मिलिंद एकबोटेना ‘हिंदू राष्ट्रीयत्व’ बहाल….! पुण्याच्या सार्वजनिक न्यास नोंदणी अधिक्षकांचा प्रताप…!

मिलिंद एकबोटेंना’हिंदू राष्ट्रीयत्व’ बहाल!

पुण्याच्या सार्वजनिक न्यास नोंदणी अधिक्षकांचा प्रताप…!


■ दिवाकर शेजवळ ■
मुंबई: दि.1 जानेवारी : देशाच्या संविधानानुसार हिंदू हा धर्म आहे, राष्ट्रीयत्व नाही। असे असतानाही पुण्यातील सार्वजनिक न्यास नोंदणीच्या अधीक्षकांनी मात्र ‘समस्त हिंदू आघाडी’ चे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना दोन तपापूर्वीच ‘हिंदू राष्ट्रीयत्व’ बहाल केल्याचे उजेडात आले आहे।

मिलिंद एकबोटे आणि ‘ शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान’ चे संभाजी भिडे हे दोघे 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव- भीमा येथे आंबेडकरी समाजाविरोधात माजवण्यात आलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात आरोपी आहेत।

मिलिंद एकबोटे यांना सार्वजनिक न्यास नोंदणीच्या अधीक्षकांनी ‘ हिंदू राष्ट्रीयत्व’ दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भिवंडी येथील ऍड किरण चन्ने यांनी केला आहे। ते भीमा- कोरेगाव प्रकरणात माजी न्यायमूर्ती जे एन पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगासमोर बौद्ध समाजाची बाजू मांडत आहेत।
मिलिंद एकबोटे हे पुण्यातील ‘धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती’ या नोंदणीकृत संस्थेचेही सर्वेसर्वा आहेत। ती संस्था 1996 सालात अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी पुणे यांच्याकडे रीतसर नोंदणीकृत केलेली आहे। तिचा नोंदणी क्रमांक: 11086/1996 असा आहे।

मात्र ती संस्था नोंदणीकृत करताना सार्वजनिक न्यास अधीक्षकांनी मिलिंद एकबोटे यांच्यासहित कार्यकारी मंडळातील विश्वस्तांना सरकारी दरबारी अधिकृतरित्या ‘हिंदू राष्ट्रीयत्व’ प्रदान केले आहे। या संदर्भात नोंदणी अधीक्षक कार्यालयातील एकबोटे यांच्या संस्थेची कागडपत्रेच ऍड चन्ने यांनी जगजाहिर केली आहे।

पुणे जिल्यातील वढू बुद्रुक ( तालुका : शिरूर) या गावात गोविंद गोपाळ महार यांनी अंत्यविधी केलेल्या संभाजी महाराज यांची समाधी आहे। त्या समाधीची देखभाल स्थानिक ग्रामपंचायत आणि मिलिंद एकबोटे यांची पुण्यातील ‘धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती’ संयुक्तरित्या करत आहे.

महार वतनाची 68 गुंठे जमीन एकबोटेंच्या समितीकडे
****************
वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांची समाधी असलेली 68 गुंठे महार वतनाची वंश परंपरागत जमीन 7/12 नुसार, मिलिंद एकबोटे यांच्या धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या ताब्यात आहे, अशी माहिती ऍड किरण चन्ने यांनी दिली। समाधीची ती जमीन पूर्वी कलेक्टर बहादूर पुणे यांच्या 26 फेब्रुवारी 1947 च्या आदेशा( एल एन पी ऑर्डर 1118) नुसार, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक मंडळ पुणे यांच्या नावावर होती, असेही त्यांनी सांगितले।

संभाजी महाराजांची समाधी ऑन-द- स्पॉट
###
#########
वढू बुद्रुक या गावातील संभाजी महाराज यांच्या समाधीची सर्व जमीन ही महार वतनाची म्हणजे गायकवाड कुटुंबाची आहे, असे सांगून ऍड चन्ने म्हणाले की, संभाजी महाराजांची समाधी 33×33 म्हणजे एक गुंठ्यावर वसलेली आहे। तिथेच औरंगजेब यांने ठार मारलेल्या गोविंद गोपाळ महार यांच्या सहकारयांच्याही समाधी ( वीरगळ) आहेत। डावीकडे चर्मकार समाजाची वस्ती आणि त्यांचा पांढऱ्या दगडाचा वेताळ देव आहे। तर,संभाजी महाराज यांच्या समाधीच्या समोर मरी आईचे देऊळ आहे। गावकऱयांनी त्याचे नामकरण मुक्ताई असे केले आहे।


भिडेंची अटक फडणवीस यांनी का टाळली ?

****************
सालाबादप्रमाणे कोरेगाव – भीमा येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आंबेडकर अनुयायी 1 जानेवारी 2018 रोजी गेले होते। तो 200 वा शौर्य दिन असल्याने नेहमीपेक्षा अधिक गर्दी लोटली होती। त्या दिवशी आंबेडकरी समाजावर हिंसक हल्ले करत त्यांच्या वाहनांची जाळपोळ, तोडफोड करण्यात आली। हा हिंसाचार त्या दिवशी वढू बुद्रुक येथून रॅलीच्या रुपात भीमा कोरेगावकडे कूच केलेल्या जमावाने घडवला होता। त्या रॅलीसाठी हाक देणारे संभाजी भिडे यांचे आवाहन पत्रक उपलब्ध आहे। तरीही भिडे यांना अटक करण्याचे फडणवीस सरकारने का टाळले?असा सवालही ऍड चन्ने यांनी विचारला आहे।

राष्ट्रीयत्वाची सांगड विशिष्ठ धर्माशी घालण्याच्या केलेल्या प्रकारावर सार्वजनिक न्यास नोंदणी अधिक्षकांनी मान्यतेची ‘मोहोर’ उमटवणे संविधानाच्या कुठल्या तत्वात आणि कायद्यात बसते ? एकबोटे यांच्या त्या बेकायदा संस्थेची मान्यता रद्द करावी। तसेच त्यांच्या संस्थेच्या घशात घालण्यात आलेली महार वतनाची 68 गुंठे जमीन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्वरित ताब्यात घ्यावी।
* ऍड किरण चन्ने*

Next Post

मा.ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी दिली विजयस्तंभाला मानवंदना

बुध जानेवारी 1 , 2020
भीमा कोरेगावं लाखोंचा जनसागर देत आहे शूर सैनिकांना मानवंदना.……….! मा.ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी दिली विजयस्तंभाला मानवंदना भीमाकोरेगाव दि.१ जानेवारी २०२० :-भीमाकोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला आज सकाळी ७ वाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी मानवंदना अभिवादन केले..मानवंदनेचे […]

YOU MAY LIKE ..