कोल्हापुरात साजरा झाला मोठया दिमाखात राजेश्रीं चा जयंती सोहळा….!
कोल्हापूर :
अश्वघोष आर्ट अँड कल्चर फौंडेशन च्या वतीने आयोजित राजर्षी महोत्सव २०१८ आज सायं शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे दिमाखात सम्पन्न झाला.
प्रसंगी कार्यक्रमास बहुजन हृदय सम्राट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, भदंत आर आनंद, भदंत एस सम्बोधी, प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ सूरज पवार, प्राचार्य डॉ. हरीश भालेराव, प्रा. आनंद भोजने, भारिप जिल्हाध्यक्ष दिगंबर सकट व प्रा करुणा मिनचेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात आयु. इंद्रजित कांबळे (जेष्ठ कायदे तज्ञ), आयु सुजाता कांबळे (सामाजिक कार्यकर्त्या), आयु अनिल म्हमाणे (प्रकाशक व लेखक) व आयु उत्तम कांबळे (जेष्ठ साहित्यिक) यांचा राजर्षी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
आयु कबीर नाईकनवरे (प्रसिद्ध गायक व संगीतकार) यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करण्यात येत आहे.