नुकत्याच स्टार प्रवाह या tv वाहिनीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मालिका प्रसारित होत आहे त्यामालिकेत दाखवलेल्या माहिती संदर्भात –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामानवाची गौरव गाथा ही मालिका स्टार प्रवाहावरुन प्रक्षेपित होणार असे समजतात सर्वांनाचं उत्कंठा लागली होती, अपेक्षाही वाढल्या होत्या. कारण, जगाच्या पाठीवर युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे अजरामर दिग्विजयी, जागतिक विध्वता लाभलेले उत्तुंग वक्तीमत्व मालिकेतून कसे सादर करणार ? भारताच्या राजकीय, सामाजिक, वैचारिक, आर्थिक, शैक्षणिक, परिवर्तनशील क्षितीजावर आपल्या प्रखर तेजांने तळपणा, आपल्या ज्ञानगंगेने अस्पृश्यांप्रमाणेचं स्पृश्यांनाही पुनीत करणारा, आधुनिक भारताच्या जडणघडणीत प्रत्येक क्षेत्रात अनमोल योगदान असलेल्या निर्मात्याचे जीवन चरित्र एका मालिकेत बसविणे शक्यचं नव्हते. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे साहित्य, त्यांचा दैदिप्यमान जीवन प्रवास भारतालाचं नव्हे तर जगालाही मार्गदर्शक, दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे.
त्यामुळे, महामानवाची गौरव गाथा मालिकेत कशी गुंफतात याबद्दल उत्सुकता होती. पण, तिसर्या भागातचं अपेक्षाभंग झाला. बाबासाहेबांच्या जन्मपुर्वी त्यांच्या आईच्या स्वप्नात जाऊन एक देवी दृष्टांत देते हे कुठेचं वाचनात आलेले नाही किंवा ऐकण्यातही आले नव्हते ते दृश्य दाखविण्यात आले. मालिकेच्या माध्यमातून काही तरी दाखवून बाबासाहेबांचे दैवीकरण, संभ्रम, बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न होणार असेल तर तो निश्चितचं खोडसाळपणा ठरेल. त्यामुळे, सदर मालिकेच्या माध्यमातून अशा काही चुकीच्या गोष्टी प्रेक्षकांच्या माथी मारुन, बाबासाहेबांचे दैवीकरणाच्या माध्यमातून अवमूल्यन करण्याचा प्रयत्न करु नका, आंबेडकरी समाज सुज्ञ आहे.
– मिलिंद कांबळे चिंचवलकर
९८९२४८५३४९