Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 522
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590

Deprecated: mb_convert_encoding(): Handling HTML entities via mbstring is deprecated; use htmlspecialchars, htmlentities, or mb_encode_numericentity/mb_decode_numericentity instead in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 800
पोलादी (लोह) पुरुषाला देखील वाकविणारे बाबासाहेब….!
३१ ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष म्हटले जाते.
सरदार वल्लभभाई पटेलांनी तर जाहीरपणे स्टेटमेंट ही दिलं होतं की, ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत डॉ. आंबेडकर घटना समितीत येणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेतली आहे.’
यावर उत्तर देताना अतिशय कष्टी मनानं बाबासाहेब म्हणाले… ‘मला घटना समितीची दारे, खिडक्या बंद करण्यात आली. इतकेच काय, हवा येण्यासाठी जी तावदाने लावली जातात, ती सुद्धा बंद करण्यात आली आहेत.”
पण हार मानतील ते डॉ. आंबेडकर कसले…
बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समितीवर जाण्याचा पक्का इरादा होता. बंगाल प्रांतातील बॅ. जोगेंद्रनाथ मंडल यांच्या पाठिंब्यावर २० जुलै १९४६ ला बाबासाहेब आंबेडकर नुसते विजयीच झाले नाही तर काँग्रेसी नेते शरदचंद्र बोस यांच्यापेक्षाही सर्वात जास्त मतांनी ते निवडून आले. सहा काँग्रेसी आमदारांनी आपल्या पक्षाची पर्वा न करता बाबासाहेबांना मतदान केले.* *बाबासाहेबांच्या विजयामुळे देशातील पददलितांमध्ये आनंदाची लहर पसरली. कलकत्त्यात प्रचंड जुलूस निघाला.” लोकांनी भांगडा नाच केला. ढोलताशे वाजविले, फटाके उडविले. बाबासाहेबांच्या या नेत्रदीपक विजयामुळे संविधान सभेत पददलितांचे प्रतिनिधित्व करणारा अत्यंत योग्य समर्थ, निर्भय आणि चरित्रवान महामानव पोहोचल्याने सर्वांना आनंद आणि गर्व वाटू लागला.
सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते, “मी संविधान सभेचे दरवाजे आणि खिडक्याच नव्हे तर तावदानदेखील बंद केली आहेत, पाहतो तेथे डॉ. आंबेडकर कसा प्रवेश करतात ते, बाबासाहेबांच्या या विजयाने लोहपुरुषांची ही भीष्म प्रतिज्ञा पराभूत झाली आणि जेव्हा बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्षपद प्रदान करण्यात आले तेव्हा एका काँग्रेसी नेत्याने सरदार पटेलांजवळ नाराजी व्यक्त करीत म्हटले, ‘तुम्ही गांधीविरोधी आणि काँग्रेसविरोधी डॉ. आंबेडकरांना घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद कसे काय प्रदान केले ?” तेव्हा सरदार पटेल म्हणाले, “तुम्हाला संविधानाचे काय कळते ? आम्हाला डॉ. आंबेडकरांशिवाय या कामासाठी अधिक योग्यतेचा कोणीच मिळाला नाही. म्हणून आम्हाला त्यांना अध्यक्षपद देण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. असे होते लोह पुरुषाला देखील वाकविणारे बाबासाहेब….!
एवढेच नव्हे तर सरदार पटेलांनी हैद्राबाद संस्थान डाॅ.आंबेडकरांच्या सल्ल्यानुसार भारतात विलीन केले. सैनिकांना पोलिसांचे ड्रेस घालायला लाऊन एका दिवसात हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करुन घेतले. तेच नेहरुंनी जम्मू-काश्मिरबाबत कारभार केला, तेथे थेट सैन्य बळाचा उपयोग केल्यामुळे तो मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेल्यामुळे आजही तो मुद्दा भिजत घोंगडं पडून आहे. त्यात भारताची अगणित मनुष्य व वित्त हानी होणे सुरुच आहे.
धन्यवाद. खूप छान माहितीपुर्ण लेख
Jay bhim