घाटकोपर रमाबाई नगरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांवर अमानुष, पाशवी गोळीबार करण्यात आला. 10 जण जय भीमचा जयघोष करत शहिद झाले…!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्मितेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे पोलिस गोळीबारात बलिदान देणाऱ्या शहिद
(शहिद भिमसैनिक नावे)
१)शहिद-सुखदेव कापडणे
२)शहिद-कौसल्याबाई पाठारे
३)शहिद-अमर धनावडे
४)शहिद-नंदू कटारे
५)शहिद-संजय निकम
६)शहिद-संजय कांबळे
७)शहिद-अनिल गरुड
८)शहिद-विलास दोडके
९)शहिद-मंगेश शिवशरण
१०)शहिद-हितेश भालेराव
११)शहिद-बबलू वर्माया घटनेला आज 22 वर्षे पूर्ण होताहेत. हा काळ तसा मोठा होय; पण अजूनही भळभळणा-या जखमा भरल्या नाहीत ! भरणे शक्य नाही !! संविधानाचे शिल्पकार आणि ज्यांच्या श्वासाचा घटक बाबासाहेब आहेत, त्यांच्या पुतळ्याची विटंबना होते… जनता निषेधार्थ रस्त्यावर उतरते… आणि त्यांच्यावर गोळीबार केला जातो… हे आंबेडकरवादी अनुयायी कसे विसरू शकतात ?
भावांनो… बहाद्दर भीमसैनिकांनो ! तुम्ही शरिराने गेलात; पण तुमच्या आठवणी आमच्या हृदयात आहेत ! आमच्या प्रत्येक श्वासावर तुमचा अधिकार आहे रे !!
चला…एक साथ जय भीमच्या जयघोषात बाबासाहेबांसाठी कुर्बान होणा-या जांबाज सैनिकांना आदरांजली अर्पण करू या…
अभिवादन करू या…!
-इंजि. भीमप्रकाश गायकवाड