आज ११ जुलै
माता रमाई आंबेडकर नगरातील त्या अमानुष गोळीबारात हुतात्मा झालेल्या शाहिदानाच्या बलिदानाचा स्मृती दिन..!
तमाम शोषित पीडित भारतीय समाजात समता प्रस्थापित करणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबनेचा निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या जनतेवर अमानुष गोळीबाराचा आदेश देणाऱ्या मनोहर कदम नावाच्या क्रुकर्मा पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने निष्पाप कोवळ्या मुलांचा आणि स्त्रीयांना बळी घेतला.ह्या अमानुष भ्याड गोळीबाराचा निषेध करावा तितकाच कमी आहे .संपुर्ण देशभरात आंबेडकरी अनुयायांना पेठवणारी घटना त्या काळी घडली होती.
इतिहासात अजरामर नोंद झाली विविध संघटना,पक्ष आणि नेते ,कार्यकर्ते याच्या वर खटले भरले गेले .
रमाई नगर हत्याकांड कोर्टात गाजले मात्र अजून ही हत्याकांडाचा अमानुष आदेश देणारा मनोहर कदम काहीच कार्यवाही नाहीय.
सोशल मेडियावर हेच विचारले जातेय मनोहर कदम चे काय झाले???
हा अनुत्तरित प्रश्न डोक्याची मात्र शीर ताणतो..!
अजून परिस्थितीत जैसेथेच आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहिदांच्या स्मृतीस वंदन होते . मीडियात आणि समाजमाध्यमावर चर्चा होते मूळ प्रश्न त्साच राहतो .दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी असेच होईल आणि पुन्हा पुढच्या वर्षी चर्चा होईल .आंबेडकरी जनतेने यातून धडा घेतला पाहिजे शासन,प्रशासन आणि राजकीय ताकद एक झाली की सामान्य जनतेचा आवाज कोंडला जातो . रमाबाई नगर हत्याकांडात हेच झालेय. कुणी काय केले हा वादाचा विषय असला तरी आमचे मात्र जीव गेलेत.
असे ह्याच प्रकरणात नव्हे तर आता पर्यंतच्या सर्व जातीय अत्याचाराच्या प्रकरणात हेच घडत आहे
आता आमच्या धडावर आमचाच मेंदू ठेवून भावनिक आंदोलना ऐवजी वैचारिक आंदोलन करायला हवे .कारण वैचारिक आनंदोल हे क्रांतिकारक आहे भावनिक आंदोलन क्षणभंगुर आहे. प्रतिकाना तोडले जाऊ शकते विचारांना संपवता येत नाही.यातून नवी क्रांती घडेल आणि हीच खरी या भीमसैनिकाना आदरांजली ठरेल.
www.ambedkaree.com च्या वतीने शहिदना मानवंदना….!
-प्रमोद रा जाधव