आंबेडकरी तरुण म्हणत आहेत….,
आरक्षण बंद झालेच पाहिजे ?
पण….,
SC ,ST,OBC,EBC,SBC वाल्याना कळेल की आरक्षण काय आहे आणि का आहे?
आरक्षण ची सुरुवात ही जाती पासून होते मग जात ही आधी संपवली पाहिजे. आपल्या देशात कोणत्याही गोष्टीचे मुळ काय हे शोधत नाही. मुद्दा गरम आहे तेव्हा ठोका हातोडा ही पद्धत सोडली पाहिजे.
भारतात आरक्षण म्हणजे नेमके काय?
त्याचे स्वरूप काय आहे? ते कशासाठी आहे? कोणासाठी आहे? का आहे? ते दिल्यामुळे काय होईल? हे कोणालाच माहीत नाही किंवा त्यावर अभ्यास न करता सुद्धा उपट सुंभासारखे प्रवचन ठोकायचे ही पध्दत झाली आहे.
देश स्वातंत्र्य झाल्यापासून भारतीय राज्यघटनेप्रमाणे इथल्या सर्व मागासवर्गीय लोकांना स्वतःचा प्रतिनिधित्व ( म्हणजेच सध्याचा प्रचलित असलेला शब्द आरक्षण) करण्यासाठी घटनेने दिलेली ती एक संधी आहे .जातिय व्यवस्थेत त्या काळी शिक्षण केवळ एका विशिष्ट वर्गाकडेच होते व त्यांनाच ते घेण्याचा अधिकार होता त्यामुळे ज्यांच्याकडे शिक्षण होते ते पुढे गेले आणि बाकीचे मागे राहिले मग स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची संधी मागासवर्गीय समाजात येऊ लागली आणि लोक शिक्षित होऊन सुशिक्षित झाले. भारतीय राज्यघटनेने दिलेला हक्क घेऊन एक एक क्षेत्र ते काबीज करत गेले. स्वतःच्या समाजाचे प्रतिनिधित्व करत गेले पण भारतीय राजकारणाने ह्या प्रतिनिधित्व ला आरक्षण नावाचे लेबल संबोधुन आणि आरक्षण म्हणजेच नोकरी असे समीकरण असा समज प्रचिलित करुन त्या विरुध्द हा भडकविण्याचे काम चालुच आहे त्यातुन समाज मनाचा भडका उडतच आहे आणि राहणार .
भारतात जातीचे राजकारण खेळले जाते. जे जे लोक (हे बंद झाले पाहिजे, ह्याची आता गरज नाही ) ह्या प्रतिनिधित्व वरती बोलतात त्या लोकांनी कधीच ह्या गोष्टीचा उहापोह केलेला नसतो वा अभ्यास केलेला नसतो.( वरती नमूंद केल्या प्रमाणे उपटसुंभ) आरक्षण जर हे संपवायाचे असेल तर आधी जाती संपवा मग आरक्षणही आपोआपच संपेल.यासाठी अगोदर अभ्यास करा मोक्याच्या जागी कोण ठगे लोक आहेत आणि ह्या प्रतिनिधित्व चा दुरूपयोग करत आहे.
चला कोण कोण तयार आहे जाती संपवायला ? जाती व्यवस्था ही आरक्षणाचे मुळ आहे हे प्रथम समजुन घेवुया.
जातियव्यवस्था संपविण्यासाठी आपल्याला ह्या जाती कोणी निर्माण केल्या आणि कशासाठी केल्या ह्याचा शोध घेणे गरजेचे आहे. म्हणजे ज्यांनी जाती निर्माण केल्या त्याचा उद्देश काय होता.ती व्यवस्था तर्कतेच्या कसोटिवर टिकते का? हे समजावुन घेतले पाहिजे. जाती निर्मुलनासाठी तीची निर्मिती करणार्यांनी का केली व त्यातुन समाजात दुर्गामी कोणते फायदे झाले ?त्याचा कोणत्या समाजावर काय परिणाम झाला ? यावर विचार करणे गरजेचे आहे . आरक्षणावर टिकेची झोंड उडविणार्यांनी प्रथम जाती व्यवस्था ,वर्ण व्यवस्था निर्मुलनासाठी कोणता उपक्रम आखला आहे .त्याची अंमलबजावणी कधी अन केव्हा करणार याचे ही विश्लेषण करणे गरजेचे आहे.
“बुद्ध म्हणाले कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जा तिच्यावर तर्क वितर्क विचार करा म्हणजे तुम्हाला ती गोष्ट सत्य आहे की असत्य हे कळते कोणी सांगितले म्हणून विश्वास ठेवू नका.”
जर समाजात एखादी समस्या जोर धरते त्यातुन समाजात वैमनस्य वाढते अशी समस्या का निर्माण झाली व तीचा नायनाट कशा करावा यावर समाजातील विचारवंत,प्रज्ञावंत लोकांनी विचार करणे गरजेचे असते तीच खरी समाजाची गरज असते आम्ही आरक्षण संपविण्यास तयार आहोत तुम्ही जातीवाद संपवा .सरकारी दरबारी अन सामाजिक पातळीवर,वैयक्तिक पातळीवर त्याचे निर्मुलन झाले पाहिजे. जाती अंत होणे हे आधुनिक भारतात खर्या लोकशाही रुजविण्याचे महान कार्य होईल.
नोट:
ह्या बोलघेवड्या आरक्षणाचा फायदा कोणी आणि कसा घेतला हे तुम्हाला माहितीच्या अधिकारात माहिती मिळू शकते. म्हणजे कोणत्या प्रवर्गाने कोणाचे प्रतिनिधित्व लाटले. हेच जर प्रत्येकाला लोकसंसखेच्या प्रमाणात दिले असते तर आज ही वेळ आली नसती. विनंती आहे की कृपया अभ्यास करा आणि मग मते मांडावीत.
( विचारपूर्वक माझे मत मांडले आहे. चूक भूल द्यावी घ्यावी. )
किरण तांबे।
9167885852