साहित्य कला क्षेत्रातील मनाचा असणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्काराची घोषणा
मराठी साहित्यात आपल्या अनोख्या शैलीने जातीय उतरंडीत नव्या जगण्याच्या वास्तव दर्शन घडवून अख्या साहित्य जगाला हादरवून दलित साहित्याला नवा आयाम देणारे थोर साहित्यिक पद्मश्री दया पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. या वर्षी मेघना पेठे,
शीतल साठे आणिमलिका अमर शेख यांना यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अकरा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे .
पद्मश्री दया पवार यांच्या बलुत या गाजलेल्या आंत्मकथानला चाळीस वर्षे पुर्ण गेल्यावर्षी झाल्याने बलुत आत्मकथन प्रकाशन करणाऱ्या “ग्रंथाली” तर्फे “बलुत” पुरस्कार गेल्या वर्षीपासून जाहीर करण्यात येतो या वर्षी “बलुत”पुरस्कार डॉ. मंगेश बनसोडे यांना जाहीर झाला आहे. डॉ. बनसोडे बलुतं पुरस्काराचे दुसरे मानकरी ठरले आहेत. ज्येष्ठ हिंदी लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘जूठन’ या आत्मकथनाच्या ‘उष्ट’ या मराठी अनुवादासाठी डॉ. बनसोडे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.या पुरस्काराचे आतापर्यंतचे मान्यवर मानकरी –
कला,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवराना हा पुरस्कार दिला जातो मागील काही वर्षात या पुरस्काराने प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, समर खडस, कॉ. सुबोध मोरे, संजय पवार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ. जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे, वीरा राठोड, सुधारक ओलवे, गणेश चंदनशिवे, सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर आदी.
पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ सभागृह, मुंबई येथे करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात आणि वरिष्ठ पत्रकार-कथाकार प्रतिमा जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळ सराफ करणार असल्याची माहिती दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली आहे.