सागरपुत्र आणि कवी गायक.
–राजाराम पाटील -उरण
प्रसिद्ध नेत्यांचे भाषण आणि प्रसिद्ध कवि गायकांचे गाणे कायमस्वरूपी कोणते आठवणीत राहते.कोणत्याही नेत्याचे एक तास भाषण ऐकून डोक्यात ठेवणे अवजड आहे,पण तेच गाणे असेल तर उठता बसता ते आपल्या तोंडात गुणगुणल्या शिवाय राहत नाही. एवढे कौशल्य त्या कवि गायकांच्या गाण्यात असते. म्हणूनच आगरी कोळी कराडी आणि कवी गायक कलाकारांचे योगदा खुप मोठे आहे.
बालपणी बाई पेटेना माझी चूल.ग चूल.आता नको.. हे चवथे मूल.. हे लोकसंख्या मर्यादित ठेवण्याचे,कुटूंब नियोजन चळवळीचे, एक गाणे रंजनाताई यांचे आपणास आठवत असेल.समाजाला सत्याकडे,हक्क अधिकार आणि सविधानाकडे घेऊन जाणारे गाणे हवे हे कोणत्याही समाजप्रेमी माणसाला वाटत असते.
मला आठवते.बालपणी गावात सत्यनारायण पूजा असेल तर.. ‘ऐक सत्यनारायणाची कथा.’..हा सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचा आवाज ऐकूनच लोक समजून जायचे आज या गावात पूजा आहे.लग्नातील पहाडी मंगलाष्टके ही प्रल्हाद शिंदेंचीच.ब्राह्मण केवळ दक्षिणेसाठीच.आगरी कोळीवाडे प्रल्हाद शिंदे,विठ्ठल उमप या महान कलाकारांना आमच्या अनेक पिढ्या विसरू शकणार नाहीत. एवढा हा संस्कार गोड ठेकेबाज आणि सहज नाचायला लावणारा आहे.अशा अनेक गायक कलाकारांनी सत्यनारायण, गणपती, होळी आणि अनेक सण उत्सव पेरले! दक्षिणा ब्राह्मणांनी घेतली,शाहिरांनी छत्रपतींचे पोवाडे गाजविले सत्ता मात्र जोशी फडणवीस पवार ठाकरेंची आली!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरच्या काळात ओबीसी एससी एसटी यांना जागविण्यासाठी प्रभावी प्रबोधन आंबेडकरी आणि डाव्या चळवळीतील कलाकारांनी यशस्वीपणे केले.परन्तु वर्तमान प्रश्न आणि अन्याय अत्याचार समजविण्यासाठी अर्थात ओबीसी गावठाणे जागविण्यासाठी अधिक वेगळे गाणे संगीत हवे असे मला 2005 पासून जाणवतेय.आई एकवीरेंची नवसाची लाखो गाणी रोज येतात.लग्न गीते येतात.परन्तु मानवी प्रयत्नवाद, बुद्धिनिष्ठ तर्क,विज्ञानवादी प्रबोधनपर गाणी दुर्लभ आहेत..बालपणी बाई पेटेना माझी चूल.ग चूल.आता नको.. हे चवथे मूल.. हे लोकसंख्या मर्यादित ठेवण्याचे,कुटूंब नियोजन चळवळीचे, एक गाणे रंजनाताई यांचे आपणास आठवत असेल.समाजाला सत्याकडे,हक्क अधिकार आणि सविधानाकडे घेऊन जाणारे गाणे हवे हे कोणत्याही समाजप्रेमी माणसाला वाटत असते.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण करणाऱ्या प्रभावी वक्त्यापेक्षा कलाकारांना अधिक गौरविले आहे.मागासवर्गीयांना जागृत करण्यात पुढे आलेल्या सर्वच लोकांत अण्णाभाऊ साठे हे खरे खुरे ‘भारतरत्न’ आहेत.कोळीवाड्यात घडलेले शिंदे,उमप,वरळी कर,वेसावकर घरा घरात मना मनात पोहचूनही महाराष्ट्र शासनाने त्यांची नोंद घेतली नाही! सामाजिक न्यायाची ही खंत, गावठाण कोळीवाडे आणि आमच्या झोपडपट्टीत होणाऱ्या गरीबाच्या वस्त्यांनी आपल्या रोख ठोक प्रेमाने भरून काढली.निसर्ग न्यायाने अनेक गायकांना डोक्यावर खाद्यावर घेऊन नाचविले.हळदी आणि वरातीत बेंजो वाल्याच्या कच्छीवाल्याच्या कलेवर फिदा होऊन, एक रुपया पासून पाचशेच्या नोटा ओवाळून टाकणारा कष्टकरी समाज आपलाच आहे,एवढेच नाही चक्री भजनात रात्र जागून पायपीट करणारा कोकणी माणूस हा संगीतावर आजही मनापासून प्रेम करतो. गावा गावात असलेले भजनी बुवा आजही युट्युबवर गाजत आहेत .रायगडचे केशवबुवा पाटील,नवी मुंबईच्या असंख्य गायक मंडळीत उठून दिसणारे महादेव बुवा शहाबाजकार मी अनेक तबला पखवाज वादक यांची नावे पुढे देईन,आज जागे अभावी शक्य नाही क्षमा असावी.
मुबंई नवी मुंबई ठाणे रायगड मधले,कोळीवाडे गावठाणे मासळी बाजार यांच्यावर बिल्डर आणि भूमाफिया यांची बुरी नजर पडलीय! यालाच ठाकरे मोदी ‘विकास’ म्हणताहेत.झोपडपट्ट्यांच्या एसआरए क्लस्टर मध्ये गरिबांचे ‘राष्ट्र ‘अर्थात सातबारा प्रॉपर्टी कार्ड नाहीसे करून ते बिल्डरच्या हाती देऊन देश स्वदेशी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य उच्चवर्णीयांच्या गुलामीत अडकत चाललाय. मुबंई ठाणे रायगड पालघर मधल्या आगरी कोळी कराडी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी आणि सारे एससी एसटी विजेएनटी बारा बलुतेदार विकासाच्या नावावर ‘भकास’ होत आहेत, उध्वस्त होत आहेत.निसर्ग पर्यावरणाचा होणारा विनाश त्यातून येणारी कोरोना सारखी महामारी हे दूरगामी परिणाम समजून घेणे सोडा, आपले नागरी’स्वातंत्र्य’ गमावत आहेत.
मागच्या काळातील स्वातंत्र्य चळवळीवर अनेक गाणी आहेत..डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शेतकरी चळवळीवरही गाणी आहेत.परन्तु वर्तमान प्रश्नावर लिहिणारे कवी, गाणारे गायक नाहीत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चवदार तळे मनुस्मृती दहन,काळाराम मंदिर ,संविधान या प्रश्नावर अनेक गाणी लिहिली गेली, परन्तु ओबीसी आगरी कोळी समाजाची जमिनी आणि मच्छिमार आंदोलनाची गाणी आलेली नाहीत.आमचे आगरी कोळी गायक जगदीश पाटील यांचे ‘माझे गावांत बिल्डर आयलाय’ हे गाणे वास्तवाच्या जवळ गेले.परन्तु सांस्कृतिक सामाजिक प्रबोधनात आम्ही ओबीसी मागे आहोत..डॉ बाबासाहेब आंबेडकर नारायण नागु पाटील यांच्या मैत्रीतून उभ्या राहिलेल्या ऐतिहासिक जमीन हक्क म्हणजेच खोती विरोधी कूळ कायदयावर एकही लोकप्रिय गाणे नाही.
आगरी कोळी भंडारी कराडी यांच्या आणि छत्रपती शिवरायांच्या अभेद्य लढवय्या आरमार आणि सागरी पराक्रमी इतिहासावर गाणे नाही.एवढेच कशाला सेझ विरोधी आंदोलनावर ऍड दत्ता पाटील यांच्यावरही गाणे नाही.सिडको लढ्यातील पाच हुतात्म्यांच्या आणि लोकनेते दि बा पाटील यांच्या गौरवशाली लढ्यावर महाराष्ट्रभर गाजलेले गाणे आम्ही देऊ शकलो नाही. पुस्तके वाचनालये महाविद्यालये आणि शिक्षणावर जीवापाड प्रेम करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आगरी समाजाने जपले आहेत. खोती विरोधी आंदोलनातून मूळ भूमिहीन असणाऱ्या,बेदखल कुळे असणाऱ्या ओबीसींच्या शिक्षण चवळीच्या हाती आज एकशे आठच्या वर शाळा महाविद्यालये अगदी इंजिनिअरिंग मेडिकल,आणि विधी महाविद्यालये आहेत.या मागासवर्गीय शिक्षण चळवळीवर शाळेत एखादी प्रार्थना होईल एवढेही गाणे आम्ही दिलेले नाही.बाबासाहेबांच्या अनंत
उपकरांच्या मैत्रीवर मी खूप विचार केला.त्यापाठीमागचा अर्थ शोधला.मी ठरविले जी जी संधी मिळेल तेव्हा केवळ समाज प्रबोधन हाच उद्देश ठेवायचा.अर्थात मी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी या छोट्या संघटनेची स्थापना माझ्या चिंचोटी अलिबाग येथील कष्टकरी गावकरी मच्छिमार यांना सोबत घेऊन 2008 साली केली. स्थापनेच्या वेळीच गावातील कलाकारांनी तात्काळ एक गाणे लिहिले आणि गायलेही.पुढे गावा गावात सभा सुरू झाल्या. भजनी बुवा शेतकरी गीते गाऊ लागले.परन्तु फार प्रभावी गाणी आजही जमली नाहीत.मातृसत्ताक आई एकविरा हा साऱ्या सागरपुत्र समाजाच्या साठी आमचा ‘मातृसत्ताक धर्म’ आहे. 2012 मध्ये रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथील चित्रकार दया हिवराळे यांना घेऊन मी कार्ले एकविरा बौद्ध लेणी पाहायला गेलो.त्याना दिवसभर लेणी अभ्यास निरीक्षण करायला लावली. त्यातून एका खांबावर दोन मासे दिसले ते कोलीय शाक्य म्हणजे राजा शुद्दोदन आणि एकविरा महामाया आणि आताच्या आगरी कोळी भंडारी कराडी बौद्ध अर्थात बाबासाहेब ना ना पाटील या मंगल मैत्रीचे चिन्ह जे लेणीत मला सापडले.मी दया हिवराले यांना या चिन्हावर शेकडो ट्रॉफ्या बनवायला सांगितल्या.पुढे “हुंडा नाकारण्याची पद्धत आगरी कोळ्यांची,हीच मातृसत्ताक संस्कृती,आई एकवीरेंची-तथागतांची! ” या 2500 वर्षे हुंडा नाकारणाऱ्या मातृसत्ताक कोलीय संस्कृतीवर,वैचारिक ओळींवर वर सन्माननीय आंबेडकरी नेते मा मनोजभाई संसारे यांच्या सहकार्याने आगरी कोळी बौद्ध महोत्सव वडाळा मुबंई येथे 12 दिवस साजरा केला.येथे याच मैत्रीवर आगरीकोळी गायक दादूस आणि जगदीश पाटील तसेच नंदेश उमप यांच्यासह अनेक गायक कलाकारांनी गाणी तयार करावीत असा उद्देश होता.हा महोत्सव प्रचंड यशस्वी झाला.अर्थात एखाद्या पुस्तकापेक्षा माझ्या आणि अनेकांच्या मनात तो आजही आठवणीत कायम आहे. अभ्यासकांनी दया हिवराले यांनी दगडात शोधलेली दृष्टी,तथागतानी सांगितलेली वैश्विक मैत्री शिकावी हे अत्यन्त विनम्रपणे सांगीन.
आज 2020 साळचे केरुमाता बौद्ध लेणी बचावाची भूमिका वडाळा मुबंई मनोजभाई संसारे,दै महानायकचे संपादक मा सुनील खोब्रागडे ,संतोष पगारे साहेब यांच्यासह लाखो ओबीसी बौद्ध यांना घेऊन तयार झालीय.त्यावेळी सत्यशोधक ओबीसी नेते, दिवंगत हनुमंत उपरे साहेब तेथे आले होते. अनेक कार्यकर्ते या घटनेचे साक्षीदार आहेत. याच आशयाचा कार्यक्रम गडकरी रंगायतन ठाणे येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा अनंत तरे याच्या उपस्थितीत यशस्वी झाला,.यावेळीही आगरी कोळी कलाकार दादूस आणि जगदीश पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गाजविली.
आज कार्ला लेण्यात सापडलेले मासे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या काणातही ‘मकरकुंडले ‘ दिसतात.भोवताली 25000 कोळी बांधव आजही राहतात.अर्थात निशस्त्र अहिँसक विठोबा ब्राह्मण बडव्यांचा नाही.महामाया एकविरा पुत्र बुद्ध आणि विठ्ठल यांचे आणि बुद्धाचे नाते आज चर्चेत आहे.अयोध्येत सापडलेली साकेत बौद्ध नगरी शरयू तीरी आहे.चंद्रभागा शरयू या नदीतीरी निसर्गसत्य म्हणून राहणारा कोलीय गण अर्थात कोळी बांधव हे हुंडा नाकारणारे मातृसत्ताक लोक ऐतिहासिक सत्य जाणतात. पंढरपूरच्या विठोबावर अनेक संत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध असल्याचे भाष्य जाहीरपणे केलेय.
अयोध्येत पुरातत्व विभागास बौद्ध अवशेष सापडूनही ते नाकारणारे मोदी सरकार देशाला असत्याच्या अंधार युगात घेऊन निघालेत.सूर्य चंद्र आणि सत्य कधीही लपवता येत नाही हे जागतिक सत्य सांगणारे बुद्ध मांडणारे आज दुर्मिळ आहेत.पंढरपूरच्या विठोबावर चल ग सखे..चल ग सखे पंढरीला,,,मन शुद्ध..विठू आहे बुद्ध…असे गाणे लिहून गाणारे ज्वाली मोरे हे आमचे गायक बंधू नवा इतिहास घडवीत आहेत.त्यांची अत्यन्त विचारी सुसंस्कृत गायकी आणि क्रांतिकारी कवित्व हे नवे परिवर्तन घेऊन त्यांचे गाणे येत आहे..त्यांनी केरुमाता आंदोलनातील बौद्ध लेण्यांचे ऐतिहासिक सत्यही मांडावे अशी मी विनंती त्यांना आणि त्यांच्या ताफ्यातील सर्वच आबेडकरी कलाकारांना करीत आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प त्यातील आजही न्याय मागणारे आगरी कोळी कराडी मातंग बौद्ध आदिवासी मुस्लिम धनगर यांचा आक्रोश आणि 2000 वर्षे जुनी बौद्ध लेणी बुद्ध मूर्तीसह मातीखाली गाडणारी सिडको ठेकेदार आणि साकेत बौद्ध लेणी नाकारणारी मोदिशाही उघडी पाडण्यासाठी नव्या हुशार गायक कलाकारांची नितांत गरज आहे.उरण परिसरातील युवा गायक कवी प्रकाश तांडेल हे बौद्ध लेणी वाचविणारे गाणे घेऊन येत आहेत.एकविरा केरुमाता मातृसत्ताक संस्कृती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ चळवळीस माझ्या सर्वच गायक कलाकारांनी अशी साथ दिली तर सामाजिक राजकीय परिवर्तनाचा आणि भारतीय संविधान यांच्या विजयाचा दिवस दूर नाही असे मला वाटते..सर्वांचे मंगल व्हावे!
राजाराम पाटील,8286031463,उरण रायगड