NRCआणि CAB विरोधात तरुण रस्त्यावर उतरला आहे,…!
जगातील अनेक क्रांत्या साक्षी आहेत, जेव्हा तरुणांनी मनावर घेतले तेव्हा मुजोर राजेशाही, सामंतशाही,हिटलरशाही, घालवून तरुणांनी आपल्या देशात बदल घडविला आहे…!
राज्यकर्त्यांना अभिप्रेत होते की, एकाच वर्गाला टार्गेट करुन जेरीस आणू त्यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच जामिया मिलिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांवरील अतिरेकी अन्याय …!
भारतातील असंवैधानिक,अराजकाकडे घेऊन जाण्याची मानसिकता असलेल्या राज्यकर्त्यांना आता रस्त्यावर उतरुण जबाब मागणारा मुस्लिम समुह प्रतिक्रिया देण्यासाठी सज्ज झाला आहे ही अतिशय सकारात्मक बाब आहे…!
देशभरातील तरुण रस्त्यावर उतरुण आंदोलन करतो आहे….!
एका धर्माचा नाही तर सर्वधर्मसमभावाचा तरुण विद्यार्थी रस्त्यावर उतरला आहे ही अतिशय प्रेरणादायक बाब आहे…!
देशातील बुद्धीजीवी वर्ग संविधान बचाव म्हणून हजारोंच्या संख्येने निदर्शनं करीत आहे…!
एक राज्य नाही तर अनेक राज्ये अर्थात देशाचा मोठा हिस्सा विरोध करीत आहे…!
मुजोर राज्यकर्त्यांनो,तुमचा परतीचा मार्ग सुरू झाला आहे…!
तुम्ही कितीही साम,दाम,दंड भेद वापरा देशातील जनमत तुमच्या हेकेखोर पणाला ऊत्तर देण्याची तयारी करीत आहे…!
केवळ देशाच्या अंतर्गतच नाही तर देशाच्या बाहेरही जगभरात असंवैधानिक कायदे खपवून घेतले जाणार नाहीत अशीच द्वाही फीरतं आहे…!
जग २१ व्या शतकात वैज्ञानिक प्रगत दृष्टीकोन घेऊन पुढे सरकत असतांनाच तुम्ही जगातील सर्वात मोठी लोकशाही संपवून मध्ययुगीन कालखंडात देशाला ढकलतं अससाल तर ते खपवून घेतले जाणार नाही अशीच जनतेची व जगाची धारणा आहे…!
बदल होणार याची चाहूल लागली आहे….!
जयभीम
-भास्कर भोजने.