लढवय्या बापाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ……क्रांतिकारी बौद्ध लेणी परिसरात बोधिवृक्षाचे रोपंण..!



लढवय्या बापाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ……क्रांतिकारी बोधिवृक्षाचे रोपंण..!
प्राचीन बौद्ध लेणी संवर्धक टीमचे कार्यकर्ते मा मुकेश का जाधव यांच्या अनोखा उपक्रम…!

कार्यकर्ता जो कृतीतून आपले कर्तव्य पाडत असतो ……!आमचे मित्र लेणी संवर्धक रवींद्र मनोहर सावंत यांचे जवळचे सहकारी लेणी संवर्धक मा मुकेश जाधव याचे वडील देशाच्या महार रेजिमेंट मध्ये लष्करी सेवेत होते त्यांचे 18 वर्षांपूर्वी निधन झाले आपल्या दिवंगत पित्याच्या स्मृती कायम स्वरूपी जिवंत राहाव्या आणि त्यातून धम्म कार्य घडावे या उदात्त हेतूने त्यांनी पाठण प्राचीन बौद्ध लेणी वर बोधिवृक्षाचे रोपण केले . आपल्या दिवंगत पित्याला कृतीतून आदरांजली अर्पण कशी करावी याचा आदर्श त्यांनी तमाम आंबेडकरी समूहासमोर घातला आहे .

कोण आहेत मुकेश जाधव?

मुंबईतील काही बौद्ध तरुण की जे सध्या प्राचीन बौद्ध लेण्या चे संवर्धन आणि त्या लेण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करत आहेत त्यातील मुकेश जाधव हे आघाडीचे शिलेदार आहेत.

आपल्या व्यस्त कामातून ते धम्म कार्यात सतत आघाडीवर असतात आणि अ जा त श त्रु सारखे लोकांना लेणी संवर्धन करण्यासाठी प्रवृत्ती करत असतात . त्यांनी यासदर्भात आपल्या फेसबुक वर व्यक्त केलेल्या भावना www.ambedkaree.com वर देत आहोत.
-प्रराजा

बाप तो बाप असतो,
नेहमी उरुन पुरत असतो,
कुटुंबाचे ओझे पाठीवर जिवनभर पेलत असतो,
सुखी रहावा परिवार यासाठी कायमाच झिजत असतो,
शेवटी बाप हा बापच असतो,
जिवनभरची शिदोरी असतो,
शेवटी बाप हा बापच असतो….!

विश्वरत्न बोध्दिसत्व डॉ.बाबासाहेबांच्या पुण्याईने लष्करात सामिळ झालेले…. आज माझे वडील लष्कर सैनिक (महार रेजिमेंट ) तथा सिंडिकेट बँक निवृत्त
कालकथित काशिराम राघो जाधव यांचा आज १९वा पुण्यस्मरण दिन….

तसे पाहता महाड क्रांतीभुमी ही शुरविराची जन्मभुमी….अद्य बहुजन उध्दारक सुभेदार गोपाळबाबा वलंगकरांची कर्मभुमी… माझ्या रावढळ गावच्या कुटुंबात राहीलेले गोपाळबाबा त्यांची आजची समाधी ही साक्ष आहे… (ज्योतिराव फुले यांचे समकालीन निकटवर्ती)कोकणाची खरी शान.कोकणातील बहुजनांच्या वेदना जाणणारा खरा जाणता. त्यावर आपल्या विटाळ विद्वंसक लेखणीतुन मनुवाद्यांचा खरपुस समाचार घेणारा त्यावेळचा भट्टांचा कर्दनकाळ ….सहाजिकच आहे गोपाळबाबांच्या लष्करातील प्रेरणेने आमच्या कोकणातील बहुतांशी लोक लष्करात जाणे पसंत करत होते.माझ्या वडिलांनी ही तोच संकल्प केला आणि लष्करात रुजु झाले. गोपाळबाबा यांची प्रेरणा घेऊन तयार झालेले….महाड क्रांतिभुमी येथिल महाविर चक्र सन्मानित सुभेदार कृष्णा सोनावणे(कुडपान),स्वातंत्र्य सैनिक सुभेदार विश्राम सवादकर(विर,गाव)(बाबासाहेबांचे निकटवर्ती)
(स्वाआज त्या निमित्ताने मि माझ्या परिवाराने असा संकल्प केला आहे की, आपल्या मृत्य पित्याच्या स्मरणार्थ आपल्या ऐतिहासिक प्राचिन पाटण बुध्दलेणी येथे बोध्दिवृक्ष लावुन त्या वृक्षाखाली लेणीवर येणाऱ्या जाणाऱ्यां धम्मबांधवाना त्या वृक्षाचा सुखाच्या सावळीचा निवारा मिळावा‌.शेवटी पुढील सर्व तथागतांच्या म्हणण्यानुसार निसर्गावर अवलंबुन आहेत.

तथागत सांगतात “पियेही विपयोगो दुख्खो”प्रिय व्यक्तिचा वियोग दुःख दायक आहे.म्हणुन प्रिय व्यक्तिच्या जाण्याचा शोक न करात तथागतांनी दिलेल्या दुखमुक्ती धम्ममार्गावर मार्गक्रमण करावे.

शेवटी तथागत सांगतात,”सब्बे संख्खारा अनिच्छा”
सारे संस्कार अनित्य आहे ,परिवर्तन शिल आहे, क्षणभंगुर आहे.म्हणुन मृत्य व्यक्तिचा शोक न करता त्यांच्या पुण्यस्मरणार्थ काही वर्तमान काळात सजिवांना उपयुक्त होईल असे दान पार्मिता पुर्ण करुन धम्मकार्य करावे.तरच आपल्या मृत्य व्यक्तिस खरे पुण्य लाभेते.

वडील लष्कर असल्याने डिसिप्लेन,शिस्त तथा सतर्कता ही आपल्या अंगी असली पाहीजेच आज त्यांचे बहुतांशी गुण मि पुढे जाऊन आपल्या ऐतिहासिक प्राचिन बुध्दलेणी संवर्धन संशोधनावर मार्गक्रमण करीत आहे.

मला सार्थ अभिमान आहे माझ्या पित्याचा की मि एक लष्कराचा बेट आहे म्हणुन….लष्करात देशाची निस्वार्थपणे सेवा करणार्या माझ्या ह्या शुर पराक्रमी महार रेजिमेंट योध्याला… विनम्र अभिवादनच….!
-मुकेश का जाधव
लेणी संवर्धक आणि लेणी अभ्यासक

Next Post

माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन काळाच्या पडद्याआड

रवि नोव्हेंबर 10 , 2019
निवडणूक आयोगाचा धाक, दरारा निर्माण करणारे माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन काळाच्या पडद्याआड गेले। आणि सत्ताधारी असो की विरोधी पक्षांनाही घाम फोडणारा निवडणूक आयोगही इतिहासजमा झाला। आता त्या आयोगात उरलेत ते फक्त ‘ हुकुमाचे ताबेदार’।

YOU MAY LIKE ..