राम जेठमलानी यांचे निधन माजी कायदामंत्री,ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले.

राम जेठमलानी यांचे निधन
माजी कायदामंत्री,ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते आजारी होते. देशातील सर्वोत्कृष्ट विधीज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे.
राम जेठमलानी जन्म १४ सप्टेंबर, इ.स. १९२३:शिखरपूर, सिंध प्रांत, पाकिस्तान हे भारतीय वकील आणि माजी संसदसदस्य आहेत. कायद्याची पदवी मिळवल्यानंतर जेठमलानी यांनी सिंधमध्ये वकीली केली. भारताच्या फाळणीनंतर त्यांनी मुंबईला स्थलांतर केले.


जेठमलानी हे जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. भाजपच्या सरकारमध्ये हे भारताचे कायदेमंत्री तसेच नागरी विकासमंत्री होते.
त्यांची मुले महेश जेठमलानी आणि राणी जेठमलानी हे सुद्धा वकील आहेत.
महाराष्ट्रातील चळवळीतील अनेक नेत्यांच्या सुप्रिम कोर्टातील केसेस त्यांनी मोफत लढल्या होत्या. माजी परिवहन राज्यमंत्री गंगाधर गाडे यांच्यावर पँथरच्या काळातील खुनाची केसही त्यांनी लढली होती, त्यातून गाडे दोषमुक्त झाले होते.
अशा या नेत्यास आणि विधितज्ञास विनम्र श्रध्दांजली!!
-दिवाकर शेजवळ

Next Post

महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक मडकेबुवा.

रवि सप्टेंबर 8 , 2019
महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक मडकेबुवा. मडकेबुवा (बाबासाहेबांचे अंगरक्षक) यांचे संपूर्ण नाव गणपत महादेव जाधव परंतु ‘मडकेबुवा’ म्हणून प्रसिद्ध होते. ‘मडकेबुवा’ नाव पडण्याचे कारण म्हणजे ते आधी माळकरी बुवा होते व भगवी वस्त्रे वापरीत. ते उत्कृष्ट मेकॅनिक होते त्यामुळे एका […]

YOU MAY LIKE ..