माय….!
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
प्रमोद रामचंद्र जाधव www.ambedkaree.com
●●○●●●●●●○●●●●●●●●●●●●●○●●●
“माय..!”
खरंच तुझ कसं फेडावे ग पांग,
कस विसरावं नात,भेटल ग जीन,
आभाळाच्या कवेत घेतल ग आम्हा.अजूनही चालतांना,परळ,भोईवाडा,दादर
आणि चौक मडकेबुवांचा,
तुझ्या कष्ठांच्या त्या पाउल खुणा,
सांगतात अजुन ही तुझा इतिहास ह्या मना..!.गोवर्यांच ग थाप..अन खडीमातीची घमेलं,
कस विसरू आम्ही ग तु किती कष्ठ सोसलेलं!
बाप आमचा आमच्या साठी झपाटुन गेलेला,
अमुच्या उध्दाराचा वसा एकखाबी पेललेला!
उपाशी पोठी निजलेला अन स्वाभिमानी जगलेला.तु जागलेली सदा खंबीर धिरगंभीर,
माते..पदरातील बाळे तुझ्या,
पदरातच निजली ग..
अजारावर खर्च नाहि त्यागलीस तु तयांना,
अनेक गंगाधर-राजरत्न जीवापाड जपलेस.!
जगवलेस अमुच्यातील निरंतर.तु झिजुन आधरवड झालेली,
करोडो पाखरांना अंगाखाद्यांवर घेणारी’
तुझी बाळे आता,
बापा सारखी शिकली सवरलेली,
चक्क कितीतरी बुक वाचलेली ,
बापाच्याच वाटेवरून चाललेली
आपल्या चिल्यापीलांसहित चार घास,
सुखाचे असे खावु लागलीत.पण माय…
हे घासाचं देण तुझंच तुच तुझ्या “सायबांना” ,
मोकळे केलीस आमच्यासाठी,
स्वता:च्या चिल्लापिलांना,आनंदाला त्यागुन,
तुझा हठ्ठ तो पांडुरंगाला भेटण्याचा,
पण तुझ्या सायबांनीच केलं
नवं “पंढरपुर”निर्माण,
ज्ञानाच ,समतेच,उत्क्रांतीच,
अन लाखो पिढीतांच्या,
रक्तात स्वातंत्र्याच्या उदघोष करणारं
मानवतेचा मुक्त श्वास घेणारं,देणारं!.ज्ञानागंगेचा झरा उफाळुन येतोय,
बघ तुझी लेकर कशी तृप्त होतायत,
सायब तुझे म्हणायचे ना ग,
“शिक्षण म्हणजे वाघणिंचे दुध,
पिणारा वाघासारखा घुरघुररेल म्हणुन!
आज तुमची लेकर “घुरघुरु” लागलीयत,
काल “रोहित” हि असाच “घुरघुरला”
सायबांचा तुझ्या फोटु घेवुन ,
विद्यापिठात ग एकाकी तडफडला,
“त्यावेळची” माणसीकता माय अजुनहि
संपली नाहि ,
तुझ्या “सायबांची” क्रांतीसुध्दा अजुन ही
पेटलेली,
“रोहित”सारखी सारखी तुझी लेकरं
झोकुन देतायत..स्वता:ला आणि सांगतायत
ग माय,
अजुन लढा बाकी आहे,
“सायबांच”स्वप्न अजुनही अधुरे आहे!
तुम्हां उभयतांच स्वप्न जागे ठेवण्या,
हराम आता झोप ,हराम आता ऐशाराम,
मनगटातील धमण्या टाठर होत आहेत,
बघ ह्या चुमुकल्या मुठी,
आपोआप वळत आहेत..!.
——प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com