माटुंग्यात रंगपंचमी दिनी भारतीय बौद्ध महासभा आणि भीमयान बुद्ध विहार समिती ची जनप्रबोधन रॅली.
मुंबई -माटुंगा : मुख्यतः मुंबईत सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत आपल्या परिरास विविध धार्मिक सण मोठ्या उत्साहात व मोठया प्रमाणात साजरे केले जातात मात्र सण साजरे केले जात असताना पर्यावरण, पाणी आणि माणसांच्या आरोग्यासाठी ते घातक असू नयेत म्हणून त्यावर जनजागृती करणे गरजेचे आहे याचाच भाग म्हणून माटुंगा लेबर कॅम्प येथील नागरिकांच्या पुढाकाराने होळीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात रंगपंचमी खेळून लोक आपला आनंद करतात मात्र या साठी वापरले जाणारे रंग हे केमिकल युक्त असतात,पाण्याचा मोठा वापर होतो ,त्याच प्रमाणात ध्वनी प्रदूषण ही होते …..!
केमिकल्स युक्त वापरलेल्या रंगातून स्किन आणि कॅन्सर सारखे आजार उद्भवतात तर पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतो हे टाळता येते त्याच प्रमाणे नुकतात जगभरात करोणा सारखा जीवघेणा आजार हा चीन मध्ये वाढला आहे त्याचा प्रादुर्भाव आता भारतात जाणवू लागला आहे .रंगपंचमीच्या दिवशी खेळले जाणारे रंग हे चिनी बाजारपेठ मधून आलेले आहेत तरी त्याचा वापर कमी करावा असे आव्हान ही करण्यात आले .
यात मोठया प्रमाणात माटुंगा लेबर कॅम्प येथील सर्व धार्मिक लोक सहभागी झाले होते .
विभागातील सर्व नागरिकांनी मोलाचे आणि शांतता राखून सहकार्य केले .जनप्रबोधन रॅली यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा ,माटुंगा लेबर कॅम्प शाखा ,भीम यान बुद्धविहार समिती यांचे कार्यकर्ते व सदस्यांनी सहकार्य केले व सर्वजन मोठ्या उत्साहात सहभागी झाले .
-अतुल बागुल
www.ambedkaree.com
माटुंगा