लोकनायक पेरियार एकमेव असे क्रांतीकारक समाजसुधारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडू च्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले.
त्यांचा आज स्मृती दिन…..!
दक्षिणेतील या महानायकला
www.ambedkaree.com चे विनम्र अभिवादन….!महानायक पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी (१७ सप्टेंबर, इ.स. १८७९ – २४ डिसेंबर, इ.स. १९७३) हे विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी समाजसुधारक होते. त्यांनी भारतीय समाजातील अस्पृश्य ,पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला.
तामिळनाडू व दक्षिण भारतात महानायक पेरियार रामसामी यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. पेरियार यांनी तत्कालीन मद्रास प्रांतात जस्टीस पार्टीची स्थापना केली.
काशी भेट आणि अपमानित घटना
जातीय भेदभाव अत्यंत खालच्या स्थितीत पोहचला होता .त्यांच्या काशी च्या भेटीत त्याचा त्यांना प्रत्यक्षात अनुभव आला आणि तोच अनुभव त्यांना एका महान कार्य करण्यासाठी पुरेसा ठरला….!सन १९०४ मध्ये पेरियार यांनी काशी ला भेट दिली.
यात्रेकरूकरिता निशुल्क असलेल्या भोजनाच्या खोलीत गेल्यावर तेथील अन्न केवळ ब्राह्मण लोकांसाठी आहे व त्या खोलीत ब्राम्हण वर्गातील च व्यक्तीला प्रवेश आहे त्यावरून त्यांना अपमानित करण्यात आले व बाहेर हाकलून दिले .
भुकेने व्याकुळ झालेले ,अन्नासाठी त्यांनी प्रयत्न करून ही न मिळाल्याने व अपमान याने त्यांचे मन विद्रोहाने पेठून उठले
ज्यामुळं ते रूढीवादी हिंदुत्वाचे कट्टर विरोधी बनले. त्यानंतर त्यांनी कोणत्याही धर्माचा स्वीकार नाही केला, आणि त्यामुळे ते आजीवन नास्तिक राहीले.
त्यांनी वायकोम येथे सत्याग्रह केला केरळ व दक्षिण भारतातील जातीव्यवस्था त्यामुळे खालच्या जातींना हिंदू मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता .
केरळमध्ये, त्यांना मंदिरांकडे जाणऱ्या मार्गांवर चालण्याचीही परवानगी नाकारण्यात आली. 1956 मध्ये केरळ राज्याची स्थापना झाली; पूर्वी हे मलबार (उत्तर केरळ), कोचीन आणि त्रावणकोर राज्यांमध्ये व्यापकपणे विभागले गेले होते).
१९३२ मध्ये काँग्रेस पक्षाच्या काकीनाडा बैठकीत के. के. माधवन यांनी केरळमधील निराश जातींमधील भेदभाव दर्शविणारा अहवाल सादर केला. त्या सत्राने अस्पृश्यतेविरूद्धच्या हालचालींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी केरळमध्ये व दक्षिणेकडे अस्पृश्यतेच्या विरोधात लढा देण्यासाठी वेगवेगळ्या जातींच्या लोकांची समिती बनविली गेली. के केल्पन यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती; बाकीचे सदस्य टीके माधवन, वलयुधा मेनन, कुरुर नीलाकांतन नंबूदिरीपाद आणि टीआर कृष्णस्वामी अय्यर होते .मार्च १९२४ ला या चळवळीस प्रारंभ झाला. वैकोम महादेव मंदिराच्या बाहेरील बाजूस एक बोर्ड होता ज्यामध्ये अवतार (निम्न जाती) प्रवेश करण्यास मनाई होती.त्याविरुद्ध सत्याग्र करण्याचे निश्चित करून सत्याग्रही तिघांच्या तुकड्यात मंदिरात प्रवेश करण्यासाठी गेले. पोलिसांनी त्यांचा प्रतिकार केला आणि त्यांना अटक केली. गांधीजी, चटंपी स्वामीकल आणि श्री नारायण गुरु यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.त्यांच्या या चळवळीला अखिल भारतीयत्व प्राप्त झाले आणि दूरदूर पासून पाठिंबा मिळाला. सत्याग्रह्यांना अन्न पुरवण्यासाठी स्वयंपाकघर बसवून पंजाबचे अकाल लोक पाठिंबा देतात. ख्रिश्चन आणि मुस्लिम नेते देखील समर्थनासाठी पुढे आले.
गांधींचा आदेशाने आंदोलन मागे व पुन्हा बोलणी फिस्कटल्याने नेटाने पुन्हा सुरुवात
गांधीजींच्या सल्ल्यानुसार एप्रिल १९२४ मध्ये हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. जाती-हिंदूंशी चर्चा अयशस्वी झाल्यानंतर नेत्यांनी आंदोलन पुन्हा सुरू केले. नेते टीके माधवन आणि केपी केसावा मेनन यांना अटक करण्यात आली. आपला पाठिंबा देण्यासाठी ए.व्ही. रामास्वामी (पेरियार) तामिळनाडूहून आले होते. त्याला अटक करण्यात आली.महार रेजिमेंट चा पुढाकार आणि महाराणी सेतूलक्ष्मीबाई याना निवेदन
१ ऑक्टोबर १९२४ रोजी मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्रावणकोरच्या रीजेंट महारानी सेतुलक्ष्मीबाई यांच्याकडे एक निवेदन सादर केले.
त्याच वेळी केरळ मधील सवर्ण लोकांनी ही प्रति मोर्चा काढला .गांधीजींच्या प्रतिनिधी ने महारानींशीही भेट घेतली. सवर्णांच्या या मिरवणुकीचे नेतृत्व मन्नाथ पद्मनाभन नायर यांनी केले. नोव्हेंबर १९२४ मध्ये जेव्हा मिरवणूक तिरुअनंतपुरम येथे पोहोचली तेव्हा वैकोम येथे सुमारे कांसह ही संख्या जवळपास पर्यंत वाढली.
फेब्रुवारी १९२५ मध्ये त्यांनी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी ‘केरळपर्यतनम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि जाती-धर्माची पर्वा न करता प्रत्येक हिंदूंसाठी सार्वजनिक रस्ते वापरण्याचा अधिकारही त्यांनी घेतला.त्यानंतर केरळ राज्यातील त्रावणकोरमधील छोटेसे शहर वैकोममध्ये मंदिर परिसरात व त्याच्या आसपास अस्पृश्यतेचे कठोर कायदे होते. दलितांना , ज्यांना हरिजन म्हणूनही ओळखले जाते, त्यांना आजूबाजूच्या जवळच्या रस्त्यावर प्रवेश करण्याची परवानगी नव्हती आणि मंदिरात जाण्यापर्यंत आत जाऊ दिले नाही. जातीविरोधी भावना वाढत होती आणि १९२४ मध्ये वैकोम यांना संघटित सत्याग्रहासाठी योग्य जागा म्हणून निवडले गेले . त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जातींना मंदिरात प्रवेश मिळावा या उद्देशाने यापूर्वीच एक चळवळ सुरू झाली होती. अशा प्रकारे आंदोलन आणि निदर्शने झाली. 14 एप्रिल रोजी पेरियार आणि त्यांची पत्नी नगम्म वायकॉम येथे दाखल झाले. त्यांना त्वरित अटक करण्यात आली आणि सहभागासाठी तुरुंगात टाकले गेले. गांधींनी गैर-केरळवादी आणि बिगर-हिंदूंनी भाग घेण्यास आक्षेप घेतल्यानंतरही पेरियार आणि त्यांचे अनुयायी आंदोलन मागे न घेईपर्यंत या आंदोलनाला पाठिंबा देत राहिले. सत्याग्रहात भाग घेतलेल्या त्याच्या अनुयायांनी त्यांना दिलेली वैकोम वीरान ही पदवी त्यांना मिळाली.
पेरियार यांचे महत्त्व गांधीजी व काँग्रेसचे प्रयत्न.
इतिहासात वैकोम सत्याग्रह ज्या प्रकारे नोंदविला गेला आहे त्याद्वारे संबंधित आयोजकांच्या प्रतिमेस एक ऐतिहासिक संदर्भ मिळतो. गांधी आणि आंबेडकर, अ स्टडी इन लीडरशिप या शीर्षकाच्या लेखात एलेनोर झेलियट यांनी ‘वैकोम सत्याग्रह’ साकारला आहे, या घटनेसंदर्भात मंदिरातील अधिकाऱ्यासोबत गांधींनी केलेल्या वाटाघाटीचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ई.व्ही. रामास्वामी विचारांचे संपादक असे म्हणतात की ब्राह्मणांनी हेतुपुरस्सर ई.वी. रामास्वामी यांच्या सहभागाविषयीच्या बातम्या दडपल्या.यंग इंडिया या अग्रगण्य काँग्रेसच्या नियतकालिकात वायकॉम सत्याग्रह वरील आपल्या विस्तृत अहवालात ई.व्ही. रामासामीचा उल्लेख कधीच आढळत नाही.
केरळ आणि उर्वरित भारतातील प्रचलित जातीव्यवस्थेनुसार, निम्न जातीच्या हिंदूंना मंदिरात प्रवेश नाकारला गेला. केरळमध्ये, त्यांना मंदिरांकडे जाणा सर्व रस्त्यांवर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली. (१९५६ मध्ये केरळ राज्याची स्थापना झाली; पूर्वी हे मलबार (उत्तर केरळ), कोचीन आणि त्रावणकोर राज्यांमध्ये व्यापकपणे विभागले गेले होते).
पेरियार रामसामी यांनी तमिळनाडूतील ब्राम्हणेत्तर समाजात समाजजागृती घडवून आणली .
देवी देवतांना बडवणार समाजसुधारक
ब्राम्हणेत्तर समाजाची जागृती करण्यासाठी ते गळ्यात ढोल अडकावायचे व ढोलाच्या दोन्ही बाजूला देवीदेवतांची चित्रे चिटकावयाचे व त्या चिटकवलेल्या देवी-देवतांच्या फोटोला पायातील बूट व चप्पलांनी बडवायचे. ते असे यासाठी करायचे कि, आपल्या बहुजन समाजावर देवी-देवतांचा फार मोठा पगडा आहे. ब्राह्मणांनी बहुजनांच्या मनात देवी-देवतांची फार मोठी भीती निर्माण केली आहे. हा खरा दहशतवाद आहे आणि हा दहशतवाद ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेला आहे. जर देवाला मानले नाही, देवाची पूजा केली नाही, देवाचा नवस फेडला नाही, देवाला नारळ फोडला नाही, देवाला उदबत्ती लावली नाही, देवाच्या पाया पडले नाही तर देव कोपतो, रागावतो, शाप देतो आणि मग आपले वाटोळे होते, आपला सत्यानाश होतो, आपल्यावर आपत्ती कोसळते, आपल्यावर संकट येते. अशा ब्राह्मणांनी थापा मारल्या आणि त्या आपल्या अज्ञानी लोकांना खऱ्या वाटल्या. हा खरा दहशतवाद आहे. तो दहशतवाद घालविण्यासाठी त्यांनी देवी-देवतांना चपलांनी बडविण्याचा कार्यक्रम केला. त्यानंतर रामसामी हे देवी-देवतांना हातगाड्यांवर ठेवायचे तो हातगाडा चेन्नईच्या चौकात आणायचे व त्या हातगाड्यावरील एका-एका देवी-देवताला पायातील पायातानाने बडवायचे व बडवतांना लोकांना सांगायचे “हा तुमचा राम, मी ह्याला चपलेने बडवतो आहे. तो राम स्वतःला वाचवू शकत नाही. तर मग तुम्हाला कसे वाचवू शकेल ?” रामाचा नंबर झाला कि, दुसऱ्या देवाला पायातील जोड्याने बडवायचे. हे देवी-देवता आपले रक्षण करतील, आपल्याला वाचवतील, आपल्या मदतीला धावून येतील अशा भ्रामक कल्पनेतून बहुजनांना बाहेर काढण्यासाठी अशाप्रकार रामसामी यांनी समाज जागृतीचे कार्य केले. रामस्वामी आपल्या भाषणात लोकांना विचारायचे “जर साप आणि ब्राम्हण एकाच वेळी दिसला तर तुम्ही कोणाला माराल?” लोक उत्तर द्यायचे “सापाला” त्यावर रामसामी म्हणत “सापाला बिलकुल मारू नका.” तेव्हा लोक विचारायचे, “मग कोणाला मारायचे?” त्यावर रामस्वामी लोकांना सांगायचे, “सापाला सोडून द्या आणि ब्राह्मण ठेचून मारा.” लोक विचारायचे “का?” त्यावर रामस्वमी सांगायचे “साप चावला तर माणूस मारतो आणि ब्राम्हण डसला तर पिढ्या न पिढ्या बरबाद होतात.
प्रखर स्त्रियांचे उद्धारक
” पेरियार यांच्या मते रामायण हे ब्राह्मण पुरोहितशाही वर्गाने निर्माण केलेली वर्णाश्रम व जातीव्यवस्था भारतीय समाजावर लादण्याच्या व्यापक कार्यक्रमाचे प्रतिक आहे. त्यामुळे याचा विरोध करण्यासाठी ते तामिळनाडूतील शहरात फिरून चौकाचौकात लोकांच्या घोळक्यासमोर रामाच्या प्रतिमेला जोड्याने मारत असत. ते रामाला स्त्रीवर अनन्वित अत्याचार करणारा नराधम मानत असत. रामाने सीतेच्या चारित्र्यावर लावलेला आरोप, सीतेला परत जंगलात सोडण्याचे त्याचे दुष्यकृत्य. रामाचे हे कृत्य स्वत:च्या बुद्धीचा वापर करून विचार करण्यारास मुळीच पटणार नाही. रामाने लक्ष्मण याच्या हस्ते शूर्पणखेच्या चेह-याचे केलेले विद्रुपीकरण व त्या रागातून रावणाने केलेले सीतेचे अपहरण तरीही सीतेला परिपूर्ण आपल्या ताब्यात ठेवूनही तिच्या शरीराला स्पर्शही न करणारा रावण. रावणाचे हे स्त्री सन्मानाचे चारित्र्य व कृतीसत्य आजच्या भारतीय स्त्रिस व तरुण वर्गास का उमगत नाही?. रावण इतका चारित्र्य संपन्न असूनही भारतीय स्त्री रावणाचा द्वेष व विरोध का करते?. त्यामुळे तरुण व स्त्रि वर्गास विचारावेसे वाटते कि, तुम्ही कधीपर्यंत पोथ्यातील खोट्या समजुतीमध्ये गुरफटून राहणार आहात?. कधीपर्यंत रामाच्या दुष्कृत्याला पुण्यकर्म व रावणाच्या सत्कार्याला दुष्यकृत्य समजणार आहात?.
पेरियार हे दक्षिणेतील महात्मा जोतिबा फुले होते.
म्हणून समस्त स्त्रियांना आवाहन करावेसे वाटते कि, तुमच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या रामसामी पेरियार सारख्या महापुरुषांचा तुम्ही सत्कार व सन्मान करणार आहात कि नाही?. आपल्या डोळ्यावरील सनातनी धर्माचा पापुद्रा हटविल्याशिवाय तुम्हाला ते शक्यही नाही.