे सोपस्कार सुरु आहेत. पण ही मोर्चेबांधणी भक्कम नाही. ज्यांच्या विश्वासावर बांधणी करायची त्यांची कधी वजाबाकी होईल याचा नेम नाही. कारण बेरीज,वजाबाकी आणि गुणाकार हा गणिती प्रकारच प्रस्थापित पक्षांनी ज्यांना मोठे केले.
कधीकाळी पक्षाने ज्यांच्यावर विश्वास टाकला असे दिग्गज नेतेच जर पक्षांतराच्या नावाखाली राजकिय फायद्यासाठी साठमारी करित असतील तर मग सामान्य कार्यकर्ता फटकून वागल्यास चुकिचे ते काय? नेमकी हीच भीती प्रस्थापित पक्षांना वाटत आहे. लक्ष्मण माने, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसेपाटील यांसारख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी निवडक मंडळी सोडली तर वंचित आघाडीचे तट अद्याप तरी भक्कम आहेत. त्यामुळे वंचित आघाडीतफुटटीची अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना काळजी वाटत नाही. मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात दररोज वंचित आघाडीचे बँक बॅलन्स वाढत आहे. चार महिन्यापूर्वी भारिप बहुजन महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वाखाली रांजणीतील अल्पसंख्याक समाजातील मोठा गट वंचित आघाडीत सामील झाला हे फार मोठे परिवर्तन म्हणता येईल. खरे तर मुस्लिम समाजाने काँग्रेसलाच आजवर पाठिंबा दिला हे वास्तव या समाजातील बुद्धीजीवींनी वंचित आघाडीत प्रवेश करताच मांडले होते.आम्ही दैनिक विश्वपथ मध्ये अल्पसंख्याक समाजाचे हे शल्य आमचे जालना जिल्हा प्रतिनिधी सचीन वाघमारे यांनी केलेले वृत्तसंकलन छापून काँग्रेसविषयीची भूमिका मांडलेली आहे.परंतु याचा ना काँग्रेसवर परिणाम झाला ना मित्रपक्षावर…. जागा वाटपाच्या नावाखाली व्यक्तिगत प्रतिष्ठेला प्राधान्य दिल्यामुळे पराभवास सामोरे जावे लागल्याचे शल्य आजही या पक्षांना सलत असेल. पण,राजकीय प्रतिष्ठेचा इगो यांच्या हाताखाली इतका चिकटला आहे की,तो बाजूला करतानाही प्रतिष्ठा आडवी येते.पण हि मंडळी एक विसरतात, हे नकली मुखवटे धारण केल्यामुळे जनतेच्या मनातून कायमचे उतरत आहात त्याचे काय?
P
या पार्श्वभूमीवर शिवसेना वंचितच्या भूमिकेवर लक्ष ठेवून आहे. वंचित आघाडीतील घटक पक्षांनी स्वबळावर विधानसभा सभेची निवडणूक लढविल्यास सेनेच्या फायद्याचे ठरणार असल्याचे कालच स्पष्ट केले असून,जर वंचित आघाडी स्वबळावर न लढता मैत्रीपूर्ण लढा देत असेल तर मात्र भाजपशी युती करण्यावाचून पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख तर आहेतच पण कटक्षासाठी किती दक्ष राहतात त्याचे उदाहरण देता येईल. उद्धव ठाकरे यांच्यापुढे सध्या काँग्रेस -राष्ट्रवादीचे आव्हान नसून युतीला कडवी झुंज देण्याची क्षमता फक्त आणि फक्त वंचित आघाडीतच आहे हे ओळखून असल्याने आगामी निवडणुकीत उमेदवार उभे करता़ यावेत यासाठी ही प्रतीक्षा आहे!
राज्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेस नेते काय करावे? बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या चेहरा नसलेल्या नेत्यांकडे पक्षाचे अध्यक्षपद दिले! नावाप्रमाणेच बाळासाहेब थोरात हे बाळबोध वाटत असून त्यांचा जनमानसात प्रभाव पडणारा नाही. गंमत अशी की,नाकावर बसलेली माशी हाका येत नाही अशी व्यक्ती आणून राज्य काँग्रेसने काय साधले? आमदार जगताप किंवा सचीन सावंत यांच्यासारखे अनुभवी व सातत्याने जनतेशी संबंध असलेल्या उमद्या नेत्यांना का संधी दिली नाही अथवा देण्याचा प्रयत्न केला झाला? आज तरी काँग्रेस असो की वंचित… दोन्हीही पक्षांनी आपापल्या भूमिकांना मुरड घालण्याची गरज आहे.
स्वबळावर लढण्याची ही वेळ नाही. जागांच्या प्रतिष्ठा वविषयाचेअट्टाहाससात रूपांतर झाल्यास फार मोठी किंमत चुकवावी लागेल,हे काँग्रेसने समजून घेणे गरजेचे आहे.२०१४ च्या निवडणुकीत जनतेने धोबीपछाड दिल्यामुळे काँग्रेसला हात चोळत बसावे लागले. त्यामागील कारणांची मी चर्चा करणार नाही.पण या लेखाचा समारोप करताना काँग्रेसला आठवण करून दिलीच पाहिजे.ते न केल्यास कदाचित ती माझ्याशी मीच प्रतारणा केली असे होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्यावेळी पुण्यातील दिग्गज नेते, सुरेश कलमाडी यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणाने सुरुवात झाली आणि काँग्रेसवर ठपका बसला तो कायमचाच. जनमत सांभाळणे फार जिकिरीचे असते. प्रतिमा जपताना जनमताला तडा जाणार नाही याची काळजी घेतली नाही तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागते. म्हणूनच आगामी निवडणुकीत पराभव झाल्यास वंचित आघाडीवर खापर फोडता येणार नाही.
गुणाजी काजिर्डेकर,चेंबूर
सोमवार दिनांक १७ जुलै २०१९