डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड !
************************
जगात ज्या भारतीय व्यक्तींचे नाव अभिमानाने आणि आदराने घेतलेले जाते ज्यांचे छायाचित्र महान तत्त्ववेत्ता कार्ल मार्क च्या सोबत त्याच्या बरोबरीला लावले जातते ,जगात सर्वात महत्त्वाचे कायदेपंडित,घटनात्मक आदर्श लोकशाही निर्माता म्हणून जांचा उल्लेख होतो,जगाच्या अत्यंत हुशार आणि क्रांतिकारक असणाऱ्या जागतिक व्यक्तींच्या यादीत ज्यांचे नाव पाहिले लिहिले जाते आणि भारतातील तमाम शोषित,पीडित वंचित समाजाला त्यांच्या हक्काची लढाई ज्यांनी लढून माणसांना माणसाचा दर्जा दिला,स्त्रियांना स्वातंत्र्य दिले आणि भारताची राज्यघटना निर्माण केली केवळ पुस्तके आणि ग्रंथ व ज्ञानाची अखंडित जोपासना व्हावी आणि आपल्या संग्रहातील हजारो ग्रंथ जपले जावेत म्हणून केवळ पुस्तकांसाठी सुंदरे घर उभे केले आणि जिथून अखंड भारतातील सामाजिक करणातीची ऐतिहासिक लढाई लढली गेली त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र निवासस्थान जगभारातील आंबेडकरी करोडो अनुयायांना वंदनीय असलेले राजगृह मुंबई, दादर येथे अज्ञात समाजकंटकाकडून काल संध्याकाळी हल्ला करण्यात आला आहे.
सदर घटनेचा सर्वच थरातून निषेध करण्यात येत असून आंबेडकरी अनुयायांना अस्वस्थ करणारी ही घटना असून आम्ही या हल्ल्याचा जाहीर निषेध करत आहोत.या घटनेची सरकारने तातडीने दखल घेत या हल्ल्याचे सुत्रधार कोण याचा शोध घ्यावा.
या संदर्भातील पत्रक सोशल मीडिया च्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धप्रमुख सुरेश नदिरे यांनी प्रसिध्द केले ते खलील प्रमाणे.
मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.
आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सुरेश नंदिरे
प्रसिद्धी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी