ठाण्यातील आंबेडकरी नेते सुनील खांबेचा EVM मशीन विरोधात निषेध…..पोलिसांनी घेतले ताब्यात.

1

देशभरात EVM मशीनच्या विरोधात आंदोलन होत असतात .बरेच पक्ष आणि त्यातील लोक आणि विबिध कार्यकर्ते यावर आक्रमक होत असतात .

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुक आज पार पाडत असताना ठाणे पश्चिम येथील सिव्हिल हॉस्पिटल जवळील निवडणूक केंद्रात आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेते मा सुनिल खांबे मतदान केंद्रात जाऊन प्रत्यक्ष आपला निषेध नोंदवला त्या प्रसंगी निवडणूक कर्मचारी यांकडील निळी शाही हिस्कावुन त्यांनी EVM मशीन वर आणि मतदान केंद्रात शाही भिरकावून आपला निषेध नोंदवला .

अचानक घडलेल्या प्रसंगाने निवडणूक केंद्रातील वातावरण तापले उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले .


शाही भिरकावून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ……EVM मशीन मुर्दाबद अशा घोषणा देत त्यांनी निषेध नोंदवला .हे करताना ते म्हणाले मी मला फाशी झाली तरी चालेल मात्र मी निषेध नोंदवला ….!
लोकशाहीची थटा करणाऱ्या EVM मशीन बद झाले पाहिजे .
दरम्यान ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे .

आंबेडकरी तरुणातील थग धग अखेर सुनिल खांबे या खंबीर नेत्याने पुढाकार घेऊन व्यक्त केलीय.त्यांचा हा आक्रमकपणा पाहून अनेकांना पँथरच्या काळाची आठवण झाली.

कोण आहेत सुनील खांबे ?:
ठाणे खोपट ,कोर्ट नाका परीसरात ते सामाजिक ,राजकीय आणि विविध सामाजिक कार्य करीत असतात. धम्म चळवळ आणि राजकीय चळवळीत असणारे सुनील खांबे ठाणे जिल्यातील तरुणाचे आवडते नेतृत्व आहेत.आंबेडकरी चळवळीत त्यांना युवकांनी कर्मवीर ही पदवी बहाल केली आहे.

आपल्या विभागात विविध महामानवांच्या जयंत्या मोठ्या उत्साहाने आणि लोक प्रबोधन करून ते साजरी करतात. आरपीआय, बसप आणि इतर पक्षामध्ये सतत सक्रिय असणारे खांबे आंबेडकरी चळवळीतील आक्रमक तरुण नेतृत्व म्हंणून प्रसिद्ध आहेत.

One thought on “ठाण्यातील आंबेडकरी नेते सुनील खांबेचा EVM मशीन विरोधात निषेध…..पोलिसांनी घेतले ताब्यात.

  1. Effective protest .
    Today India requirs more Sunil Khambe to keep Democracy alive.

Comments are closed.

Next Post

राज ठाकरे यांचे कोण ऐकतो!...!

मंगळ ऑक्टोबर 22 , 2019
राज ठाकरे यांचे कोण ऐकतो!.- ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com राज ठाकरे यांनी एकट्यानेच ‘नो ब्यालट पेपर, नो इलेक्शन’ अशी भूमिका घेत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असा प्रस्ताव विरोधी पक्षांच्या समोर ठेवला होता। तो मान्य केला असता तर त्या पवित्र्याचे जगभरात पडसाद […]

YOU MAY LIKE ..