“कोरोनाने”सर्वांना स्व:ताची ओळख करून दिली

कोरोनाने सर्वांना स्वताची ओळख करून दिली.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
सागर रा तायडे,भांडुप www.ambedkaree.com
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

कोरोना विषाणूने जगाला वेठीस धरले आहे.त्यावर काहींनी मात केली तर काही जीवघेणा संघर्ष करीत आहेत.कोरोना झालेल्या रुग्णाला रक्ताच्या नातलगानी शेवटच्या क्षणाला जवळ करण्यास किंवा अंतिमसंस्कार करण्यास नकार दिला. अशा अनेक लक्षवेधी घटना घडल्या त्या कायमस्वरूपी आठवणीत राहतील.पैसा पेक्षा नांत खूप मोठे असते असे म्हणत होते.कोरोना रुग्णांची माहिती मिळाल्यावर सर्वानीच आपली स्वताची ओळख करून दिली.यात गरिबा पेक्षा श्रीमंत जास्त आहेत. त्यामुळेच आज मला जुन्या आठवणी येत आहेत.शेतकरी,शेत मजुरांची मुल शहरात जाऊन नोकरीला लागली.ती ग्रामसेवका पासून सचिवालया पर्यत सरकारी नोकरीला आहेत.ती शेतकरी,शेतमजुराची व्यथा आज समजून घेतात काय?.

भारत हा कधी काळी कृषीप्रधान देश होता.या देशातील शेतजमीन सुजलाम सुपलम होती. ती सोन्यासारखे अन्न धान्य पिकवीत होती.तिच्यावर शेतकरी,शेतमजूर शेठ,सावकार बारा बुलतेदार गुण्यागोविंदाने नादात होती.जात,धर्म आणि तेहतीस कोटी देव देविका तेव्हा सुद्धा होत्या. पाप,पुण्याच्या व स्वर्ग नरकाच्या भितीमुळे कोणी कोणाला नाहक त्रास देत नव्हता. देवा धर्माची थोडया भीतीने लोक नितीमत्तेने वागत होती. गावांतील सर्व जाती धर्माच्या वडीलधाऱ्याचा धाक होता. सर्वात मोठे म्हणजे लोक काय म्हणतील?. समाज काय म्हणेल ?.या भीतीमुळे अन्याय अत्याचारांचे प्रमाण कमी होत होते.लेखी कोणत्याही व्यवहार नव्हता.शब्दाला मोठी किंमत होती.आता कामगार कर्मचारी अधिकारी यांना स्वतचे ओळख पत्र आहे.पण असंघटीत मजूर, शेतमजूरा कडे कोणते ही ओळख पत्र नाही.शेतकर्याकडे सातबारा शिवाय कोणती ही ओळख पत्र नाही. मोदी सरकारने CAA,सी ए ए,NRC एन आर सी,NPR एन पी आर देशातील बहुसंख्य मतदान कार्ड,आधार कार्ड,रेशनकार्ड हे भारताचे नागरिक असण्याचे पुरावे नाहीत अशी मोठी मोहीम सुरु केली होती. कोरोना आला नसतात तर देशात प्रचंड आंदोलन त्यात जातीय दंगली गोळीबार हत्याकांड झाली असती.पण कोरोनाने त्यांच्या सर्व नियोजनावर पाणी फिरवले कोरोनाने सर्वांना स्वताची ओळख करून दिली.

आता शेतमजुर,शेतकऱ्या वरील अन्याय,अत्याचार आणि आर्थिक शोषण मोठया प्रमाणात वाढलेले आहे. शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे मुलंमुली ग्रामसेवक ते सर्व सरकारी कार्यालयात अधिकारी असतांना. ग्रामीण भागात,कृषिउत्पन्न बाजार समितीत कोण कर्मचारी अधिकारी असतात?. कारण आम्ही शेतकरी,शेतमजूरांची मुले आहोत हे ते विसरले आहेत.

शेतकरी, शेतमजुरांची मुलं चावडीवर सर्व लोक रात्री एकत्र बसुन गांवगप्पा गप्पागोष्टी करीत होती. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की मातीच्या घरात राहीलो.आणि आकाशातील परी, राजा राणीच्या गोष्टी जमिनीवर बसून ऎकल्या आहेत.शेणाने सारवलेल्या जमीन बसून जेवत होतो व ताटली भर चहा पित होतो.आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की लहानपणी गल्लीत बोळात, गोठणावर मित्राबरोबर विट्टीदांडू, लपाछुपी, खो-खो, कबड्डी, भोवरा, गोटया कुस्त्या सारखे खेळ खेळलो.
आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की सार्वजनिक पोलखाली पिवळ्या कमी उजेडाच्या बल्बच्या प्रकाशात अभ्यास केला आहे आणि पुस्तके वाचली आहेत.आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की पंधरा पैसाचे पत्र लिहून पोस्टाने निरोपाचे आदान प्रदान करत होतो.सुखा दुःखाच्या आनंदाच्या गोष्टी सांगत होतो. आठवडी बाजार मध्ये गावोगावी फिरणारा बुलतेदार निरोपाची घेवाण देवाण करीत होता.

आम्ही ती शेवटीची पीढ़ी आहोत की कूलर, एसी न वापरता नदीत पोहलो, रात्री मैदानात उगड्यावर झोपलो, हीटर न वापरता बालपणी चुलीवर पाणी गरम करून अंगोळ करीत असो. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की डोक्याच्या बारीक केसांना खोबरेतेल लावून शाळेत जात असू. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की शाईवाला फाॅऊन्टन पेन आणि दौउत याने वह्या लिहल्या आहेत.हात शाईने काळेनिळे केले आहेत.आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की शिक्षकाचा मार खाल्ला आहे. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की मोठ्याचा आदर करत होतो,त्यांना बघून आदराने भितीने पळून जात असू, आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की आपल्या शाळेचे पांढरे शुजवर पांढऱ्या खडूची पेस्ट लावून ते चमकदार करत असु आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की दाढी साठी लाईफबाय साबण वापरत होतो, नेहमी गुळाचा चहा पित होतो. सकाळी उठल्यावर काळे किंवा लाल दंत मंजन किंवा मिश्री लावत होतो. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की रात्रीच्या चांदण्यात रेडियोवर BBC च्या बातम्या, विविध भारती,ऑल इंडिया रेडियो अणि बिनाका गीतमाला प्रोग्राम नेहमी ऎकत होतो. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की उन्हाळ्यात रात्र होताच छतावर पाण्याचा शिडकावा करत होतो,त्यानंतर सतरंजी अंथरुन झोपत होतो.तसेच एक स्टैंड वाला पंखा सगळ्याकडे असे. सकाळी सूर्योदय होताच उठत असो.

आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की एकमेकां विषयी सर्वाना आदर होता.फार चांगली नाती जपत होती, ती आता कमी झाली आहे, सर्व मोबाईल मध्ये डोकावलेली आहेत. आज फार शिकलेले लोक आहेत. पण ते मतलबी, स्वार्थी, अनिश्चितता, एकटेपण व निराशेत जात आहेत.आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की नात्याच्या, प्रेमाचा गोडपणा जपला आहे, अनुभवला ही आहे. आम्ही खरचं नशीबवान आहोत. आम्ही ती शेवटची पीढ़ी आहोत की ज्यांनी आपल्या आईवडिलांचे नेहमी ऎकले आणि मुलांमुलीचे ही ऎकत होतो.

विशेष म्हणजे १५ पैशाचं पोस्ट कार्ड खुशाली कळवत होतं, लाल शाईने अर्धं लिहिलेलं कार्ड रडायला लावत होतं. एक रुपया सुट्टा घेऊन एसटीडीच्या लाईनमध्ये उभा रहात होतो फोन लागला की..मन भरुन येत होतं. whatsapp वर आता २४ तास संपर्कात राहातोय. ना कोणाला ती ओढ आहे?.ना कोणाला ती हुरहुर आहे?. काळ बदलला बदलली साधनेत आम्ही अजूनही जिव्हाळा शोधतच आहोत. तेव्हा गांवातील लोक एकमेकांना आदराने विचारपूस करीत होती. त्यात जिव्हाळा होता. आता तो कुठेही जाणवत नाही. म्हणूनच १५ / २० हजाराच्या मोबाईलला १५ पैशाच्या पोस्ट कॉर्डची सर येत नाही.नात्याची तर नाहीच नाही,अजून काय काय बदलेल?. पण ते दिवस?. ती माया?. ती आपुलकी?. पुन्हा कधीच मिळणार नाही. जागतिक कोरोना संकटात विविध सोशल मिडिया वरील ग्रुपवर आलेल्या हया पोस्टचे संकलन आहे.प्रत्येक जन हे म्हणतो आवडले तर पुढे पाठवा.खरेच आहे आठवणी प्रत्येकाच्या जाग्या होतात,पण ते ऐकून घेणारे समोर नसेल तर सांगणार कोणाला?. म्हणूनच सोशल मिडिया हा उत्तम पर्याय आज प्रत्येकाला उपलब्ध आहे. प्रत्येकांनी आपल्या शाळा, कॉलेज मधील आठवणी जाग्या कराव्यात. कोरोना काळात आपण आपले मित्र,नातलग हितचिंतक आणि कामावरील सहकाऱ्यांना किती आठवण आणि मदत केली.त्याच्या जाती धर्माचा प्रांताचा कधी विचार केला काय ?.

गावांत एकत्र शिक्षण घेतांना कधी जात आडवी येत नाही. कॉलेज मध्ये एकत्र शिक्षण घेतांना जात आडवी येत नाही.पण शिक्षण घेतांना अडचणीच्या वेळी जेव्हा जातीमुळे आर्थिक मदत मिळते तेव्हा मात्र मुलांच्या मनातील जाती बद्दल तीव्र संवेदनां जाग्या होतात.तेव्हा आम्ही शेतमजूरांची मुले आहोत हे कोणी विसरत नाही.पण जे शेतमजूरांचे नव्हे तर सधन शेतकरी कुटुंबातील मुलं आहोत म्हणून आम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत मिळत नाही. हे काही मुलामुलींना पचविणे अशक्य जाते.तेव्हा शाळा,कॉलेज मध्ये एकत्र शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना स्वतःच्या जातीचा गर्व वाटतो दुसऱ्या जातीचा तिरस्कार त्यातुनच मेडिकल कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलीत सुद्धा डॉ पायल तडवी सारखी मुलगी आत्महत्या करण्यासाठी मजबूर होते. खेड्यातील मुलगी,प्राथमिक शाळा ते कॉलेज करून इथं पर्यत पोचते तेव्हा तिला कितीतरी आठवणी पाठलाग करीत असतात. तेव्हा ती म्हणते आम्ही शेतमजूरांची मुलगी आहे हे विसरलो नाही.

कॉलेज मध्ये गेल्यावर मुलामुलींना वेगळ्या जगात आल्या सारखे वाटते.तिथे अज्ञाना पेक्षा विज्ञान सर्व श्रेष्ठ आहे हे समजते,जात,धर्म,प्रांत सीमारेषा पुसट होतात.धर्म संस्कार,सांस्कृतिक रितीरिवाज यांच्या मर्यादा स्पष्ट होतात. तेव्हाच भारतीय जागरूक नागरिक बनण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेतले पाहिजे.आमचे आईवडील शेतकरी, शेतमजूर होते आम्ही शेतकरी, शेतमजूर बनण्यासाठी शिक्षण घेत नाही. तर डॉक्टर, वकील, प्राध्यापक, बँक मॅनेजर, बिजनेस मॅन,आय पी एस,आय ए एस उच्चशिक्षित उच्च पदस्थ अधिकारी बनण्यासाठी शिक्षण घेत आहोत तेव्हा आम्ही जात,धर्म, प्रांत,भाषा सर्व विसरलो पाहिजे.शेतकरी,शेतमजुरांना,कामगार मजदूरांना न्याय देतांना आम्ही तसे वागतो काय?.

गेल्या वीस पंचवीस वर्षात हे सर्व हे शिक्षण घेतांनाच विसरून चालणार नाही यांची जाणीवपूर्वक तयारी करून घेतली जाते. त्यामुळेच सरकारी निमसरकारी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्तव्ये दक्ष न राहता आपली ओळख जातीला घेऊन पुढे येत आहे. पूर्वी सर्व शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयात नमस्काराने सुरुवात होत होती.आता त्यात तुकडे पडलेत. आम्ही शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो नाही म्हणणारे खुप कमी भेटतात.तसेच आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत हे विसरलो नाही हे सांगणारे पुढे येत नाही.शेतमजुरावर अन्याय करतांना जात पाहिली जाते. शेतकऱ्यांना तरी कुठे न्याय मिळवून दिला जातो. शेतकऱ्यांची,शेतमजुरांची मुलंमुली ग्रामसेवक ते सचिवालय पर्यत पोचली त्यांना आज जाणीव आहे काय की आम्ही शेतकऱ्यांची ,शेतमजुरांची मुलंमुली आहोत म्हणून ?. आम्ही शेतमजूरांची मुले आहोत हे ते विसरले नाहीत काय?. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक, वकिलाचा मुलगा वकील,खासदारांचा मुलगा मुलगी आमदार,आमदारांचा मुलगा,मुलगी नगरसेवक, नंतर आमदार असा बदल होत असतांना शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलामुलींनी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकारी म्हणून पुढे आले पाहिजे.तरच हा कृषिप्रधान देश बनविता येईल.आम्ही शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो ?. नाही असे वागले पाहिजे.


कोरोनाच्या महासंकटात
शेतकरी,शेतमजुरांना,कामगार मजदूरांना कामधंदे बंद झाल्यामुळे उपासमारी,भूकबळीची गंभीर समस्या आणि आर्थिक संकटगस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्य व केंद्र सरकार त्यांना मदत करणाऱ्या घोषणा करते.त्याची अंमलबजावणी कोण करणार आहे?. ग्रामसेवक,ग्रामसचिव,तशिलदार व जिल्हाधिकारी शेतकरी,शेतमजूरांची मुले आहोत हे ते विसरले नसतील तर असंघटीत शेतकरी,शेतमजुरांना, कामगार मजदूरांना न्याय देतील.कोरोनाने सर्वांना स्वताची ओळख करून दिली. तशीच सरकारी प्रशासकीय कर्मचारी अधिकारी कशी ओळख करून देतात हे खूप महत्वपूर्ण असेल.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप, मुंबई

Next Post

डॉ भदंत आनंद कौसल्यायन भंतेजी की स्मृति को विनम्र अभिवादन.

सोम जून 22 , 2020
डॉ भदंत आनंद कौसल्यायन भंतेजी की स्मृति को विनम्र अभिवादन. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ डॉ.संदीप मधुकर सपकाळे-वर्धा ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●◆ नागपुर से लेकर मुंबई तक जितने भी रेलवे के प्रमुख जंक्शन / स्टेशन हैं उनपर काम करनेवाले रेलवे के बौद्ध मज़दूर और कर्मचारियों के यहाँ हिंदी […]

YOU MAY LIKE ..