नवी मुंबई : मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) तुर्भे येथील मार्केटमध्ये व्यापारी असोशिएशनची स्थापना आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नव्यानेच स्थापना झाली आहे. या असोशिएन चे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर असून , सचिव वसंत वाघमारे आहेत. कोषाध्यक्ष सुरेशभाई नरोडे.
येथील व्यापाऱ्यांच्या विविध समस्या असून, शासन दरबारी त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही, असा अनुभव आल्याने येथील काही व्यापारी एकात्र येऊन, समस्यांचे निराकरण करण्यासाठी आनंदराज आंबेडकर यांना निवेदने देऊन, रिपब्लिकन मर्चंट असोसिएशन स्थापना करण्यात आली आहे.
मुंबई एपीएमसी तुर्भे येथील पाचही मार्केट मधील अनेक समस्या उजागर होत असून, यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यापार वृद्धीस काही अंशी खीळ बसत असल्याचे दिसते. प्रशासनाकडून, समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सदर असोसिएशनच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचे, रिपब्लिकन असोशिएशिनचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आणि सचिव वसंत वाघमारे यांनी म्हटले आहे.