मुंबईत पार पडली पाली भाषेवरील व्याख्यानमाला

मुंबईत पार पडली पाली भाषेवर व्याख्यानमाला .

पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई आयोजित पाली लेक्चर सिरीज मुंबई.

आज पाली रिसर्च इन्स्टिट्यूट,मुंबई यांच्या माध्यमातून दादर येथे पाली लेक्चर सिरीज आयोजित केली होती. ‘प्रॉब्लेम अँड पॉसिब्लिटीज रिलेटेड टू पाली लँगवेज अँड पाली लिटरेचर’या विषयांवर उपस्थित भन्ते वर्ग आणि पाली भाषेच्या अभ्यासकांनी आपली मते विषद केली.

सुरवातीला सरसेनानी आनंदराज आंबेडकर,आदरणीय भन्ते एन आनंद, भन्ते मेधनकर, डॉ भालचंद्र खांडेकर आदी इतर मान्यवरांनी दीप प्रज्वलित केले त्यानंतर वंदना घेण्यात आली. आयोजकांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी पाली भाषेचा प्रचार प्रसार करण्याऱ्या संस्थांना धन्यवाद देत पाली भाषा शिकणे किती महत्वाचे आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला.

पाली अभ्यासक डॉ भालचंद्र खांडेकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात यूपीएससी मधून पाली भाषा कशी हद्दपार करण्यात आली त्यानंतर त्यांनी कोणता लढा दिला याबद्दल माहिती दिली. पाली भाषा या देशात लोकांनी शिकू नये तिचा प्रचार होऊ नये याबद्दल कोणते षडयंत्र प्रस्थापित लोक करतात याबद्दल ही लोकांना माहिती देत प्रत्येक पाली अभयासकाने येत्या जनगणनेमध्ये दिलेल्या रकान्यात ‘तुम्हाला येणारी भाषा म्हणून पाली भाषा’ असे नमूद करण्यास सांगितले.

भन्ते एन आनंद यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या पाली प्रचार आणि प्रसारा बद्दल माहिती देत संबंधित विषयावर आपले मत व्यक्त केले.

श्रीलंका येथील भन्ते मेधनकर यांनी पाली भाषेत मुळात कोणतेच दोष नसून ती एक शुद्ध,परिपक्व आणि सोपी भाषा आहे तसेच त्या भाषेमध्ये कोणत्याच समस्या नाही यावर विचार व्यक्त केले. त्यानंतर इतर मान्यवरांनी ही आपली मते व्यक्त केलीत.

दुसऱ्या सत्रात पाली अभ्यासक आयु राजेश चंद्रा(लखनऊ) ,आयु पब्जजो रवी(कर्नाटक), आयु गौतम मोरे सर(मुंबई),आयु देवेंद्र उबाळे(इगतपुरी) ,आयु सरोज चौधरी (नागपूर) यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात
‘प्रॉब्लेम अँड पॉसिब्लिटीज रिलेटेड टू पाली लँगवेज अँड पाली लिटरेचर’ या विषयावर आपली परखड मते व्यक्त केली व त्यावरती उपाय ही सुचवले.

हा कार्यक्रम आयु अरविंद भंडारे व सम्पूर्ण टीमने चांगल्या रीतीने आयोजित करून बौद्ध अभ्यासकांना एक वैचारिक मेजवानी दिली याबद्दल मी जागतिक बुद्ध धम्म दिक्षा समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो.

(टीप-मुद्दे इतके डिस्कस केले ते एका पोस्टमध्ये मांडता येणे शक्य नाही,धम्माचा जर खरा प्रचार करायचा असेल तर असे कार्यक्रम आयोजित करणे महत्वाचे आहे)

-मैत्रय दिपक ( जागतिक बुद्ध धम्म दिक्षा समिती)
(सभार मैत्रय दीपक यांच्या FB वॉल वरून )

Well done … Great work.

Next Post

ऍड प्रकाश आंबेडकर यांनी घेतली घेतली पीडित कुटुंबाची भेट

सोम नोव्हेंबर 4 , 2019
ऍड प्रकाश आंबेडकर यांनी घेतली घेतली पीडित कुटुंबाची भेट खर्डा ,अहमदनगर जिल्ह्यातील दि बाळू पवार या पारधी युवकाची समाजकंटक लोकांनी निर्घृण हत्या केली .त्यांना धीर व भेटण्यासाठी व परिस्थिती ची पाहणी करण्यासाठी आद प्रकाश आंबेडकर गेले होते त्यांनी त्यासंबंधी त्यांच्या फेसबुकवर […]

YOU MAY LIKE ..