औरंगागाबादची ओळख —नागसेन फेस्टीवल उद्यापासून
सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल
औरंगाबाद/प्रतिनिधी
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘नागसेन फेस्टीवल-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे़ ३०, ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
नागसेनवनातील लुम्बीनी उद्यानात महोत्सव होत आहे. ३० मार्चला सायंकाळी ६ वाजता महोत्सवाचे उद्घाटन दीपक कदम यांच्या हस्ते होईल. डॉ. राजेंद्र धामनस्कर, दौलतराव मोरे, माधवराव बोरडे, डॉ. किशोर साळवे, डॉ. विष्णू कराळे, डॉ. प्रताप कलावंत, डॉ. एन. एन. बेहरा, प्रा. बी. एस. गंगावणे, डॉ. प्रदीप खडके, विजय तायडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. डॉ. प्रमोद दुथडे, प्रभाकर खरे, डॉ. अनिल साळवे, अभ्यंकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येईल. त्यानंतर फुले आंबेडकरी विद्यार्थी चळवळी समोरील आव्हाने आणि उपाय विषयावर परिसंवाद होईल. यात राहूल सोनपिंपळे, प्रशांत दोन्था, सचिन निकम, भाग्येशा कुरणे, अनुप कुमार सहभाग नोंदवतील. सायंकाळी ८ ते १० यावेळेत एल्गार समतेचा हे राज्यस्तरीय कवी संमेलन होईल. ३१ मार्चला सायंकाळी ३ वाजता भारतीय व्यवस्था आणि लोकशाही समोरील आव्हाने आणि समस्या विषयावर जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी सुधाकर सुरडकर असतील. आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्त्ये व वकीलांचा यावेळी सत्कार करण्यात येईल. १ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद आणि समकालीन वास्तव या विषयावर संजय आवटे यांचे व्याख्यान होईल. कुफिर बालगुंडवार हे अध्यक्षस्थानी असतील. मान्यवरांच्या हस्ते प्रतापसिंग बोदडे यांना नागसेन गौरव पुरस्कार व शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगर मोहल्ला आणि स्टॅच्यू आॅफ लिबर्टी नाटकातील कलावंतांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर मेघानंद जाधव, डॉ़ किशोर वाघ यांचा भिमगीतांची मैफिल रंगणार आहे.दि 11 एप्रिल रोजी मा आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘भीमगर्जना करंडक’ ढोल ताशा स्पर्धा संपन्न होईल.
या महोत्सवादरम्यान शासकीय, नामांकित फुले-शाहू-आंबेडकरी ग्रंथ संपदा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आंबेडकरी संस्कृतीचे प्रतिबिंब असणाºया मुर्तीकला, पेन्टींग्स, शिल्प, फोटोग्राफी यांचे कलापूर्ण भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. नवयुवकांना आकर्षित करण्यासाठी भव्य फोटो शुटचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सचिन निकम, निखिल आराक अविनाश कांबळे, अतुल कांबळे, आनंद सुर्यवंशी, विशाल देहाडे, किरण शेजवळ, हेमंत मोरे यांनी केले आहे.