रेशमाची कीड आपल्या भोवती कोश करून त्या कोशातच ती मरते . अगदी तशाप्रकारे बाबासाहेब हे किती महान होते याचा पुनर्पाठ करून आपली पाठ थोपटण्यात मशगुल होणारी तरुणाई ‘फेस-बुक’ वर ‘बुक’ झाली आहे. पण समाज वास्तवाला ‘फेस’ करून शत्रूच्या कळपातील आपल्या स्वाभाविक मित्रांना त्याबाहेर काढायचे कसे यासाठी विचार करण्याची त्यांना गरजच वाटत नाही. परिणामता त्यांच्या कोशाला शत्रूने धक्का दिला तर ते कावरे बावरे होवून ‘मैदानात’ येतात आणि रोष शांत झाला कि पुन्हा आपल्या कोशात परत जातात. त्यामुळे ‘होश’ ठेवून कार्य करण्याचे कृतीशील कार्यक्रमाबाबत त्यांच्यात अनुउत्साह दिसून येतो.
-विनोद पवार,कल्याण प