“थेरवाद परंपरेतील महत्त्वाच्या दोन लेण्या…!”.

“थेरवाद परंपरेतील महत्त्वाच्या दोन लेण्या…!”.
*****************************
सूरज रतन जगताप-www.ambedkaree.com

प्रत्येक लेणी आपले स्वतःचे एक वैशिष्ट्ये जपून आहे, महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या हजारो लेण्यांचा आपण वारंवार उल्लेख करतो.
प्रत्येक लेणी तसे आपले एक वैशिष्ट्य जपून आहे पण त्यातल्या त्याल दोन लेण्यांकडे आपले सर्वांचे लक्ष मी वेधू इच्छितो , दोन्ही लेण्या लोणावळा जवळील मावळ तालुक्यात आहे. “भाजे लेणी” व “कार्ला लेणी”.

१) “भाजे लेणी”-

महाराष्ट्रात जेव्हा लेण्या खोदण्यास सुरूवात झाली त्याच्या आरंभी च्या काळातील ही लेणी, २२ गटांचा हा लेणी समूह असून या लेणीतील वैशिष्ट्य म्हणजे या लेणीत असलेला स्तूपाची चमक त्याची झिलाई आजही कायम आहे.

भारताच्या कानाकोपर्‍यात चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या आज्ञा स्तंभावर जी चमक आहे तशीच चमक या स्तूपावर आजही आपल्याला पाहायला मिळते.
( अगेट या दगडाने घासून गुळगुळीत करून त्याला झिलाई आणली जात होती. )अन्य कोणत्याही लेणीच्या स्तूपावर अशी झिलाई /चमक आपल्याला पाहायला मिळत नाही.

२) “कार्ला लेणी” –

थेरवादा परंपरेतील ( शिल्पकलेच्या दृष्टीने ) शेवटच्या काळातील लेणी म्हणजे कार्ला लेणी, कार्ला लेणीचे चैत्य हे खूप प्रशस्त व कोरीवकाम केलेले आपण पाहतो.सुरवातीच्या काळात खोदण्यात आलेल्या लेण्या खूप साध्या पद्धतीच्या होत्या.

जशी शिल्पकला विकसित होत गेली तसे नंतर त्या कोरीवकामांनी अलंकृत करण्यात येऊ लागल्या, त्यावर त्या काळातील “शेठ भूतपाल” ( लेणीला दान देणारा व्यापारी ) म्हणतो की “जंबुद्विपातील सर्वात उत्कृष्ट अशी ही लेणी आहे”. ( आपल्या देशाचे नाव तेव्हा “जंबुद्विप” असे होते )असे उदगार कोणत्याही लेणीच्या संदर्भात आपल्याला ऐकायला मिळत नाही. ही एकमेव लेणी आहे जिच्या शिलालेखात आपल्या वाचायला मिळते.

सातवाहन राजे त्या काळी राज्यकर्ते होते व त्यांनी या परिसरातील गावांचे महसूल या लेणीला दान स्वरूपात दिले होते.चिवर , शिक्षण आणि औषधांच्या करता मोठ्या प्रमाणावर व्यापारी सामान्य जनता ही दान करत असत.

या दोन्ही लेणीत जे “सागवानी लाकडी आर्च”आहेत ते आजही तसेच सुस्थितीत आहेत.

सूरज रतन जगताप -मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली , नवी मुंबई -९३२०२१३४१४

Next Post

संग्राम पगारे : झंजावाताचा साक्षीदार

शनी एप्रिल 25 , 2020
संग्राम पगारे : झंजावाताचा साक्षीदार ********************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com संग्राम पगारे. सध्या मुक्काम येवला आणि पुणे. हिंदुस्तान पेट्रोलियमचा माजी कर्मचारी. पँथरच्या फाटाफुटीनंतर भाई संगारे यांचा एक झुंजार पँथर आणि लॉंगमार्चनंतर दिवसागणिक तीव्र होत गेलेल्या नामांतर आंदोलनातील सेनानी.आमचा ज्येष्ठ सहकारी. […]

YOU MAY LIKE ..