आज 2 जुलै 2019 रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे .रोजच घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणारे मुंबईकर आता त्यांची लाइफ लाईन असलेली मुंबई लोकल सेवा बंद झाल्याने ,रस्त्यावर वाहतूक कोंडीनं थांबले आहेत.
जबाबदार फडणवीस सरकार ने शासकीय सुठ्ठी जाहीर केलीय. पाणी तुंबललेले नाही असे दिवसभर सांगणारे शिवसेनेचे महापौर आता काहीच बोलत नाहीय.
मालाड तेथे भिंत कोसळून जवळजवळ 15 जन मृत्यू मुखी अनेक जण जखमी आणखीन काही लोक अडकले .
कल्याण मध्ये दुर्गडी परिसरात ही भिंत कोसळून 3 जण ठार,पुण्यात आंबेगाव येथे ही भिंत कोसळली त्यात 6 जण ठार..!
मध्य रेल्वे ,पश्चिम रेल्वे आणि हारबर रेल्वे ठप्प,तर बाहेरगावच्या गाड्या रद्द …..!
शासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आव्हान करण्यात आलंय.
-प्रमोद रा जाधव