STAND WITH JNU शिक्षणापासून नव्या पिढीला वंचीत करण्याविरोधात कोण लढणार ? -लेखक दिवाकर शेजवळ
**********************
JNU मध्ये शिकणारी
श्वेता पाटील काय सांगतेय…ऐका !
JNU मधे जी Massive फी वाढ झालीये त्या विरोधात तिथले विद्यार्थी प्रॉटेस्ट करत आहेत, आणि काही महाभाग त्या प्रोटेस्टला विरोध करत आहेत. त्यांच्यासाठी काही लॉजिकल प्रश्न…
1)पब्लिक यूनिवर्सिटीस मुळातच कमी फीमधे शिक्षण देण्यासाठी बनवल्या गेल्या आहेत. आता त्या फीमधे अचानक एवढी वाढ केली तर त्याला पब्लिक यूनिवर्सिटी कसं म्हनता येईल? म्हणजे तुम्हांला सगळ्या शिक्षणाच खाजगीकरण करायचय का?
2) बरं , मग असं खाजगीकरण केलं तर किती तरुण मास्टर डिग्री, M फिल , PhD पर्यंत पोहचू शकतील? Marginalised सेक्शन्स मधून आलेले माझ्यासारखे विद्यार्थी एवढी फी भरूच शकत नाहीत. म्हणून मग आम्ही उच्च शिक्षण घ्यायचे स्वप्नं बघायचे नाही का?
3) वरच्या प्रश्नाच उत्तर हो असेल तर तुम्ही माझ्या शिक्षणाचा अधिकार नाकारत आहात. अन हे नाकारण्याचा अधिकार तुम्हांला कुणी दिला?
4) ठीक आहे , तुम्ही tax पयेर्स आहात. पण शासनाच्या जाहिराती, विदेश दौरे, देश सोडून पळून गेलेले कर्जबुडवे यांनी तुमच्या tax चा गैरवापर केला तेव्हा तुम्ही कुठे असता? की फक्त गरजुंना कमी कींमतीत शिक्षण मिळालं की तुमच्या tax च्या पैशांचा गैरवापर होतो?
5) इतर देशांमधे KG to PG शिक्षण मोफत असतांना भारतात जिथे कमी किंमतीत शिक्षण मिळतं तेही प्रचंड महाग करायचा घाट घातला जात आहे. तुम्ही नेमके विरुध्द बाजूला उभे आहात. याचा अर्थ असा होतो की, तुमच्याकडे सामाजिक अन आर्थिक capital भरपूर आहे. तुमच्या पोराबाळांच्या शिक्षणासाठी तुम्ही लाखो रुपए खर्च करू शकता. पण रिसोर्सलेस विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला कणव तर नाहीच पण उलट विरोधच आहे. असं असेल तर आमची लढाई जशी सरकारविरोधात आहे तशीच तुमच्या सारख्यांच्या विरोधातही आहे!
6) JNU मधे विद्यार्थी खूप वर्षे शिकतात असा एक बालिश आरोप नेहमीच केला जातो. हे म्हणजे असं झालं की, दहावीच्या विद्यार्थ्यांला विचारायचं ‘कारे बाबा, तू पहिलीपासून दहावीला यायला दहा वर्षे का लावलेस? जरा लवकर यायचं होतंस! संसाधने वाचली असती की!’
मी स्वतः 23 वर्षांची आहे. माझी मास्टर डिग्री पूर्ण होईपर्यंत 24 ची होईल. त्यानंतर Mफिल करायच ठरवलं तर दोन वर्षे जातील. म्हणजे तोवर 26 ची होईल. त्यानंतर PhDला 5 वर्षे. म्हणजे तोपर्यंत मी 31 वर्षाची होईन. यांत मधे कोणताही Gap न घेता शिक्षण केलं म्हणून! बाकी थीसिससाठी विषय मिळणं, मधे एखादवर्ष जॉब करणं. या नॉर्मल गोष्टींचा वेळ गृहीत न धरताही मला PhD करायला इतका वेळ लागेलच. हे साधं गणित लोकांना खरंच करता येत नाही की उगाच विरोधासाठी विरोध करताय?
शेवटी एवढंच सांगेन आज JNU आहे, उद्या माझ्या-तुमच्या गावातील शाळा कॉलेजेस असतील. फीच्या डोंगराखाली आपल्या मुलांच्या शिक्षणाची स्वप्नं कुजून जाण्याआधी स्टँड घ्या! जागे व्हा!! शिक्षणाच्या खासगीकरणाला विरोध करा!!!
#Stand_With_JNU