Free education होय ……!
कल्याण पूर्वेतील शिल्ड या स्वयंसेवी संस्थेने राबवला अनोखा उपक्रम….!
जून महिन्यात वर्षी १७ जून ला शाळा सुरू झाल्या या पहिला दिवशी,जानेवारी पासुन कल्याण डोंबिवली मधील वस्त्यान मध्ये गोर गरीब मुल ज्यांचं पैसे नसल्या मुळे शिक्षण थांबलं होतं त्या सर्व ३० मुलं मुलींचं survey करुन , शिल्ड संस्थे मार्फत स्वामी विवेकानंद विद्यालय कोळसेवाडी कल्याण पूर्व मध्ये
मुफ्त admission मिळवून दिलेय.
तसेच १०० विद्यार्थ्यांचं admission आपण करणार आहोत असे द शिल्ड या संस्थेचे क्रियाशील पदाधिकारी प्रशांत आशा जाधव यांनी माहिती दिली. ते म्हणाले की द शिल्ड ने विध्यार्ध्यांचे अडमिशनच नव्हे तर त्याच बरोबर विद्यार्थ्यांना व्ह्या पुस्तके स्कूल बॅग्ज आणि बस ची योय ही संस्थेने केली आहे.
कल्याण पूर्व विभागातील काही होतकरू तरुणांनी पुढे येत द शिल्ड नावाची स्वयंसेवी संस्था उभी केली सुरुवातीला बौद्ध विहारात धम्म प्रचार अन प्रसार ,धम्म शिक्षण यावर Bहार दिला गेला ,पुढे या कामात वस्त्या वस्त्यातील कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला पुढे विविध प्रश्नांवर काम करण्यास सुरुवात केली कल्याण पूर्व विभागात द शिल्ड प्रत्येक बौध्द अन बहुजन वस्त्यांमध्ये कार्य करून लोकप्रिय होत आहे.
द शिल्ड मध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते हे सामाजिक जाणिवा असणारे चळवळीतील लोक आहेत .त्यांना आपल्या समाजाचे प्रश्न अन त्यावर उपाय माहीत आहे .
बऱ्याच वस्त्यात आर्थिक अडचणीमुळे मुले शिक्षण पूर्ण करत नाहीत पुढे हीच मुले कलागुणात पुढे असतात पण शिक्षणात मागे असतात अश्या होतकरू मुलांना समाजाचे सहकार्य हवे असते मात्र नेमके समाजात अशी व्यवस्था निर्माण होत नाही आणि मग समाजाकडे एका वेगळ्या पद्धतीने पाहिले जाते .
सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना याची जाण असते मात्र त्या वर काम करणे महत्त्वाचे असते ते एक पाऊल द शिल्ड ने आता टाकले आहे .
द शिल्ड च्या या नव्या उपक्रमाचे www.ambedkaree.com स्वागत करीत आहे अन त्यांना शुभेच्छा ही देत आहेत.www.ambedkaree.com द शिल्ड बरोबर सुरुवातीला ही होतो अन अत्ता ही आहेच.
द शिल्ड आपण करीत असलेल्या कार्याला अधिकाधिक प्रतिसाद मिळो हीच अपेक्षा.
-प्रमोद रा जाधव
www.ambedkaree.com