राजा ढाले कुटुंबियांच्या सांत्वनासाठी ऍड. प्रकाश आंबेडकर पोहचले..!

मुंबई :

आंबेडकरवादी चळवळीचे भाष्यकार, साहित्यिक, पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वार्तेने आंबेडकरी समाजावर शोककळा पसरलीय.

राजाभाऊ ढाले यांच्या निधनाची वार्ता कळल्यावर आज संध्याकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि पँथरचे संस्थापक सदस्य, ज्येष्ठ नेते ज.वी. पवार यांनी ढाले कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

ढाले यांच्या निधनाने आंबेडकरवादी चळवळीचा भाष्यकार हरवल्याची प्रतिक्रिया ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई समनव्यक आनंद जाधव, मिलिंद रोकडे, रतन बनसोडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

70 च्या दशकातील पँथरच्या झंझावताने देशभर आपला प्रभाव निर्माण केला होता. त्यात राजाभाऊ ढाले अग्रनी होते. आपल्या परखड आणि चिकित्सक विचारासाठी ते प्रसिद्ध होते. भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले होते.

उद्या दुपारी चैत्यभूमी (दादर) येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केला जाणार आहे.

सौजन्य : प्रबुद्ध भारत टीम

Next Post

आंबेडकरी जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांची नवी इनिंग: महाराष्ट्र माझा .

रवि जुलै 21 , 2019
जेष्ठ पत्रकार मा दिवाकर शेजवळ यांची ‘नवी इनिंग’- महाराष्ट्र माझा प्रवीण बरदापुरकर दैनिक ‘लोकसत्ता’ च्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक. राजकीय ‘बातमीदारी’ ने राजधानी दिल्ली गाजवलेले ज्येष्ठ पत्रकार. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र माझा’ या नवीन राजकीय साप्ताहिकाचे राज्यात पुढील महिन्यात आगमन होत आहे. […]

YOU MAY LIKE ..