महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक बौद्ध लेणी घाणीच्या साम्राज्यात
दापोली तालुक्यातील दापोली दाभोळ मार्गावर पाच किमी. वर नानटे गावाजवळ डावीकडे पन्हाळेकाजीचा फाटा फुटतो. या ठिकाणी एकूण 29 गुहा खोदलेल्या आढळतात.कोटजाई नदीच्या काठाने असलेल्या डोंगरामध्ये एकूण इंग्रजी एस आकाराच्या नागमोडी वळणाचे नदीचे पात्र असून दोन्ही बाजूंस डोंगर व हिरवीगार झाडी यामुळे हा परिसर अत्यंत रम्य दिसतो. हि लेणी उत्तराभिमुख आहेत. येथील वैशिष्टय आहे. हा लेणीसमुह खोदण्याची सुरूवात दुस-या किंवा तिस-या शतकापासून झाली. त्यावेळी हीनयान बौध्द पंथ अस्तित्वात होता.
त्यापुढील काळात म्हणजे सुमारे 8 व्या ते 11 व्या शतकांपर्यंत खोदल्या गेलेल्या लेण्यात तांत्रिक वज्रयान पंथीयांचे वर्चस्व होते. याच काळात काही मुळाच्या हीनयान लेण्यांत तांत्रिक पूजाविधीसाठी उपयुक्त असे फेरफार केले गेले. तसेच काही नवीन तांत्रिक देवतांची स्थापना करण्यात आली. 11 व्या शतकानंतर शिलाहार राजा अपरादित्य (इ.स.1127 ते 1148) याने कदम्बांकडून या परिसरातील राज्या मिळवले व आपला पुत्र विक्रमादित्य याला दक्षिण कोकण प्रांतांचा अधिपती बनविले. येथील डोंगरावर प्रणालक दुर्ग नावाचा किल्ला होता. या ठिकाणी विक्रमादित्यांची राजधानी होती. त्याचे अवशेष, खुणा आजही दिसतात.
ही प्राचीन लेणी 1970 च्या सुमारास उजेडात आली. त्याचे श्रेय दाभोळचे इतिहासप्रेमी श्री. अण्णा शिरगावकरांना जाते. त्यांना पन्हाळेकाजी गावात एक प्राचीन ताम्रपट सापडला. त्याचे वाचन करून घेऊन त्या अनुषंगाने अनेकांच्या सहकार्याने त्यांनी हे स्थान शोधून काढले. या लेण्यांचा इतिहास, माहिती सांगणारे कोणतेही साधन उपलब्ध नाही. तरी हि डॉ एन एम देशपांडे यांच्या काही लेखात याची माहिती आलेली आहे.
या लेणी समूहातील ४,५,६,७,८,९ क्रमांकाच्या गुहा मिळून जो गट तयार होतो. तो सर्वांत जुना म्हणजे हीनयान बौध्द पंथीय लेणी समूह आहे. या लेण्यांच्या पूर्वेस १,२,३ हे लेणी समूह आणि पश्चिमेस असणारे १०,११,१२,१३ हे समूह वज्रयान पंथाशी संबंधित असणारी लेणी आहेत तसेच १४ वे लेणे हे नाग लोकांशी संबंधित आहे मुलाच्या बौद्ध लेण्या असून नंतर च्या काळात त्यावर नाग पंथी शिल्प कोरण्यात आलेली आहेत . लेणी क्रमांक १५ हे लेणे मूळचे वज्रयान पंथाशी संबंधित असणारे असून कालांतराने मूळ मूर्तीमध्ये बदल घडवून त्यामध्ये गाणपत्य पूजनासाठी ते वापरले गेले इथे पाच फुटाचे गणपतीचे शिल्प कोरलेले असले तरी ते मूळ शिल्प नसून ते नंतर च्या काळात अतिक्रमण करून तयार केलेलं शिल्प आपणास पाहायला मिळते .
या लेण्यांचा फारसा इतिहास सापडत नसला तरी लेण्यांक्सचे बांधकाम हे सातवाहन काळात सुरु झालेले आहे
एकूण २९ लेण्यांपैकी जवळपास सर्वच लेणी हि बौद्ध काळातील असून नंतर च्या काळात म्हणजे अगदी ११ ते १२ व्या शतकात या लेण्यात हिंदू धर्माचे अतिक्रमण होण्यास सुरुवात झालेली आहेत मूळचे बौद्ध पद्धतीची लेणी नंतर च्या काळात बदलण्यात आलेली आहेत
लेण्यांच्या छतावर स्तूपाची निर्मिती केलेली आपणास पाहायला मिळते हे स्तूप देखील नंतर च्या काळात त्यावर कलाकुसर करण्यात आलेली पाहायला मिळते आणि यालाच लोक शिवलिंग समजू लागलेत
मूळ लेण्यांचे वैभव पाहून आजची लेण्यांची अवस्था मनाला दुःखद वेदना देऊन जातात
सध्या लेण्यांकडे लोकांचे हि आणि पुरातत्त्व विभागाचे हि दुर्लक्ष आहे सुरुवातीच्या चार हि लेण्यात वटवाघळे भरपूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या लेण्यात दुर्गंधी आहे लेण्यांकडे अश्या पद्धतीने दुर्लक्ष केल्याने बौद्ध धम्माचा ऐतिहासिक साक्ष देत असणारी हि लेणी आज दुर्लक्षित आहेत
एकेकाळी या लेण्यात अर्हत भिक्षु राहत असतील अनेक बौद्ध राजे या लेण्यात येऊन बुद्ध वंदना घेत असतील अश्या लेण्यात आज खूप बिकट अवस्था आहे लेण्यांची पडझड झालेली आहे काळाच्या ओघात लेणी मातीखाली जाऊन बंद होतील अशी भीती आहे लेण्याच्या वरती लोकांनी घरे बांधली आहेत पुरातत्व खात्याचा नियम असून देखील तिथे अश्या पद्धतीने लोकांनी अतिक्रमण केलेले आहे
ऐतिहासिक बौद्ध लेणी आज शेवटच्या घटका मोजत आहेत दापोलीकरांनो तुमचा बौद्ध इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे कोकणातील लोकांनी आपला वारसा ओळखून या लेण्यांचे काम करण्यास घ्यावे प्राचीन बौद्ध लेण्या हीच तुमच्या प्राचीन बौद्ध इतिहासाची ओळख आहे तुमचे अस्तित्व आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर इतिहास विसरले जाल आणि देशाचा बौद्ध इतिहास नष्ट होईल खरा इतिहास मातीखाली गाडला जाईल
चला लेणी संवर्धनाचा हिस्सा बनू बौद्ध लेण्यांचे संवर्धन करू
चला भारताच्या प्राचीन इतिहासाला पुन्हा जागवू
चला बौद्ध लेण्यांचे संवर्धन करू
रविंद्र मीनाक्षी मनोहर
लेणी संवर्धक