बुद्ध धम्मात सामाजिक समता आणि व्यक्ती स्वातंत्र याला खूप महत्त्व आहे..
***********************
प्रफुल्ल पुराळकर-www.ambedkaree.com
वाचनात आलेली पुस्तके :
संदर्भ : महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास, ले. मा श मोरे
सांस्कृतिक वाटचाल ही कोणत्याही समाजाची त्या समाजावर असणाऱ्या विचार प्रणालीवर अवलंबून असते आणि विचार हे संस्कारातून येत असतात संस्कार हे नीतीतून आणि नीती ही धर्मातून येत असते.
बौद्ध धम्मात नितिमत्तेला खूप महत्त्व आहे .जगातील पहिला धम्म तथागत बुद्धांनी हा माणसाला केंद्र स्थानी ठेऊन निर्माण केला.माणसं आणि त्याचा अस्तित्वाने बनलेला समाज हे लक्षात घेतले की समाजाची सांस्कृतिक रचना आणि जडणघडण समजावून घेता येते.
लेखक मा श मोरे यांनी लिहिलेले महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास हे पुस्तक वाचून समजते.प्रत्येकाकडे संदर्भ म्हणून संग्रही ठेवण्याजोग असे हे पुस्तक आहे.
“बुद्धधम्मात सामाजिक समता आणि व्यक्ती स्वातंत्र्याला खूप महत्व असल्यामुळे व्यक्ती विकासासाठी असे प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होत होते। अशा समाजातच कला, कौशल्य, साहित्य आणि संस्कृती ची वाढ होते। अजंठा, एलोरा वगैरे ठिकाणच्या कलाकृतीची निर्मिती अशा समाजातच होऊ शकली। त्याच वातावरणात एलोरा येथील आश्चर्यकारक कैलास मंदिर आणि तेथील अप्रतिम अशी जैन लेण्यांची निर्मिती झाली। महाराष्ट्रातून बुद्ध धम्माचा लोप झाल्यानंतरच्या काळात आजपर्यंत अजंठा-एलोऱ्यासारखी एकही कलाकृती महाराष्ट्रात निर्माण झालेली नाही। ह्याचे कारण म्हणजे बुद्ध धम्माचा लोप झाल्यानंतरच्या काळात व्यक्तीविकासाला पोषक असे वातावरण राहिले नाही।”