पत्रकार मिलिंद तांबे यांचे दुःखद निधन – एक आंबेडकरी विचारवंत काळाच्या पडद्याआड..!

कोकणस्थ आंबेडकरी विचारवंत काळाच्या पडद्याआड..!
**†**********************
प्रमोद रामचंद्र www.ambedkaree.com
*************************

संवेदना
राजापूर तालुका बौध्दजन संघ मुंबई चे माजी कार्यकर्ते,शिक्षण समिती अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार दि मिलिंद तांबे यांचे आज सकाळी दुःखद निधन .

कोकणस्थ आंबेडकरी विचारवंत काळाच्या पडद्याआड..!

राजापूर तालुक्यातील निखरे गावचे जेष्ठ आंबेडकरी विचारवंत ,अभ्यासक ,आंबेडकरी विचाराचे पत्रकार आणि संपूर्ण राजापूर तालुक्यातील बौद्ध संघटनामध्ये पत्रकार म्हणून परिचित असलेले मिलिंद तांबे.

राजापूर तालुका हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला विविध 120 गावांना एकत्रित करून त्यांना एकसंध ठेवण्याचे कार्य गेल्या कित्येक वर्ष संघ करत आहे .

संघटना म्हणजे तिला कार्यकर्ते ही वैचारिक वारसा जपणारे हवे अशा विचाराच्या विचारवंतामध्ये त्याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल .अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उभे राहून त्यांनी आपली महापालिका नोकरी सांभाळुन आपल्या पत्रकारिता हा पेशा जपला विविध वृत्तपत्रात विविध विषयावर लेखन केले मात्र त्यांचा विशेष कल असे ते आंबेडकरी विचारधारेवर …!

कोणताही विचारवंत हे समाजला दिशा देण्याचे कार्य करत असतात ….पत्रकार मिलिंद तांबे यांच्या आकस्मित जाण्याने खूप मोठीं हानी झाली आहे जे काही मोजके विचारवंत राजपूर बौध्दजन संघात आपल्या वैचारिक पातळीवर कार्यरत होते त्यापैकी मिलिंद जी एक होत.

अत्यंत प्रेमळ स्वभाव,मितभाषी आणि सडेतोड लिखाण अशी ख्याती असणारे मिलिंद जी सतत भेटल्यावर ख्याती खुशाली विचारत असत…!

त्यांच्या जाण्याने कोकणस्थ अर्थातच राजापूर तालुका बौध्दजन संघ मुंबई आणि ग्रामीण ,त्यांच्या निखरे गावचे आणि संपूर्ण आंबेडकरी समाजाचे वैचारिक नुकसान झाले आहे.

www.ambedkaree.कॉम आणि अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनासशन त्याना विनम्र अभिवादन करीत असून त्यांना आदरांजली अर्पण करीत आहे .
-प्रमोद रामचंद्र जाधव
सेक्रेटरी
अस्मिता

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड !

बुध जुलै 8 , 2020
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ! ************************ जगात ज्या भारतीय व्यक्तींचे नाव अभिमानाने आणि आदराने घेतलेले जाते ज्यांचे छायाचित्र महान तत्त्ववेत्ता कार्ल मार्क च्या सोबत त्याच्या बरोबरीला लावले जातते ,जगात सर्वात महत्त्वाचे कायदेपंडित,घटनात्मक आदर्श लोकशाही निर्माता म्हणून जांचा […]

YOU MAY LIKE ..