ठरल्याप्रमाणे आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड प्रकाश आंबेडकर यांनी आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की
आज खा. संभाजी राजेंनी आयोजित केलेल्या कोल्हापूर येथील मराठा मूक आंदोलनात सहभागी झालो. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. राज्य व केंद्र सरकारने सर्व उपाय तपासून योग्य पाऊल उचलावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा असे आम्ही आवाहन करतो.विविध समूहांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १९५१ साली दिलेल्या दोराईराजन निकालाचा फेरविचार होणे गरजेचे आहे, हे पुन्हा याठिकाणी नमूद करतो.
प
आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मूक मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. छ. शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून ह्या मोर्च्याला सुरुवात झाली.