शुद्ध चित्ताचा मार्ग……
कसला रे गर्व तुझं जातीचा
गर्व कर इथल्या पुण्य मातीचा .
ज्ञानयांची पुण्यभूमी तुज दिसेना कशी?
काय लपले असे त्या खोट्या जातीपातीत?
तुझ्या शरीरात वसे शुद्ध चित्त दिसेना तुझं कसे? पंचमहाभूतांनी बनलेले शरीर तुझे कळेना तुझ कसे ?
येऊन या जगात अनेक वर्ष झाली
पण अजून बुद्धि कशी नाही आली ?
खोट्या रुबाबात ह्या शरीर रुपी पिंजऱ्यात राहुनी,
घे भरारी ,दे सोडून जाती-पाती धर्माचा पाश,
चित्त शुद्ध होवो, या शरीरातूनी
मग गर्व कर शुद्ध गुणांचा तुझ्या ज्ञानाचा,कर्तुत्वाचा ,
सुंदर शरीर हे निसर्गातून निर्माण झालेले
त्यात शुद्ध बुद्ध चित्त वसलेले.
तुकोबांनी ,विठोबाचे गुण गायले.
तुझ्याच ध्यानीमनी नाही आले.
अखंड मानवजातीला मार्दाखवणारा ,चित्ताचीशुद्धीकरणारा अरहंत पदालापोहोचवणारा ,शुद्धतेतूनबुद्ध येणारा .
मग मोक्षात अडकून न राहता, हो निब्बाण प्राप्त घे सुख अरिहंता चे ,घे भरारी दाही दिशांना.
हो मुक्त या भवसागरातूनी,जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातूनी .
मग मन तुझे होईल शुद्ध.
तुज दिसू लागेल शुद्ध बुद्ध!
-शितल भांबेडकर जाधव .