कल्याण
येथील सम्राट अशोक तरुण मंडळाने केले अन्नदान
कल्याण पश्चिमेतील सम्राट अशोक तरुण मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.देशातील बहुनसंख्य रेल्वे या याच स्थानाकाशी जोडल्या गेल्याने कल्याण ला वेगळे महत्त्वाचे स्थान आहे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातील सर्व आंबेडकरी अनुयायांनी हे मोठया प्रमाणात आपल्या आगमनाची व परतीच्या प्रवासासाठी कल्याण येथे येत असतात त्यांना मोफत अन्नदान करण्याचे गेले अनेक वर्ष हे कार्य या संस्थेने वतीने अविरत चालू आहे या ही वर्षी कल्याण स्टेशन परिसरात आर पी आय युवा आघाडीचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष मा संग्राम मोरे ,शहर अध्यक्ष मा संतोष जाधव यांच्या अधिपत्याखालीअन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस आयुक्त मा अनिल पोवार साहेब उपस्थित होते.केवळ अन्नदान नव्हे तर सोबत मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर ही घेण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल शेजवळ,विकास अहिरे,शिवाजी निकम,संदीप हजारे,सागर शिंदे आदी कार्यकर्ते व सम्राट अशोक तरुण मंडळ यांचे सर्व कार्यकर्ते ,सल्लागार व सदस्य यांनी मेहनतीने प्रयत्न केले.
प्रि स्कूल च्या छोट्या बालशिशू चे अभिवादन..!
कल्याण प येथील बालशिशू असणाऱ्या शासक बालविहार प्री स्कूल कल्याण पश्चिम येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बालकांच्या वतीने विनम्र अभिवादन केले .अभिवादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून DYFI चे ठाणे जिल्हा अध्यक्ष मा गौडे सर उपस्थित होते सोबत स्कूल च्या शिक्षिका मा सुनीता खैरनार आणि सहकारी शिक्षकवर्ग .
पनवेल -साक्षी पार्क मधील रहिवाशांचे अभिवादन….!
पनवेल येथील साक्षी पार्क नविन पनवेल येथे ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.त्या साठी सर्व बौध्द बांधव व रहिवाशी विनम्रपणे परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्या साठी मोठ्या संख्येने उपसथित होते.
रत्नागिरी-कोकणातील महाविद्यालयात महामानवांना अभिवादन..!
लांजा तालुक्यातील भांबेड पंचक्रोशीतील प्रतापराव माने महाविद्यालयात ही महामानवांना विनम्रपणे अभिवादन करण्यात आले त्या कार्यक्रमात विद्यालयातील विध्यार्थी आणि शिक्षक व उपस्थित पालक वर्ग आणि भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते . त्या प्रसंगी विध्यार्थी व शिक्षक यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर महत्वपूर्ण विचार मांडण्यात आले .
सॅनिटरी पॅड चे मोफत वाटप..
कोकिसरे बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामिण ता वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आणि सावित्री रमाई च्या लेकी या महिला मंडळाच्या वतीने चैत्यभूमीवर देशारातील आलेल्या अनुयायांना “मासिक पाळी -समस्या आणि उपचार “मार्गदर्शनपर पुस्तिका व सॅनिटरी पॅडस चे मोफत वाटप करण्यात आले त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि महिला वर्ग
“अस्मिता” ची आर्थिक चळवळ
अस्मिता च्या आर्थिक चळवळीला नव्याने सुरुवात चैत्यभूमीवरून..
दिनांक 6 डिसेंबर रोजी प्रज्ञासूर्य विश्वभूषण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगातून लाखोंच्या संख्येने चैत्यभूमी दादर ला आले होते.
बऱ्याच प्रमाणात या देशातील ग्रामीण आणि वंचित भारत या दोन दिवसात देशाच्या आर्थिक राजधानीत येत असतो की जो खरा भारताचा चेहरा आहे.वेगवान शहरिकरणामुळे भारतातील जातीयव्यवस्था आणि गिरीबी ही अधिकच बिकट होत आहे आणि त्यातच आर्थिक आणि सामजिक कोंडीत आपला समाज सापडत आहे .महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवंदन करण्यास येणाऱ्या ह्या जनतेला बऱ्याच मूलभूत प्रश्नांची उत्तरे अजून ही मिळाली नाहीत.
आज या समाजामध्ये बेरोजगारी खूप वाढली आहे आणि त्यावर उपाय म्हणजे आर्थिक चळवळ . आर्थिक चळवळ आता नव्याने अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक नियोजनानुसार उभी करणे आणि त्यातून रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करणे किंवा त्यासाठीं काम करणे. नेमक्या याच वास्तवाचे भयाण रूप पाहून त्यावर मात करण्यासाठी “अस्मिता” (रजि.) नावाची संस्था नोव्हेंबर 2016 ला उदयास आली.
अस्मिता म्हणजेच
ASMITA- ADVANCED SMALL MEDIUM INDUSTRY & TRADE ASSOCIATION.
ही संस्था तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, बहुजनप्रतिपालक छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थ शास्त्रावर, विचारांवर चालणारी संस्था आहे.
आपल्या समाजातून ज्या काही सामाजिक व धार्मिक चळवळी चालवल्या जातात त्या वर्गणीदार यांच्या जीवावर . जो समाज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराने शासकीय ,निमशासकीय ठिकाणी काम करत आहे त्यांच्या कडून वर्गणी जमा करून उभ्या केल्या जातात .
“अस्मिता” मात्र आता वर्गणी मागण्याचे काम करणार नाही कारण तिच्या ब्रीडवाक्यात वर्गणीदार नको देणगीदार घडवू असे विचार व्यक्त झालेत .जर आपल्यातील सबळ व्यवसाहिक समाजातून निर्माण झाले तर तर ते स्व इच्छेने देणगी देतील .
या साठी अस्मिता चे ब्रीद वाक्य आहे,
ऊठ तरुणा जागा हो ,उध्योगाचा धागा हो…!
एक पाऊल परिवर्तनाचे ,एक पाऊल स्वाभिमामचे ,
तर एक पाऊल स्वयं रोजगाराचे समाजाच्या।उत्कर्षाचे .
हे ह्याचं साठी कीं आपल्या लोक संख्येच्या जोरावर आपण अनेक व्यवसाय निर्माण करू शकतो व करत आहोत गरज आहे ती ऐच्छिक सहकार्य करण्याची .
कोणत्याही प्रवर्गातील व्यक्तीला व्यवसाय करायचा असेल किंवा कोणतीही व्यवसायिक कल्पना डोक्यात असेल अशा व्यक्तींनी ‘
“अस्मिता” शी संपर्क करावा. त्यांच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं काम आपण मिळुन करू.
आमचे कार्य आणि भूमिका सर्व लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र या चॅनेल ने खूप मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्र आणि त्यांची टीम मान. किरण सोनावणे आणि मोहिनी जाधव यांचे “अस्मिता”टीम कडून आभार मानतो.
“अस्मिता” टीम ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून किंवा फोन करून करू शकता.
www.asmitamorg.com
Fecbook page- https://www.facebook.com/organisationAsmita/
Email id- asmitamorg@gmail.com
Live on Max Maharashtra
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/752558218554901/?sfnsn=scwspmo&extid=igZPh9DhXprwgtD2&d=n&vh=e
(अपुर्ण )
-संकलन
विवेक जगताप,टिटवाळा