एक गैरमुस्लिम तालिबानी राष्ट्राचा उदय झालाय. गोबेल्स नीती यशस्वी झाली.

साम दाम दंड भेद या नीतीचा पुरेपूर वापर होऊन एक गैरमुस्लिम तालिबानी राष्ट्राचा उदय झालाय. गोबेल्स नीती यशस्वी झाली.

महाराष्ट्रापुरते बघावयास गेलयास या निवडणुकीने काँग्रेस नेत्यांच्या गर्वाचा फुगा फोडला आणी बहुजनांची, वंचितांची, मुस्लिमांची ताकद खऱ्या अर्थने दिसून आली आहे .बाळासाहेब आंबेडकर ओवेसी आणि इतर काही पक्षांनी केलेल्या वंचित आघाडीला सीट्स च्या रुपात जास्त यश जरी मिळाले नसले तरी 38 लाख इतका प्रचंड जनाधार मिळाला आहे.यातून एक गोष्ट अशी घडली की काँग्रेसच्या भ्रमाचा भोपळा फुटला.या पुढे आपण राष्ट्रीय पक्ष असल्याचा बडेजावपणाचा आव त्यांनी सोडून द्यावा आणि महाराष्ट्रातील बहुजनांना गृहीत धरने सोडून द्यावे.

भाजपाची B टीम म्हणून खरंतर या आघाडीविरुद्ध भरपूर अपप्रचार केल्या गेला.


प्रस्थापितांच्या हातातले बाहुले बनून इतके वर्ष ही जनता उपेक्षित राहिली आणि ती तशीच राहावी हेच काँग्रेसला अपेक्षित होते पण या निवडणुकीत बहुजनांची ही प्रचंड ताकद पुढे आली आणि विशेष म्हणजे ही जनता कुणाच्या लाटेत वाहणारी नसून किंवा अंधपणे कुणाला मत देणारी नसून विचार करणारी समंजस आणि जागरूक मतदाता आहे.

या जनतेने काँग्रेसच्या दिगग्जना धूळ चारलीय.
यापुढे ह्या नवीन ताकदीला इथल्या राजकारणात गृहीत नक्कीच धरले जाणार नाही आणि येथील राजकारणात वंचित आघाडी निर्णायक राहील अश्या स्थितीत आली आहे याबद्दल मा. बाळासाहेबांचे अभिनंदन.
-जयश्री इंगळे
प्रस्तुत लेखिका आघाडीच्या इंग्रजी आणि मराठी न्यूज चॅनल व वृत्तपत्राच्या स्तंभलेखिका आहेत.

Next Post

मुंबईच्या नायर रूग्णालयात रॅगिंगचा बळी;तरूणीला मागासवर्गीय आरक्षित जागेवरून प्रवेश मिळाला म्हणून जातीवाचक टोमणे

शनी मे 25 , 2019
मुंबईच्या नायर रूग्णालयात रॅगिंगचा बळी; जळगावच्या तरूणीने गळफास घेत केली आत्महत्या, आत्महतेच्या निषेधार्थ तडवी डॉक्टर असोशिएशन आणि विविध संघटनांच्या वतीने आंदोलन तरूणीला मागासवर्गीय आरक्षित जागेवरून प्रवेश मिळाला म्हणून जातीवाचक टोमणे मारायचे यावल-रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत […]

YOU MAY LIKE ..