वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन निर्धार रॅलीचा समारोप कोल्हापुरात झाला.व ब आघाडीची सत्ता संपादन रॅली नागपूर तेथून सुरू झाली होती .म अण्णाराव पाटील या रॅलीचे नेतृत्व करत होते त्याची सांगता काल कोल्हापूर येथे व ब आ चे नेते आड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
नागपुर ते कोल्हापुर असा या रॅलीचा मार्ग होता. विदर्भातील शेतकरी, दुष्काळाचा प्रश्न, कापूस शेतकऱ्यांचा प्रश्न असे अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.
छ. शाहूंच्या कोल्हापुर नगरीत या रॅलीची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी मंचावर रॅलीचे नेतृत्व करणारे आण्णाराव पाटील, डॉ. य़शपाल भिंगे, नवनाथ पडळकर, आनंद चंदनशिवे, शिवानंद हैबतपुरे, हाजी अस्लम सय्यद, डॉ. अरुणा माळी यासह मान्यवर उपस्थित होते.