सुषमाताई अंधारे यांच्यावर भ्याड हल्ला…….!

सुषमाताई अंधारे यांच्यावर  भ्याड हल्ला…….!

 

       काल इंदौर ची सभा आटपुन सुषमाताई व योगेश दादा लोखंडे आणि सहकारी रात्री उशीरा घरी परतत असताना अचानक एक गाडी त्यांचा पाठलाग करु लागली. योगेश दादा ने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला परंतु मागच्या गाडीत असणाऱ्या हल्येखोरांनी सुषमाताईंच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्या मागील  आसनावर असल्यान त्यांना मार लागला आहे.

मध्य  प्रदेशातील इंदोर ला कारने गेल्यावर तीथुन सभासंपल्यावर जेवण न घेताता पुढील प्रवासासाठी इंदोर पासुन १५ किमी तर  महुपासुन ११ किमीवर महुकडे रवाना होतांना  हा प्रकार रात्रीच्या वेळी घडला. त्यांच्या कारचा पाटलाग करण्यात येवुन काही क्षणात लक्षात  येण्या अगोदर हा प्रसंग घडला असे सोबत  असणारे योगेश यांनी FB च्या  माध्यमातुन कळविले बंधु योगेश यांनी हल्लेखोरांच्या गाडीच्या नबर सोशल मिडियावर प्रकाशत केलाय. हल्लेखोर कोण आहेत व नेमका त्यांचा काय उद्देश आहे हे तपासांती कळेलच पण तुर्तास चळवळीची निर्भिडपणे धुरा वाहणार्‍या सुषमा ताई बालबाल बचावल्या आहेत. 

विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे मात्र कुणीकुणाच्या जीवावर उठु नये. कायदा व सुव्यवस्था कशी ढासाळत आहे याचे हे झंणझणीत उदाहरण आहे.

 

प्रा. सुषमाताई अंधारे वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत .

 चळवळीत घाडीवर काम करणार्‍या माणसांवर हल्ले करुन चळवळी दहशद पसरवण्याचा हा प्रकार आहे .अशा भ्याड  हल्लेखोरांना अटक होण्याची  गरज आहे. 

   गेल्या कित्येक वर्षांपासुन आंबेडकरी चवळीत  प्रबोधनाचे आणि नवचेतना निर्मिण करण्याचे कार्य सुषमाताई अंधारे एकखांबी  करत आहेत. आंबेडकरी चळवळीत सध्या त्या प्रभावशाली आहेत. कित्येक सामाजिक संस्था,मंडळे त्यांची भाषणे आयोजित करत असतात  आपला मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडणार्‍या सुषमाताई  म्हणजे आंबेडकरी तरुणाई चा आवाज आहे. सोशल मिडिया आणि त्याचा प्रभावीपणे चळवळीकरीता योग्य वापर त्या करीत आहेत.

आंबेडकरी चळवळीतुन या हल्याचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी चळवळीतुन होत आहे. 

—शितल प्रमोद जाधव

 

 

Next Post

भिडे गुरुजींच्या अटकेसाठी मंत्रालयाच्या गेट जवळ आत्मदहनाचा प्रयत्न

गुरू मे 3 , 2018
भिडे गुरुजींच्या अटकेसाठी मंत्रालयाच्या गेट जवळ आत्मदहनाचा प्रयत्न रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता गणेश पवार पोलीसांच्या ताब्यात मुंबई : संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या गणेश पवार नावाच्या कार्यकर्त्याने आज दुपारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेद्वाराजवळ अंगावर राॅकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न […]

YOU MAY LIKE ..