शिख धर्मियांचे पवित्र दादरचे गुरुद्वारा…..!
या गुरुद्वारा ला जागा दिलीय ती महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
आज शिख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांचा 550 वा प्रकाशोत्सव त्या निमित्ताने आड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली त्या वेळी शिख धर्मगुरूनी त्या आठवणींना उजाळा दिला . आपल्या FB च्या पेज वर या संदर्भात बाळासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ते त्यांचाच शब्दात…..!
“आज शिख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांच्या 550 व्या प्रकाशोत्सव निमित्त मिरवणुकीत दादर, मुंबई येथे सहभागी झालो.
शीख समूहाच्या धर्म गुरुची भेट घेऊन गुरूनानक प्रकाश यात्रे निमित्त शुभेच्छा दिल्या. दादर येथे मुख्य गुरुद्वारामध्ये आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना धर्मगुरूनी उजाळा दिला.
या गुरुद्वाराला जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दादरमध्ये दिली असल्याची आठवण धर्मगुरुंनी सांगितली व आगामी काळात आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत असण्याचे जाहिर केले.”