जय सम्राट अशोक मौर्य ….
देवानामपिय पीयदस्सी चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य की जय..
“विजयादशमी” म्हणजेच दसरा हा सण खरतर सम्राट अशोक मौर्य या भारताच्या महान सम्राट च्या जीवनाशी निगडित असलेला सण आहे.. यालाच “अशोकाविजयादशमी” असे म्हटले जाते.
इसवी सन पूर्व तीसरे शतक म्हणजेच आजपासून 2300 वर्ष पूर्वी हा अशोक मौर्य यांचा काळ मानला जातो. अवघ्या वयाच्या 21 व्या वर्षी अशोक मगध च्या गादिवर बसला. संपूर्ण भारतीय उपखण्डचा (जम्बूद्वीप) चा सत्ताधीश बनला.. अशोक म्हणजेच सम्राट चन्द्रगुप्त यांचे नातू आणि बिंदुसार यांचे पुत्र.
अत्यंत शूरवीर, महत्वाकांक्षी, धैर्यवान तसेच धार्मिक,सहिष्णु असा सम्राट म्हणून अशोक ची ओळख इतिहासात आहे.
अशोकाच साम्राज्य सध्याच्या दक्षिण भारत आंध्र महाराष्ट्र पासून ते संपूर्ण भारत पाकिस्तान ते इराक ईरान ग्रीस इजिप्त च्या सिमेपर्यत विस्तृत विशाल राज्य होत. त्यात महत्वाकांक्षी असलेल्या सम्राट ला कलिंग च्या चैत्र नावाचा राजा शरण येत न्हवता.. म्हणून अशोकाने कलिंग (सध्याच ओडिसा) वर आक्रमण केले. अशोकाच्या विशाल सैन्य ताकदी विरुद्ध कलिंग चे लोक प्राणपनाने लढले पण अशोक विजयी झाला। कित्येक सैन्य यात ठार झाले .रक्ताचा पाट वाहत होते इतका नरसंहार अशोकाने केला.. आपण जगजेत्ता सम्राट झालो या आनंदात अशोक होता.
त्यातच “बुद्धम शरणम गच्छामि ” हे भिक्खुचे शब्द त्याच्या कानी पडले. अशोकला जनवू लागले आपण सम्राट बनलो पण काय जिंकले??. युद्धातील रक्तपात, विधवांचे अश्रु, युद्धात अपंग लोक, नरसहारात अनाथ झालेली मुले ? काय जिंकलो.??. अशोक साठी बुद्ध धम्म तसा नवीन न्हवता.. त्याची पत्नी महादेवी विदिशा ही धर्माने बौद्ध होती. पण अशोक हे सुरुवातीला धार्मिक न्हवते. जगजेता सम्राट बनन्याच्या महत्वाकांक्षेने अशोक आक्रमक राजा बनले होते.
भिक्खु निग्रोध ने केलेले बौद्ध धम्मचा मैत्री,प्रेम करुणेचा उपदेश सम्राट च्या मनाला खुप खोलवर यातना देऊ लागला व अस्वस्थ करू लागला. अशोकला पश्चताप होउ लागला.. . हळू हळू अशोका हे “चण्डअशोक” पासून “धम्मअशोक” बनू लागले.नैराशेत व दुःखत बुडालेल्या अशोकाने अतिमहत्वाकाँक्षी युद्धाचा मार्ग ऐवजी मैत्री,प्रेम, करुणेचा बुद्धांचा मानवी धम्म मार्ग वर आचरण करण्याचा निर्णय घेतला . भिक्खु उपगुप्त यांच्या हस्ते त्यांनी बौद्ध धम्म ची दीक्षा घेतली.
तो दिवस म्हणजेच अश्विन शुक्ल दशमी या दिवसाला “अशोकविजयादशमी” म्हणून संपूर्ण देशात साजरी होउ लागली.
अशोकाने निश्चय केला की आजपासून युद्धाचा क्रूरतेचा मार्ग त्याग करून मानवतेचा कल्याणाचा प्रेमाचा मार्ग अवलंब करायचा .
बुद्ध धम्म ची दहा तत्वे ज्याला
“दश हारा”
असा जाहिरनामा म्हणून त्यांनी राज्यात प्रसार केला.. हाच “दश हारा” हा सण म्हणून लोक साजरा करू लागले.
भारताच्या इतिहासात सम्राट अशोकाने समता,बंधुता,न्याय या मुलभुत मानवी तत्वाना सामाजिक,राजकीय स्वरूप दिले. अशोक यानि बौद्ध धर्म चा जगभर प्रसार केला पन तत्कालीन परधर्मिय लोकांविषयी सहिष्णुता दाखवली. अशोकाने व्यापार ,रस्ते, दळणवळण च्या साधनाचा प्रचंड विकास केला.. कृषि, आरोग्य, उद्योग या क्षेत्रात भरीव कामगिरी केलि. महिलां,बालक, अनाथ, वृद्ध सर्वांसाठी समाजोपयोगी कामी सम्राट ने केलि व एका नवा आदर्श आपल्याला दिला.
“अशोका विजयादशमी” म्हणजे
“दश हारा” दिनी सम्राट अशोक यांना मनःपूर्वक वंदन करतो.
जय सम्राट अशोक मौर्य
– डॉ अलोक कदम